Daily Archives: August 16, 2017

नवा भारत

श्रद्धेच्या नावावर हिंसा पसरवू दिली जाणार नाही असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिला आहे. शांती, एकता आणि सद्भावना यांचे महत्त्व अधोरेखित करताना आणि जातीवाद, संप्रदायवाद देशाचे भले करीत नाही असे बजावताना, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, गोरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या धटिंगणशाहीवर हा प्रहार पंतप्रधानांनी केला ... Read More »

सुरक्षा आव्हानांच्या मुकाबल्यासाठी भारत सुसज्ज

>> लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना ग्वाही देशाच्या ७१व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात येथील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या आव्हानांचा मुकाबला करण्यास सक्षम व सुसज्ज असल्याची ठासून ग्वाही दिली. डोकलामप्रश्‍नी चीनबरोबरील विद्यमान तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचे हे वक्तव्य सूचक मानले जाते. जातीयवाद हे विषासारखे असून तो देशासाठी घातक आहे व ... Read More »

कचरा व्यवस्थापन गंभीर समस्या : मुख्यमंत्री

गोवा हे स्वच्छ आणि नितळ राज्य करण्याच्या उद्देशाने सरकारने स्वच्छ भारत, नितळ गोंय ही मोहिम चालीस लावून त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. मात्र कचर्‍याच्या समस्येमुळे सर्व क्षेत्राच्या विकासावर वाईट परिणाम झाला असून त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या ठरली आहे. गोव्याला २०२० पर्यंत कचरामुक्त राज्य बनविण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील जुन्या ... Read More »

साखळीत कारमध्ये सापडली १५ लाखांची रोख रक्कम

>> पैसे कॅसिनोत मिळवल्याचा संबंधितांचा दावा डिचोली पोलिसांनी सोमवारी रात्री गोकुळवाडी साखळी येथे केलेल्या कारवाईत एका कारची तपासणी केली असता त्यात सुमारे १५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. याप्रकरणी पोलिसांनी कारमधील तेलंगण येथील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याविरुध्द १०२ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना पणजीहून बेळगावच्या दिशेने जाणारी ... Read More »

साळगाव प्रकल्पातून कदंबच्या बायोगॅस बसेसना इंधन मिळणे शक्य : कार्लुस

बायोगॅस व बायो इथेनॉलवर चालणार्‍या कदंब महामंडळाच्या एकूण तीन बसेसचा शुभारंभ काल करण्यात आला. साळगाव येथील कचरा प्रकल्पांतून अशा प्रकारच्या ५० बसेसना पुरवण्याजोगे इंधन मिळू शकणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सरकार अशा ५० बसेस खरेदी करून या कचरा प्रकल्पातून मिळणार्‍या इंधनावर या बसेस चालवणार असल्याची माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी दिली. या इंधनामुळे वायूप्रदूषण होत नसल्याचे ते ... Read More »

कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय पुरुष भजन स्पर्धेचे विजेते मुशेल कला मंडळ, वास्को पथकासमवेत गायक पं. उल्हास कशाळकर, अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर व मान्यवर. Read More »

नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन थाटात साजरा

दैनिक नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन काल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री श्री. प्रतापसिंह राणे, सौ. विजयादेवी राणे, कला व सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे, वीजमंत्री श्री. पांडुरंग मडकईकर, महसूलमंत्री श्री. रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते श्री. चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री श्री. ... Read More »