Daily Archives: August 3, 2017

राजकीय सूड?

गुजरातमधील ४२ कॉंग्रेस आमदारांचा कर्नाटकमधील आपल्या रिसॉर्टमध्ये पाहुणचार करणार्‍या डी. के. शिवकुमार या कॉंग्रेस नेत्यावर आयकर खात्याने काल टाकलेले छापे त्यामागील इराद्यांबाबत संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहेत. शिवकुमार यांच्या कर्नाटकमधील ग्रॅनाईटच्या खाणी आणि इतर अवैध व्यवसायांसंदर्भातील जुन्या प्रकरणांसंदर्भात हे छापे टाकण्यात आले असल्याचा दावा जरी सरकारने केलेला असला, तरीही नेमके शिवकुमार यांना लक्ष्य केले जाणे हे निव्वळ सूडाचे राजकारण ... Read More »

कॉंग्रेसतर्फे पणजीतून गिरीश, वाळपईतून रॉय

कॉंग्रेस पक्षातर्फे पणजीतून कॉंग्रेसचे अखिल भारतीय सचिव गिरीश चोडणकर व वाळपईतून कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले. चोडणकर हे शुक्रवारी दुपारी ३ वाजता तर रॉय नाईक हे त्याच दिवशी सकाळी ... Read More »

कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू देणार नाही ः मुख्यमंत्री पर्रीकर

म्हादई प्रकरणी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका सादर केलेली असली तरी चिंता करण्याचे कारण नसून गोवा सरकार यापुढेही गंभीरपणे आपली बाजू मांडणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. शून्य तासाला आमदार प्रतापसिंह राणे यांनी हा प्रश्‍न मांडला होता. म्हादई प्रश्‍नी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका सादर केली असल्याचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी काल शून्य तासाला सभागृहाच्या ... Read More »

एमपीटीला कोळसा हाताळणी वाढवू देणार नाही

एमपीटीतील कोळसा हाताळणीमुळे मुरगांव तालुक्यात जे प्रदूषण होत आहे त्यासंबंधीचा अभ्यास अहवाल हाती येईपर्यंत येथे येणार्‍या ७.५ दशलक्ष टन कोळशाची हाताळणी १५ दशलक्ष टन एवढी वाढवू देण्यात येणार नसल्याचे पर्यावरणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले. आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पर्यावरणाविषयक अभ्यास अहवाल येईपर्यत वाढीव कोळसा हाताळणीला ... Read More »

कर्नाटकच्या मंत्र्याच्या ठिकाणांवर छापे

>> १० कोटी रुपये सापडले गुजरातमधील ४४ कॉंग्रेस आमदार वास्तव्यास असलेल्या बंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये त्या आमदारांची व्यवस्था पाहणारे कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. शिवकुमार यांच्या ३९ ठिकाणांसह अनेक मालमत्तांवर काल प्ताप्ती कर खात्याने छापे टाकले. कर चुकवेगिरीप्रकरणी टाकलेल्या या छाप्यांमध्ये अधिकार्‍यांना सुमारे दहा कोटींची रोकड सापडली. याप्रकरणी कॉंग्रसने तीव्र संताप व्यक्त केला असून संसदेतही मोठा गदारोळ झाला. छापे टाकले त्यावेळी मंत्री शिवकुमार ... Read More »

कृषी कूळ दुरुस्ती विधेयक संमत

>> कृषी भू लवाद स्थापनेची विधेयकात तरतूद न्यायालयाकडे असलेली कुळांची प्रकरणे पुन्हा मामलेदारांकडे आणण्याची तरतूद करणारे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी मांडलेले कृषी कूळ दुरुस्ती विधेयक काल विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. त्यामुळे या प्रश्‍नावर निर्माण झालेला वाद संपुष्टात आला आहे. या विषयावर कृषी भू लवाद स्थापन करण्याचीही विधेयकात तरतूद आहे. राज्यातील कुळांचा कूळ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यास विरोध होता. या प्रश्‍नावर ... Read More »

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात

>> कर्जदारांना मासिक हप्त्यांबाबत दिलासा शक्य रिझर्व्ह बँकेने काल एका निर्णयाद्वारे रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे गृह कर्ज किंवा अन्य कर्ज घेणार्‍यांना दिलास मिळणार आहे. कारण बँकांकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता ... Read More »

डिचोलीत शॉर्ट सर्किटमुळे हार्डवेअर दुकानाला आग

>> ५ लाखांचे नुकसान डिचोली येथील दीनदयाळ भवनाच्या खाली असलेल्या सिद्धी सिरेमिक्स या हार्डवेअर दुकानाला काल दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५ लाखांहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला. डिचोली अग्निसमन दलाचे जवान त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळळा. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने सुमारे ५० लाखाहून अधिक किमतीची मालमत्ता वाचवली. दुपारी ३ च्या दरम्यान दुकान बंद ... Read More »