Daily Archives: August 4, 2017

वचनपूर्ती

‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ च्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाची साथ देणार्‍या गोवा फॉरवर्डने आपल्या दोन प्रमुख मागण्या पदरात पाडून घेतल्या आहेत. कूळ कायद्याची प्रकरणे दिवाणी न्यायालयांकडून पुन्हा मामलेदारांच्या महसुली न्यायालयाकडे वळवणे आणि नारळाला राज्य वृक्षाचा दर्जा बहाल करणे ही दोन्ही आश्वासने गोवा फॉरवर्डने जनतेला दिली होती. सरकारमध्ये सहभागी होताना सरकारच्या किमान समान कार्यक्रमामध्येही या दोन गोष्टी प्राधान्याने पहिल्या दोन क्रमांकावर ... Read More »

शैक्षणिक विकासासाठी शिक्षण निधी मंडळ

>> शिक्षण, आरोग्य व स्वच्छ भारत या कार्यक्रमांसाठी सहकार्याचे मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन शिक्षणाच्या विकासासाठी सरकार शिक्षण निधी मंडळ उभारणार असल्याचे शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत शिक्षण खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले. या मंडळाला १०० ते १५० कोटी रुपये एवढा निधी देण्यात येईल व तो सदर वर्षी खर्च करता आला नाही तर तो रद्द होणार नसून पुढील वर्षीही वापरता येईल, ... Read More »

म्हादई : न्यायालयात कर्नाटकची पुन्हा नामुष्की

म्हादई प्रश्‍नी गोव्याची बाजू लवादासमोर भक्कम झालेली असताना म्हादई बचाव अभियानाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काल कर्नाटकाने आपले उत्तर देण्यास असमर्थता दाखवताना एका आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात काल न्यायमूर्ती मदन लोकुर व दीपक गुप्ता यांच्यासमोर म्हादईची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकाला गेल्या ९ वर्षात (फेब्रु. २००९ ते आजपर्यंत) घटना झाल्या त्याचा सविस्तर ... Read More »

चार वर्षांत कोमुनिदादी स्वावलंबी बनणार : खंवटे

सरकारने कोमुनिदादीसांठी अनुदान योजना तयार केल्याने पुढील चार वर्षांत सर्व कोेमुनिदादी स्वावलंबी बनणार असल्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत सांगितले. कोमुनिदाद जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केलेल्यांची चौकशी चालू असून पुढील तीन महिन्यांत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या मूळ प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली. सरकारने वरील प्रकारांच्या तपासासाठी चौकशी आयोग स्थापन केला आहे. या ... Read More »

पाक-चीनबरोबर युध्दाची शक्यता नाही

>> राज्यसभेत सुषमा स्वराजांचे भाष्य भारताचे नजीकच्या भविष्यात पाकिस्तान किंवा चीनशी युध्द होण्याची शक्यता भारताच्या विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल राज्यसभेत नाकारली. विरोधकांनी केंद्र सरकारच्या विदेश धोरणाविषयी विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना स्वराज यांनी कोणत्याही देशाबरोबरील प्रश्‍न युध्दाने सुटू शकत नाही असे स्पष्ट केले. युध्द झाल्यानंतरही तोडग्यासाठी बोलणी करावी लागतात. त्यामुळे राजनैतिक पातळीवरून प्रश्‍न सोडवण्यातच शहाणपण आहे याकडे त्यांनी लक्ष ... Read More »

मंत्र्याच्या ठिकाणांवर छापासत्र सुरूच

कर्नाटकात सहा वेळा आमदारपदी निवडून आलेले विद्यमान मंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तांवरील छापासत्र काल दुसर्‍या दिवशीही चालू राहिले. प्राप्ती कर खात्याच्या या छाप्यांमध्ये आतापर्यंत ११.४३ कोटी रुपयांची रक्कम सापडली असल्याचे खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. Read More »

भारत पहिल्याच दिवशी भक्कम स्थितीत

>> पुजारा, रहाणेची नाबाद शतके चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार नाबाद शतकांसह चौथ्या विकेटसाठी केलेल्या २११ धावांच्या अविभक्त भागिदारीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ गड्यांच्या मोबदल्यात ३४४ अशी धावसंख्या उभारत आपली बाजू भक्कम केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे दमदार शतकांसह नाबाद खेळत होते. तीन कसोटीच्या या मालिकेत भारताने ... Read More »

सरदार, देवेंद्रची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

>> अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूी नावे भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाझरिया यांची प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच अर्जुन पुरस्कारांसाठी एकूण १७ खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. सरदार सिंह याची यापूर्वीही या पुरस्कारसाठी शिफारस झाली होती. सरदार सिंह हा भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या ... Read More »

सीआयआय गोवा परिषदेकडून शिखा पांडेचा सत्कार

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (वेस्टर्न रिजन)च्या गोवा राज्य परिषदेतर्फे आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना चकमकदार कामगिरी केलेल्या गोव्याच्या शिखा पांडेचा धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सीआयआय (डल्बूआर) स्पोटर्‌‌स इनिशिएटिव्सचे चेअमरन श्रीनिवास धेंपो यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागले होते. परंतु या स्पर्धेती भारतीय ... Read More »