Daily Archives: August 10, 2017

लोकशाही जिंकली

अहमद पटेल यांची राज्यसभा सदस्यत्वाची नुकतीच झालेली निवडणूक ही देशाच्या इतिहासामध्ये भारतीय लोकशाहीची ध्वजा उंचावणारी निवडणूक म्हणून नोंदवली जाईल. आपल्याच कॉंग्रेस पक्षाच्या दोघा आमदारांनी विरोधी पारड्यात मते टाकली असूनही त्यांना ही निवडणूक जिंकता आली हे खरोखरच भारतीय लोकशाही अद्याप जिवंत असल्याचे लक्षण आहे. ज्या दोघा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मते टाकून रातोरात निष्ठा बदलली, त्यांनी निर्लज्जपणे आपल्या विकाऊपणाचे प्रदर्शन ... Read More »

भारत-चीन युद्धाचे काऊंटडाऊन सुरू

>> डोक्लाम प्रश्‍नावरून चीनची पुन्हा धमकी डोक्लाम प्रश्‍नावरून भारत-चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताकडून शांततेच्या मार्गाने प्रयत्न केले जात असताना चीनने पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली असल्याने युद्धाचे ढग कायम आहेत. चिनी सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘चायना डेली’ने ‘भारत आणि चिनी लष्करातील संघर्षाचे काऊंटडाउन सुरू झाले आहे,’ अशा शब्दांमध्ये काल पुन्हा धमकी दिली आहे. चीन व भारत यांच्यामधील युद्धाची केव्हाही ... Read More »

वाघेलांसह ८ आमदारांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसने शंकरसिंह वाघेला यांच्यासह आठ आमदारांची हकालपट्टी केली. या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसने कारवाई केली आहे. कॉंग्रेसने हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदारांमध्ये शंकरसिंह वाघेला, त्यांचा मुलगा महेंद्रसिंह वाघेला, राघवजी पटेल, भोला गोहिल, धर्मेंद्र जाडेजा, पी. के. रौलजी, अमित चौधरी, करण ... Read More »

सर्वपक्षीय उमेदवार न ठरल्याने ‘गोसुमं’ रिंगणात : वेलिंगकर

पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकर यांच्याविरुध्द निवडणूक रिंगणात सर्वपक्षीय उमेदवार असावा यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच व गोवा सुरक्षा मंचने प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न फलदायी होऊ न शकल्याने गोवा सुरक्षा मंचने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यासंबंधी आम्ही काही पक्षांकडे संपर्क साधल्याच्या प्रश्‍नावरून भाजपने आमच्यावर टीका केली, असे ... Read More »

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित : कॉंग्रेस

पणजी व वाळपई मतदारसंघात भाजपने विकासच केलेला नसल्याने दोन्ही ठिकाणी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचा दावा कॉंग्रेसने काल पत्रकार परिषदेत केला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक हे पणजीत काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की भाजपने पणजी तसेच वाळपई मतदारसंघाचा विकास केलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पराभव हा ठरलेलाच आहे. पुढे बोलताना नाईक म्हणाले की, ... Read More »

देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे पणजीत १४ पासून आयोजन

भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने गोवा मनोरंजन सोसायटीने १४, १५ व १६ ऑगस्ट असे तीन दिवस देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ‘याद करो कुर्बानी’ असे या महोत्सवाला नाव देण्यात आले आहे. दि. १४ रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यादिवशी ‘लोकमान्य’ ... Read More »