Daily Archives: August 11, 2017

घरचा अहेर

कॉंग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वाचीच लढाई सध्या लढत असून पक्ष चालवण्याचे जुने मंत्र यापुढे चालणार नाहीत; कॉंग्रेसला बदलावे लागेल, अशी परखड कबुली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतीच जाहीरपणे दिली आहे. जयराम रमेश हे कॉंग्रेसचे एक बुद्धिमान नेते गणले जातात. त्यांच्यासारखी पक्षाची ‘थिंक टँक’ असलेली व्यक्ती जेव्हा अशा प्रकारची प्रतिक्रिया देते, तेव्हा पक्षाने ती गांभीर्याने विचारात घेणे अपेक्षित आहे. राहुल ... Read More »

म्हादई ः कर्नाटकाचे पितळ उघड

>> वन-पर्यावरण मंत्रालयाचा ना हरकत दाखलाच नाही कळसा व भंडूरा प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्नाटक सरकारला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचा ना हरकत दाखला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात म्हादई बचाव अभियानच्या अर्जावर झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट झाले असून त्यामुळे न्यायालयाने कर्नाटक सरकार व केंद्र सरकारला वरील दाखल्याच्या बाबतीत येत्या दि. १४ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अभियानचा दावा भक्कम बनलेला असून ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आल्तिनो येथील कोपरा बैठकीत मतदारांशी संवाद साधताना पर्रीकर. Read More »

पणजी, वाळपईतील मतदारांसाठी २३ रोजी सुटी

गोवा सरकारने पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदाना दिवशी दि. २३ ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपई मतदारसंघातील कार्यालयांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. तसेच पणजी आणि वाळपई मतदारसंघातील मतदार असलेले सरकारी कर्मचारी, औद्योगिक कर्मचारी, सरकारी आणि औद्योगिक रोजंदारीवरील कर्मचारी, खाजगी व्यावसायिक आणि औद्योगिक कर्मचारी, खाजगी आस्थापनांतील सर्व कर्मचारी आणि विविध व्यवसाय, व्यापार आणि उद्योगात काम करणार्‍या रोजंदारीवरील कामगारांसाठी ही ... Read More »

प्रणॉय १५व्या स्थानी

युएस ओपन विजेता भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने काल गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या डब्ल्यूटीए क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती साधताना १५वे स्थान मिळविले आहे. त्याच्या खात्यात ४७२९५ गुण आहेत. पीव्ही सिंधू व किदांबी श्रीकांत यांनी आपले पाचवे व आठवे स्थान कायम राखले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूच्या खात्यात ७६९४६ तर सोळाव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालच्या खात्यात ४६९०० गुण आहेत. पुरुष ... Read More »

आनंद संयुक्त अव्वल

भारताचा पाचवेळचा विश्‍वविजेता ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सिंक्विफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाचत्ची याचा पराभव करत संयुक्तपणे पहिले स्थान मिळविले आहे. पांढर्‍या मोहर्‍यांसह खेळताना आनंदने बहारदार विजयासह आपली गुणसंख्या ४.५ केली आहे. केवळ दोन फेर्‍या शिल्लक असताना मॅक्सिम वाचिएर लाग्रेव व लेवोन अरोनियन यांच्यासह तो पहिल्या क्रमांकावर आहे. नेपोमनियाचत्ची याने काल सिसिलियन ... Read More »

स्टोनमन, क्रेन इंग्लंड संघात

वेस्ट इंडीजविरुद्ध एजबेस्टन येथे १७ ऑगस्टपासून खेळविल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने सरेतर्फे काऊंटी क्रिकेट खेळणारा सलामीवीर मार्क स्टोनमन व हॅम्पशायरचा लेगस्पिनर मेसन क्रेन याचा समावेश केला आहे. या दोघांनी अनुक्रमे किटन जेनिंग्स व डावखुरा फिरकीपटू लियाम डॉसन यांची जागा घेतली आहे. क्रेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थोडाफार अनुभव असून स्टोनमन याने अजून पदार्पण केलेले नाही. अष्टपैलू ख्रिस वोक्स याचे दुखापतीतून ... Read More »

भारताचा पराभवाने प्रारंभ

फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताला इराणकडून १०१-५४ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. इराणकडून माजी एनबीए खेळाडू हमाद हद्दादी याने २० गुण व ८ सहाय्य अशी भरीव कामगिरी करताना भारतीयांना संधी दिली नाही. इराणकडून हद्दादी व्यतिरिक्त जमशिदी जाफराबादी (१८), काझेमी (१०), सहाकियान (१६) व माशायेकी (१६) यांनी हद्दादीला सुरेख साथ दिली. भारताकडून अमज्योत गिल याने सर्वाधिक १० ... Read More »