Daily Archives: August 5, 2017

शांततामय तोडगा

भारत आणि चीन दरम्यान चिघळलेल्या सीमावादावर शांततापूर्ण मार्गाने आणि राजनैतिक माध्यमातून तोडगा काढण्याची इच्छा भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेतील आपल्या भाषणात व्यक्त केली आहे. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याची जबाबदारी आता चीनची आहे. सिक्कीममधील दोकलाममध्ये भारतीय सैनिकांना केली गेलेली आडकाठी आणि नुकतीच उत्तराखंडमधील बाराहोतीमध्ये चिनी सैनिकांनी केलेली घुसखोरी या दोन्ही घटनांतून उभय देशांतील संबंध ... Read More »

दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत सुधारणा करणार ः आरोग्यमंत्री

आरोग्य खात्याच्या दीनदयाळ विमा स्वास्थ्य योजनेतील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा करण्याचे तसेच आणखी काही आजारांवरील उपचार व आणखी नवीन इस्पितळे या योजनेखाली आणण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत दिले. निलेश काब्राल व इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्याच्या हेतूनेच सरकारने जिल्हा इस्पितळे, प्राथमिक व सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ... Read More »

आयटी उद्योगांसाठी स्टार्ट अप धोरणाचा लवकरच शुभारंभ

आयटी उद्योगांसाठीचे ‘स्टार्ट अप’ धोरण तयार केलेले आहे. या धोरणाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. आम्हाला इनक्युबेशन सेंटर्स त्यासाठी हवी आहेत. गोव्यात जास्त जमीन नाही. त्यामुळे मोठमोठ्या आयटी कंपन्यांना गोव्यात आणणे आम्हाला शक्य नाही. पणजीत इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे, असे आयटी खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी काल आयटी खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले. आयटी खात्याला पुढे नेण्यासाठी सरकारने गोवा ... Read More »

उपराष्ट्रपतीपदासाठी आज संसदेत मतदान

भारताचे नवे उपराष्ट्रपती एनडीएचे व्यंकय्या नायडू की विरोधी पक्षांचे गोपालकृष्ण गांधी याचा फैसला आज संध्याकाळी होणार आहे. उपराष्ट्रपती निवडण्यासाठी लोकसभा व राज्यसभा खासदार आज संसदेत मतदान करणार आहेत. मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने कोणत्याही पक्षाला व्हिप काढता येणार नाही. सत्ताधारी एनडीएचे लोकसभेत बहुमत असल्याने त्यांचे उमेदवार व्यंकय्या नायडू हेच उपराष्ट्रपती बनतील असे मानले जाते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार असलेल्या रामनाथ ... Read More »

मृत्यू दाखल्यांसाठीही आधार बंधनकारक

>> देशभरात १ ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी आता एखाद्याच्या मृत्यूची नोंदणी करण्यासाठीही आधार कार्ड क्रमांक बंधनकारक होणार आहे. या संदर्भात केंद्रीय गृह खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार येत्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम व मेघालय या तीन राज्यांसाठी या अंमलबजावणीची वेगळी तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. निकटवर्तियाच्या मृत्यू दाखल्याची मागणी करणार्‍या व्यक्तीला अर्जासोबत मयताचा आधार क्रमांक किंवा ... Read More »

गिरीश, रॉयची उमेदवारी दाखल

गोवा विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर तर वाळपई मतदारसंघातून आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरुद्ध चोडणकर तर वाळपईत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या विरुद्ध रॉय नाईक अशी लढत होणार आहे. पणजीतून गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर हेही ... Read More »

कोणावरही खटले घालणार्‍या वीज खात्याच्या अभियंत्याची चौकशी होणार

>> दक्षता, एसीबी पोलिसांमार्फत चौकशी ः मुख्यमंत्री सरकारी सेवेत असतानाही गुप्तता कायद्यासह सर्व नियमांचे उल्लंघन करून मिळेल त्याच्यावर न्यायालयात, मानवी हक्क आयोग, हरित लवाद अशा ठिकाणी खटले दाखल करणारे वीज खात्याचे अभियंता काशिनाथ शेटये यांची दक्षता खाते, भ्रष्टाचार विरोधी पोलीस तसेच केंद्र सरकारच्या पातळीवरील अधिकार्‍याची नियुक्ती करून चौकशी करण्याचे व योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल ... Read More »

नाते .. न तुटणारे

– रश्मिता सातोडकर भाऊ-बहीण हे नातं फक्त म्हणण्यापुरतेच न ठेवता त्या नात्यामध्ये जिवंतपणा आणला पाहिजे. जेव्हा अत्याचार घडताना दिसतो तेव्हा डोळे बंद मिटून न ठेवता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तरच राखी बांधताना, ओवाळणी करताना बहिणीला दिलेलं वचन सार्थ ठरेल. श्रावण, भाद्रपद म्हणजे सण-उत्सवांचे दिवस. पावसाच्या तालाबरोबर सुरू झालेले आपले आवडते वेगवेगळे सण. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर उज्ज्वल आणि निर्मळ ... Read More »

कोकणी नाट्यप्रेमी ‘महेश नायक’

– शब्दांकन ः नीला भोजराज काही व्यक्ती या निश्‍चितपणे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात. त्यामध्ये त्यांना एकप्रकारचा आनंद तर मिळत असतोच, पण समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं याचं पुरेपूर भान असल्यामुळेच ते त्यांचं कार्य निःस्वार्थपणे पुढे नेत असतात. शांतिनेज, पणजी येथे राहणारे श्रीयुत् महेश चंद्रकांत नायक हेसुद्धा याच पठडीतले. कोकणी भाषा शिकण्याची तसेच तीच आपली मातृभाषा आहे… हे ... Read More »