Monthly Archives: September 2017

लाजिरवाणे

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एल्फिन्स्टन म्हणजेच प्रभादेवी आणि परळ या दोन उपनगरी रेल्वेस्थानकांदरम्यानच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन मोठ्या संख्येने प्रवासी दगावण्याची घटना अत्यंत दुर्देवी तर आहेच, परंतु बुलेट ट्रेनची बात करणार्‍या भारतासाठी अत्यंत लाजिरवाणीही आहे. मुंबईला गर्दी नवीन नाही. रोज लक्षावधी प्रवासी मुंबईच्या या उपनगरी जीवनरेषांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. कित्येक जण रोज दगावतात देखील, परंतु मुंबई ... Read More »

परळ रेल्वे उड्डाणपुलावरील चेंगराचेंगरीत २२ मृत्युमुखी

येथील परळ एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलावर काल सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १३ पुरुष, ८ महिला व एका बालकासह २२ जण मरण पावले. तसेच ३३ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकजण गंभीर आहेत. या स्थानकावर सकाळी १० वा. च्या सुमारास दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी ट्रेन आल्यामुळे मोठी गर्दी उडाली. त्यानंतर उड्डाण पुलावर क्षमतेपेक्षा प्रचंड गर्दी झाली व त्यातच अज्ञातांकडून पूल ... Read More »

भाजपमधील बहुजन समाज नेत्यांचे खच्चीकरण ः कॉंग्रेस

भाजपचे सरकार बहुजन समाज आणि अल्पसंख्याक विरोधी आहे. भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांचे खच्चीकरण सुरू आहे, असा आरोप अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला. भाजप सरकारकडून भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जात नाही. महामंडळ किंवा इतर निम सरकारी संस्थांवर भाजपमधील बहुजन समाजातील नेत्यांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जात नाही. भाजपमधील अनेक बहुजन नेत्यांनी आपल्याशी संपर्क ... Read More »

कला अकादमी अध्यक्षपदी मंत्री गोविंद गावडे

गोवा कला अकादमीच्या अध्यक्षपदी कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कला व संस्कृती खात्याच्या संचालकांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. कला अकादमीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या काही नेत्यांची नावे चर्चेत होती. Read More »

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महाभाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि अनुदानित शिक्षण संस्थांतील कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात १ टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता ४ टक्क्‌यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारातून हा महागाई भत्ता दिला जाणार आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. तीन महिन्यांची थकबाकी देण्यात येणार आहे. Read More »

कवळेकर प्रकरणी सुनावणी ४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या घरात मटक्याचे साहित्य मिळाल्याप्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर काल सुनावणी झाल्यानंतर कामकाज दि. ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. कवळेकर यांच्यासह त्यांचे भाऊ बाबल कवळेकर यांना तोपर्यंत अटक करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात याप्रकरणी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागून घेतला. दि. ... Read More »

म्हापसा अर्बनची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न

>> सर्वसाधारण सभेत माहिती म्हापसा अर्बन सहकारी बँक ऑफ गोवाची सर्वसाधारण सभा गोंधळात व वादळी वातावरणात पार पडली. बँकेच्या सध्याच्या स्थितीला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार असल्याचे आरोप भागधारकांनी सभेत करून संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी करीत प्रचंड गदारोळ घातला. जोपर्यंत सरकार मनावर घेत नाही तोपर्यंत बँकेची स्थिती सुधारणार नसल्याचेही आरोप यावेळी झाले. शेवटी बँक सुस्थितीत आणण्यासाठी तसेच रिझर्व्ह बँकेने बँकेवर लागू ... Read More »

अहंकार सोडला तरच भरभराट : मुख्यमंत्री

>> ‘दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार २०१५-१६’ पी. आनंदला प्रदान विविध खेळाशी संबंधित असलेल्या राज्य संघटनांनी स्वतःचा अहंकार, स्वार्थ बाजूला ठेवला तरच गोव्यात उच्च दर्जाचे खेळाडू घडतील. संघटनांना अंतर्गत कलहातून वेळ मिळत नसल्यानेच गोवा दर्जेदार खेळाडू घडविण्यात मागे पडत असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी केले. दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत ... Read More »

जीनो क्रीडा पुरस्कार प्रदान

>> गोवा क्रीडापटूंची खाण बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य हव गोव्याचे सरकार क्रीडा क्षेत्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांचेही त्यासाठी पूर्ण सहकार्य मिळत आहे. भविष्यात नॅशनल गेम्स व अन्य मोठ्या स्पर्धा भरविण्यासाठी आमची तयारी चालू आहे. आज गोवा ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जात आहे. परंतु भविष्यात हाच गोवा क्रीडापटूंची खाण बनविण्यासाठी आम्हाला तुमचे सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन गोवा क्रीडा ... Read More »

गोव्यातला दसरोत्सव

– राजेंद्र पां. केरकर शस्त्रोत्सवानंतर येणारी आश्‍विनातली दशमी भारतातल्या अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. परंतु गोव्यात आणि काही अंशी कोकणात संपन्न होणारा दसर्‍यातला तरंगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असाच असतो. दसर्‍यासारख्या सणउत्सवातून ऊर्जा मिळवायची आणि पुन्हा नव्याने येणार्‍या आव्हानांना निर्भीडपणे भिडायचे ही आपल्या समाजाची धारणा होती. कृषी संस्कृती आणि त्यावरती आधारलेल्या लोकधर्मातून समाजाला एकेकाळी जगण्याची ऊर्मी लाभली होती त्याचे दर्शन ... Read More »