Daily Archives: August 1, 2017

नवी विटी, तोच डाव

पाकिस्तानच्या नव्या अंतरिम पंतप्रधानाची निवड आज होणार आहे. नवाझ शरीफ आणि परिवाराला सर्वोच्च न्यायालयाने जरी पनामा पेपर्स प्रकरणी दोषी धरले असले आणि निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवले असले तरी अद्याप त्यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाज पक्ष तेथे प्रचंड बहुमतात आहे. त्यामुळे शरीफ हे पदावरून पायउतार झालेले असले तरी त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाणे अपरिहार्य आहे. आज शाहिद ... Read More »

प्राप्ती कर विवरण भरण्यास ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

प्राप्ती कर खात्याने एका आदेशान्वये २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्ती कर परतावा भरण्यासाठीची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. यासाठीची मुदत काल दि. ३१ जुलै रोजी संपली होती. प्राप्ती कर खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटीहून अधिक जणांनी प्राप्ती कर परतावे सादर केले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आधार व पॅन कार्ड जोडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. याआधी प्राप्ती कर खात्याने ... Read More »

२०१९ मध्येही मोदीच पंतप्रधान होतील ः नितीश

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील असा दावा नुकतीच भाजपशी हातमिळवणी केलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. राज्यात भाजपशी युती करून सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत कुमार बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुकाबला करण्याची क्षमता अन्य कोणत्याच नेत्यामध्ये नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादवांसह त्यांचे ... Read More »

प्रादेशिक आराखडा २०३० चा सरकारचा विचार

>> मंत्री विजय सरदेसाई यांची विधानसभेत माहिती >> २०२१ आराखडा स्थगित राज्याचा प्रादेशिक आराखडा पुढील किमान २० ते २५ वर्षांचा विचार करून केला पाहिजे. २०२१ आराखडा सध्या सरकारने स्थगित ठेवला आहे. २०२१ येण्यासाठी फक्त साडेतीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे सरकारने प्रादेशिक आराखडा २०३० तयार करण्याचा विचार केला आहे. दरम्यानच्या काळात गरज भासणारी प्रकरणे नगर नियोजित मंडळासमोर आणून मान्यता देणे शक्य ... Read More »

नितीश सरकारविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्या

बिहारात जेडीयू व भाजप यांच्या युती सरकार स्थापनेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका काल पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळल्या. बिहार विधानसभेत जेडीयू-भाजप युती सरकारने बहुमत सिद्ध केले असल्याने त्यात आता हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे ही याचिका निकालात काढताना न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात दोन जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. जेडीयू-भाजप सरकार स्थापनेमुळे एस. आर. बोम्मई प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे उल्लंघन झाल्याचा ... Read More »

अशोक नाईकांची माघार

>> उमेदवार निवडीबाबत कॉंग्रेसचा पेच कायम येत्या दि. २३ रोजी होणारी पणजी मतदारसंघातील पोटनिवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढविण्यास कार्यकत्यार्र्ंनी नापसंती व्यक्त केल्याने पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांनी निवडणूक रिंगणात उतरण्यापासून माघार घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. महापौर असताना आपण पणजीचा कायापालट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरूवातीच्या काळात शहरासाठी कामे केली. परंतु नंतर ... Read More »

नितीशकुमारांचा भाजपशी हातमिळवणीचा निर्णय दुर्दैवी

>> निर्णयाशी सहमत नाही ः शरद यादव बिहारमधील महागठबंधनातून बाहेर पडण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर गेले काही दिवस जाहीर वक्तव्य करण्याचे टाळलेल्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) ज्येष्ठ नेते खासदार शरद यादव यांनी अखेर काल त्या विषयावरील मौन सोडले. काल संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी नितीशकुमार यांनी भाजपशी हात मिळवणी करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून त्यमुळे जनादेशाचा अनादर झाल्याची स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त ... Read More »

सरकार फुलोत्पादन नगरी उभारणार

औद्योगिक वसाहतीपेक्षा राज्यात फुलोत्पादन नगरी उभारल्यास त्याचा अधिक फायदा आहे. त्यामुळे सरकार फुलांची नगरी उभारणार असल्याचे शेतकीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत प्रसाद गांवकर यांच्या प्रश्‍नावर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना होईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. सरकार शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकार आधारभूत दर देते. परंतु जनावरे पिकांची नासाडी ... Read More »

स्वरयंत्राचा कॅन्सर

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) निदानाच्या प्रक्रियेनंतर तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्यानुसार त्यावर करण्यात येणारे उपाय निश्‍चित केले जातात. स्वरयंत्राच्या गाठीचा आकार, कर्करोग जवळच्या ग्रंथींमध्ये पसरलेला आहे की नाही, कर्करोग शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला आहे की नाही या गोष्टींनुसार कर्करोगाची श्रेणी ठरवली जाते. सध्याच्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस बर्‍याच गोष्टींच्या आहारी जातो आहे. व्यसनाधीनता व अयोग्य ... Read More »

॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ मनःशांती सुविचार चिंतनातून…

– प्रा. रमेश सप्रे खरी संपत्ती म्हणजे मनःशांती. मनाची अस्वस्थता, बेचैनी, असमाधान ही खरी आपत्ती. रामनाम घ्यायचं, रामाला नमस्कार करायचा याचा अर्थ स्वतःला जाणीव करून द्यायची- सतत जागृत रहायचं. कशाबद्दल? तर आपल्या हक्काची मनःशांती मिळवण्याची जाणीव ठेवायची नि याचं सतत स्मरण स्वतःला करून द्यायचं- यासाठी उपयोगी पडतं सुविचार चिंतन. संस्कृत भाषेतील वाङ्‌मयाला अनेक पैलू आहेत. सुभाषित किंवा सुविचार व्यक्त करणारे ... Read More »