Daily Archives: August 12, 2017

पुन्हा अयोध्या

देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण विवाद असलेल्या अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीस प्रारंभ झाला आहे. या महत्त्वपूर्ण वळणावर शिया वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्र सादर करून रामजन्मभूमी स्थानावरच राममंदिर बांधले जावे आणि मुस्लीमबहुल परिसरामध्ये मशीद बांधू दिली जावी अशी भूमिका नव्याने मांडली आहे. शिया – सुन्नी यांच्यातील पारंपरिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिया समुदायातर्फे अशा प्रकारची भूमिका मांडली गेली यात आश्चर्यजनक काही नाही. ... Read More »

देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेताना माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात पद व गोपनीयतेची शपथ दिली. Read More »

कॉंग्रेसचे पाच आमदार फुटण्याच्या मार्गावर

>> विश्वजीत राणे यांचा गौप्यस्फोट पणजी व वाळपई मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजप आरामात जिंकणार असून दोन्ही ठिकाणी किमान ८ ते १० हजार मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा करून कॉंग्रेस पक्षाचे पाच आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तथा वाळपईतील भाजपचे उमेदवार विश्‍वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेस पक्षाला पुढील १० वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागणार असल्याचेही ते ... Read More »

विकासाच्या नावाखाली विश्‍वजीत राणेंकडून लूट

>> रवी नाईक यांचे वाळपईत आरोप वाळपई शहरातून ग्रामीण भागांना जोडणारे सुसज्ज रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत गरजा सर्वसामान्यांना देण्यास विश्‍वजीत राणे अपयशी ठरले आहेत. विकासाच्या नावाखाली त्यांनी लूट केली असल्याचा आरोप करून जो विकास जनतेच्या फायद्याचा नाही तो काय कामाचा असा सवाल फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काल वाळपई येथे पत्रकार परिषदेत केला. पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही ... Read More »

सरकारी यंत्रणेचा पर्रीकरांकडून गैरवापर

>> शांताराम नाईक यांचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यकर्ते व मतदारांना आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावून बैठका घेत आहेत, असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला. यामुळे लोक प्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे ते म्हणाले. पणजी व वाळपई या दोन्ही मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवाराला जनतेचा पाठिंबा मिळत आहे, असे सांगून जनतेचा कौल नसताना ज्या पध्दतीने पर्रीकर यांनी ... Read More »

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्याने ३० मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास या शासकीय इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने गेल्या २४ तासांत ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश प्रशासनाने फक्त ७ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्सिजन पुरवठा बंद ... Read More »

काले येथे मित्राचा ठेचून खून

>> संशयित आरोपीला अटक खुटकरवाडा, काले येथे दारूच्या नशेत दोघा मित्रांमध्ये झालेल्या भांडणावेळी निखिल कोलू (४०, मूळ झारखंड) याचा दंडुक्याने ठेचून खून करण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी विनोद विठोबा खुटकर (४२) रा. खुटकरवाडा, काले याला संशयावरून कुडचडे पोलिसांनी अटक केली आहे. कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विनोद व मयत निखिल हे ... Read More »

सकलांचा उद्धारकर्ता श्रीगोपालकृष्ण

– प्रा. रमेश सप्रे श्रीकृष्णानं सज्जनांचं रक्षण (परित्राणाय साधूनाम्) आणि दुष्टदुर्जनांचं निर्दालन (विनाशाय च दुष्कृताम्) करून धर्मसंस्थापनेचं युगकार्य केलं. तो जसा ‘संभवामि युगे युगे’ असा परमेश्‍वरी शक्तीचा अवतार होता तसाच जनगणमनाचा अधिनायक होता. खरा भारतभाग्यविधाता होता. म्हणूनच त्याच्या जयंतीनिमित्तानं त्याचा जयजयकार करत म्हणू या – जय हे जय हे जय हे! श्रावण वद्य अष्टमी ही श्रीकृष्णाची जन्मतिथी. रात्री बारा वाजता ... Read More »

मानव – निसर्ग ः एक अतूट नातं

– दासू शिरोडकर झाडं आणि निसर्ग हा माणसाचा सर्वश्रेष्ठ असा मित्र आहे. एक वेळ आपण आपलं सर्वस्व पणाला लावून लाडाने वाढविलेली आपली मुलं मोठी झाल्यावर आम्हाला विसरतील; पण प्रेमाने लावलेली आणि निष्ठेने वाढविलेली झाडं माणसाला कधीच दगा देत नाहीत, त्याची कधी फसगत करीत नाहीत. कारण माणसांप्रमाणे त्यांच्या ठायी हेवेदावे आणि स्वार्थ असत नाहीत. मला गंमत वाटते, माणसांना आज ‘झाडे लावा..’ ... Read More »