Daily Archives: August 14, 2017

दुर्दैवी व दुःखद

कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा थांबल्याने बालकांचा बळी जाण्याची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची घटना दुर्दैवी आणि दुःखद तर आहेच, परंतु त्यानंतर या घटनेतील बेफिकिरी आणि बेपर्वाईवर पडदा ओढत घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा अखंड चाललेला प्रयत्न अधिक खेदजनक आहे. अशी घटना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये घडू शकते हे योगी आदित्यनाथ सरकारवरील मोठे लांच्छन आहे. एकीकडे योगी आदित्यनाथांचे सरकार सत्तेवर आल्यापासून गोमांस विक्रेत्यांवर छापे, रोड रोमियोंवर ... Read More »

हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनात ५० मृत्यूमुखी

>> ढगफूटीनंतर महामार्गावरील दुर्घटनेत दोन बसेस गाडल्या मंडी-पठाणकोट महामार्ग परिसरात शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याने त्यात हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्या सापडल्याने सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती राज्य प्रशासनाने व्यक्त केली आहे, या दुर्घटनेतील ८ जणांचे मृतदेह सापडले असून बसेसमधील अन्य प्रवाशांचा पत्ता लागलेला नाही असे सांगण्यात आले. मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. ... Read More »

सरकारी कर्मचार्‍यांना अन्न सुरक्षेच्या कार्डांबाबत आदेश

केंद्र सरकारने राबविलेल्या अन्न सुरक्षा योजनेखालील लाभ सरकारी नोकरी असलेल्यांनीही उठविल्याचे आढळून येत असल्याने नागरी पुरवठा खात्याने वरील कार्डे खात्याच्या संबंधित तालुका कार्यालयांमध्ये आणून देण्याचे आवाहन केले आहे. वरील योजनेखालील धान्य वार्षिक १ लाख २० हजार रुपये उत्पन्न असलेल्या सर्व सामान्य कुटुंबासाठी मिळवून देण्याची तरतुद आहे. असे असतानाही काही सरकारी कर्मचार्‍यांनीही बेकायदेशीरपणे लाभ उठविला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमल ... Read More »

काश्मीरात ३ दहशतवाद्यांचा खात्मा : दोन जवान शहीद

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याच्या अवनीर या खेड्यात पोलीस व लष्कर यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान उडालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार झाले. मात्र दहशतवाद्यांच्या प्रतीहल्ल्यात दोन जवानही शहीद झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये त्यांचा म्होरक्या यासिन इटू उर्फ गझनवी याचा समावेश आहे. शहीद जवानांची नावे इल्याराजा पी. (तामिळनाडू) व सुमेध वामन गवई (महाराष्ट्र) अशी आहेत. शहिदांना नंतर श्रीनगरमध्ये लष्करी अधिकार्‍यांनी राज्याच्या मंत्र्यांच्या ... Read More »

गोरखपूर प्रकरणी इस्पितळाचे विभागप्रमुख पदावरून बडतर्फ

गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज इस्पितळातील सुमारे ७० बालकांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकारने या इस्पितळाच्या बालक रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या जागी डॉ. भूपेंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी या कॉलेजचे प्राचार्य राजीव मिश्रा यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले होते. मात्र कॉंग्रेसने या प्रकरणाचे तपासकाम सर्वोच्च न्यायालयाच्या ... Read More »

भाविकादेवी भजनी मंडळ प्रथम

>> कला अकादमी राज्य महिला भजन स्पर्धा कला अकादमी गोवा आयोजित भजन सम्राट मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय महिला गटाच्या स्पधेंत भाविकादेवी महिला भजनी मंडळ, दिवाडी पथकाने पस्तीस हजार रुपयांचे रोख प्रथम पारितोषिक व स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती चषक पटकाविला. तीस हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक देवगी पुरुष महिला भजनी मंडळ, पाटणे-कोळंब पथकाला तर पंचवीस हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक स्वरगंध संगीत संस्कृती ... Read More »

दहशतवादाच्या गर्तेत अफगाणिस्तान

– दत्ता भि. नाईक मिरझ्वालांग या गावावर दहशतवाद्यांनी ताबा मिळवलेला आहे. तेथील शांतता म्हणजे एकप्रकारची जीवघेणी शांतता आहे. यापूर्वी तालिबान व इस्लामिक स्टेट एकमेकांशी वर्चस्वासाठी लढत होते, आता हे दोन्ही गट एकत्र येऊन अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशत माजवीत आहेत. अफगाणिस्तानमधील उत्तर सर-ए-पुल नावाचा प्रांत, त्यातील अडगळीच्या ठिकाणी वसलेला सयाद जिल्हा, त्यात निवांतपणे वसलेले मिरझ्वालांग हे शेतीप्रधान गाव. या गावात शनिवार ... Read More »

‘फ्रिगेट’चे आधुनिकीकरण

– अनंत जोशी १९४५ नंतर अत्यंत यशस्वीरीत्या बांधलेली ङ्ग्रिगेट म्हणजे ब्रिटिश लिएंडर श्रेणीतील ङ्ग्रिगेट होय. तिचा वापर जगातील बर्‍याच नौसेनांनी केला. जवळपास या सर्व फ्रिगेट आधुनिक मारा करणार्‍या तसेच बचाव करणार्‍या यंत्रणांनी सज्ज आहेत. आताच्या अत्याधुनिक ङ्ग्रिगेट्‌स म्हणजे अगोदरच्या ङ्ग्रिगेटचे फक्त वापरात येणारे नाव. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश नौसेनेने ‘ङ्ग्रिगेट’ हा शब्दप्रयोग वापरात आणला. त्याचबरोबर पाणबुडीविरोधी सहायक नौका म्हणून ती ... Read More »