Daily Archives: August 9, 2017

खाणींवरची अंदाधुंदी

महालेखापालांच्या ताज्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालामध्ये राज्यातील खाण क्षेत्रातील बजबजपुरीवर झगझगीत प्रकाश टाकला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या अहवालामध्येही यातील काही त्रुटींवर महालेखापालांनी बोट ठेवले होते. राज्य सरकारच्या खाण खात्याच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर आणि खाण व्यवसायावर अंकुश ठेवण्यात या खात्याला सातत्याने आलेल्या अपयशावर महालेखापालांनी नेमके बोट ठेवलेले दिसते. या त्रुटींमुळे जाणता वा अजाणता खाण व्यावसायिकांकडून घडलेल्या गैरव्यवहारामुळे सरकारला कोट्यवधींच्या महसुलाला मुकावे ... Read More »

राज्य सहकारी बँकेचा कर्मचारी कपातीचा निर्णय

>> १२५ कर्मचार्‍यांना सक्तीने स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव >> पाच शाखाही बंद करणार गोवा राज्य सहकारी बँकेने नुकसानीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून बँकेतील सुमारे १२५ कर्मचार्‍यांना ज्यादा ठरवून त्यांच्यासाठी स्वेच्छा व सक्तीने निवृत्त करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्याचबरोबर बँकेच्या पाच शाखा बंद करून त्यांचे सक्षम असलेल्या अन्य शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ... Read More »

स्मार्ट सिटीमुळे कर्जाचा बोजा : कॉंग्रेस

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार गोवा सरकारला केवळ ५० टक्के निधीच देणार असल्याने उर्वरित ५० टक्के निधी गोवा सरकारला उभारावा लागणार आहे. त्यामुळे गोवा कर्जाच्या खाईत बुडण्याची भीती आहे, असे माजी राज्यसभा खासदार व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. स्मार्ट सिटीसाठी लागणारा उर्वरित ५० टक्के निधी कसा उभारणार हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ... Read More »

‘त्या’ वादग्रस्त जागेवर राममंदिराची उभारणी व्हावी

>> शिया वक्फ बोर्डाचे प्रतिज्ञापत्र वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याशिवाय राम मंदिरापासून थोड्या अंतरावर मुस्लीम बहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या खटल्याची सुनावणी ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची ... Read More »

पोटनिवडणूक : महापालिका मार्केटच्या सफाईने गोवा सुरक्षा मंचाचा प्रचार सुरू

पणजी पोटनिवडणुकीसाठीचा आपला प्रचाराचा नारळ अभिनव पद्धतीने फोडताना काल गोवा सुरक्षा मंचने पणजी महापालिका मार्केटची साफसफाई करून तेथील कचरा उचलला. यावेळी बोलताना पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी या पोटनिवडणुकीत लोकांनी गोवा सुरक्षा मंचचा उमेदवार या नात्याने आपणाला निवडून दिल्यास पणजी शहर चकाचक करण्याचे आश्‍वासन लोकांना दिले. यावेळी श्री. शिरोडकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री व पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्यावर ... Read More »

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीवरून महाभारत

गुजरातमधून राज्यसभेवर जाण्यासाठी झालेल्या निवडणुकीने काल सायंकाळी नाट्यमय वळण घेतल्याने रात्री उशीरापर्यंत निवडणुकीची मतमोजणी सुरूच होऊ शकली नाही. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी मतपत्रिका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दाखविल्याचा आरोप करून कॉंग्रेसने ती मते बाद करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांची तीन शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन भूमिका मांडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आयोगाने निकाल दिला नव्हता. ... Read More »