Daily Archives: August 7, 2017

व्यंकय्यांचा विजय

भारताचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून अखेर व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. एकाच सत्ताधारी पक्षाचे सदस्य राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभा सभापती या तिन्ही महत्त्वपूर्ण घटनात्मक पदांवर आरूढ होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. वरील पदांवरील व्यक्तीने पक्षातीत व्यवहार करावा अशी अपेक्षा असते आणि वरील सर्वांना त्याची नक्कीच जाण आहे. मात्र, ही मंडळी केवळ एका पक्षाचीच आहेत असे नव्हे, तर एकाच विचारधारेच्या मुशीतून ... Read More »

अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या गेल्या १० जुलै रोजीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केल्याची माहिती काल जम्मू – काश्मीर पोलिसांतर्फे देण्यात आली. हा हल्ला प्रत्यक्ष घडवून आणलेल्या लष्करे तैयबाच्या (एलईटी) चार दहशतवाद्यांना या तिघा संशयितांनी या कामी मदत केली अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनिर खान यांनी दिली. या हल्ल्यात ८ यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते. यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी ... Read More »

केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांची भाकपवर टीका

केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी काल केरळमधील सत्ताधारी भाकप (मार्क्सवादी) सरकारवर जोरदार टीका केली. भाकप कार्यकर्त्यांनी एका स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या केल्याचा आरोप असून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या राजेश या युवकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जेटली येथे आले होते. भाकप कार्यकर्त्यांकडून प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम सुरू असून राज्यात हिंसेचे वातावरण तयार करण्यात येत असल्याचा आरोप जेटली यांनी केला. या ... Read More »

बायणा समुद्रात मच्छिमार बुडाला

खोल समुद्रात मासेमारी करून काल सकाळी ९ वा. परतत असताना काटे बायणा येथे समुद्र किनार्‍यालगत अवघ्या २० मीटर अंतरावर समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एका डिंगी मच्छिमारी नौकेवरील नऊ पैकी दोघे पाण्यात फेकले गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. मात्र श्रीकांत यादव (वय २५) हा मच्छिमार बेपत्ता झाला. प्राप्त माहितीनुसार काल पहाटे ६ वाजता नागा तांडेल हे आपली डिंगी व मच्छिमारी ... Read More »

स्वीस बँकेतील खात्यांची माहिती उघड होणार

ज्या भारतीय नागरिकांनी स्वीस बँकेतील आपल्या खात्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा ठेवला आहे त्यांची माहिती भारत सरकारला मिळणे आता एका कारणामुळे शक्य होणार आहे. अशा माहितीच्या देवाण-घेवाणीविषयीचा करार झाला असल्याने स्वीस बँकेतील भारतीय खाते धारकांची गोपनीय माहिती भारत सरकारला मिळणार आहे. अशा खात्याविषयीची माहिती सातत्याने स्वित्झर्लंड सरकार भारताला देणार आहे. या अनुषंगाने उभय देशांदरम्यान करार झालेला असल्याचे काळा पैसा दडवून ठेवलेल्यांमध्ये ... Read More »

‘ते’ ४४ आमदार आज बंगळुरूहून गुजरातेत

येथील एका हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठेवण्यात आलेले गुजरातमधील ४४ कॉंग्रेस आमदार आज गुजरातला रवाना होणार आहेत. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर या आमदारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी होती. मात्र याच दरम्यान प्राप्ती कर खात्याने शिवकुमार यांच्या विविध ठिकाणांवर सुमारे ३ दिवस छापे घालून ११ कोटी रुपयांची रोकड जप्त केले. गुजरातमधील कॉंग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्याने स्थानिक नेतृत्वाने भाजपवर ... Read More »

भक्तिविजय

– सौ. पौर्णिमा केरकर आता या वैज्ञानिक युगातही भक्तीची भावना माणसांना ईश्‍वराशी जोडते आहे. प्रापंचिक चढ-उतार आहेतच. सामाजिक व्यवस्थेत मनाविरुद्ध खूप गोष्टी कराव्या लागतात. तरीसुद्धा माणूस माणसाला मुक्तपणे भेटावा एवढे सामर्थ्य ‘भक्तिविजय’सारख्या ग्रंथाच्या पारायणात निश्‍चितच आहे. ‘हरिविजय’, ‘भक्तिविजय’, ‘पांडवप्रताप’ इ. अनेक ग्रंथांची नावे नकळत्या वयापासून ओळखीची झाली होती. घरात कट्टर धार्मिक वातावरण नसले तरी श्रावणात या ग्रंथांची भक्तिभावाने केली जाणारी ... Read More »

सायबर क्राईमचा बागुलबुवा

– भागवत सोनावणे (आयटी तज्ज्ञ) नोटाबंदीनंतर भारत डिजिटायझेशनच्या दिशेनं झपाट्यानं गेला पाहिजे असा आग्रह सरकारी पातळीवर धरला जाऊ लागला. मात्र असा आग्रह धरत असताना त्यासाठी संपूर्ण नियोजन आणि जनतेची भक्कम पूर्वतयारी करवून घेणं या अत्यावश्यक बाबी असतात याचा विसर सरकारला पडला आणि त्यामुळेच सायबर क्राईमच्या प्रमाणात झालेली वाढ कशी रोखावी हा यक्षप्रश्‍न बनला. आजघडीला कळीच्या बनलेल्या या प्रश्‍नाचा खास वेध. ... Read More »