Daily Archives: August 8, 2017

निर्वाणीची लढाई

स्वीस बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवणार्‍यांची झोप उडवून देणारा करार तेथील सरकारने जगातील विविध देशांशी केलेला आहे. त्यानुसार अशा प्रकारची ठेव जर ठेवली जात असेल तर त्यासंबंधीची माहिती ‘रिअल टाइम’ मध्ये म्हणजे त्याच वेळी संबंधित सरकारला पुरविण्याची तरतूद या नव्या करारामध्ये आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की ही माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होणार की नाही? नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर ... Read More »

मद्यालयांना अभय देणारे महामार्ग दुरुस्ती विधेयक मंजूर

>> सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचा फटका बसलेली मद्यालये वाचणार राज्यातील महामार्गांपासून पाचशे मीटरपर्यंतच्या परिघात असलेल्या मद्यालयांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंदीला सामोरे जावे लागले असून त्यांना या बंदीपासून अभय देणारे गोवा महामार्ग दुरुस्ती विधेयक २०१७ काल विधानसभेत सर्वांनुमते संमत करण्यात आले. ह्या विधेयकात गोव्यातील राज्य मार्ग हे शहरी मार्ग ठरवण्याची तरतूद आहे. या विधेयकाचे काल विरोधकांनीही गोवा विधानसभेत स्वागत केले. यावेळी ... Read More »

माडाला राज्य वृक्षाचा दर्जा देणार्‍या कायद्याला मंजुरी

माडाला जो गवताचा दर्जा देण्यात आला होता तो रद्द करून त्याला झाड ठरवणे व त्याला राज्य वृक्षाचा दर्जा देणे यासाठी गोवा वृक्ष संवर्धन दुरुस्ती विधेयक २०१७ काल गोवा विधानसभेत संमत करण्यात आले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, जर एखादे माडाचे झाडे जुने झालेले असेल अथवा कोसळण्याच्या स्थितीत असेल अथवा ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ते कापून त्या ठिकाणी चांगल्या ... Read More »

रक्षाबंधन सण काल राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राखी बांधताना डॉ. केशव बळीराम हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी. Read More »

बायणा समुद्रात बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला

खोल समुद्रात मासेमारी करताना रविवारी सकाळी समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडून नंतर पाण्यात फेकल्या गेल्याने बेपत्ता असलेल्या श्रीकांत यादव (२५) या मच्छीमाराचा मृतदेह काल बायणा समुद्रात खडकाळ भागात सापडला. रविवारी समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एक डिंगी मच्छिमारी नौकेवरील नऊ पैकी दोघे पाण्यात फेकले गेले होते. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले होते. तर श्रीकांत यादव हा मच्छीमार बेपत्ता झाला होता. वास्को पोलीस ... Read More »

पोटनिवडणूक : पणजीत ४ तर वाळपईत ३ अर्ज ग्राह्य

>> अर्जांची छाननी पूर्ण; उद्या होणार चित्र स्पष्ट >> निवडणूक आयोगाचे निरीक्षक गोव्यात दाखल विधानसभेच्या वाळपई व पणजी मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी काल पूर्ण झाली असून पणजी मतदारसंघात ४ तर वाळपईत ३ मिळून एकूण ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. उद्या दि. ९ रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने खरे चित्र ९ नंतरच स्पष्ट होणार आहे. पणजीत भाजपचे उमेदवार ... Read More »

इमारतीचे काम सुरू असल्याने न्यायालये भाडेपट्टीवरील जागेत

>> कायदा मंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण सध्याच्या काळात नवी न्यायालये येत आहेत. त्यामुळे जागा भाड्यानेच घ्यावी लागते. मेरशी येथे न्यायालय संकुलाचे काम सुरू आहे. ते काम २०१८ अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पणजीतील जिल्हा सत्र व अन्य न्यायालये तेथे जाईल. त्यानंतर भाड्याने जागा घेण्याचा प्रश्‍नच राहणार नाही, असे कायदामंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी काल विधानसभेत कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्या प्रश्‍नावर सांगितले. म्हापसा ... Read More »

युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन

– डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा) सरस्वती रेल्वेचा प्रवास करून सहकुटुंब गोव्याला सुट्टी घालवायला येत होती. पण झाले भलतेच तिला दुसर्‍या दिवशीच अगदी सणकुन ताप भरला आणि मग सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडले. कारण सरस्वतीच्या आजारामुळे तिच्या सोबत असलेल्या इतर मंडळींना देखील निसर्गरम्य गोव्याची मजा उपभोगता आली नाही. सरस्वतीला लघवीला देखील जळजळ होत होती, ताप काही केल्या उतरत नव्हता म्हणून शेवटी डॉक्टरांचा ... Read More »

आतड्यांचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. कर्करोगाची अवस्था, रुग्णाचे वय, बल इत्यादीवरून चिकित्सा ठरवावी लागते. गाठीचे शस्त्रक्रियेद्वारे निर्हरण (काढून टाकणे) करणे ही प्रमुख चिकित्सा होय. किमोथेरपी व रेडिओथेरपी सुद्धा द्यावी लागते. आयुष्याच्या कोणत्याही कालखंडांमध्ये कर्करोग होऊ शकतो. आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. निर्व्यसनी कर्करोगग्रस्त रुग्णांची नेहमी तक्रार असते- मला तंबाखू, मद्यपानाचे कुठलेच व्यसन नाही तरीपण ... Read More »