Monthly Archives: August 2017

मनोहर पर्रीकर व विश्वजित राणे विजयी

पणजी आणि वाळपई मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पणजीतून मनोहर पर्रीकर व वाळपईतून विश्वजित राणे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. मनोहर पर्रीकर यांना 9862 मते ((63.47 टक्के) मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 5059 (32.56 टक्के) मते प्राप्त झाली. गोवा सुरक्षा मंचाचे आनंद शिरोडकर यांना 220 मते (1.42 टक्के) मिळाली, तर केनेथ सिल्वेरा (अपक्ष) ... Read More »

निकाल काय सांगणार?

पणजी आणि वाळपई मतदारसंघांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बहुचर्चित पोटनिवडणुकांमध्ये, गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या गोव्यातील सत्तापिपासू राजकीय घडामोडींप्रतीचा रोष मतदार व्यक्त करणार की, या मतदारसंघांना आजवर आपले बळकट बालेकिल्ले बनवणार्‍या मनोहर पर्रीकर आणि विश्वजित राणे यांचा वैयक्तिक करिष्मा त्यावर भारी ठरणार याचा कस या पोटनिवडणुकीत लागणार आहे. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपद त्यागून गोव्यात परतून पक्षाला बहुमत नसतानाही सरकार स्थापनेसाठी केलेले हट्टाचे प्रयत्न ... Read More »

पणजीत ७० तर वाळपईत ७९.८० टक्के मतदान

>> पोटनिवडणूक शांततेत >> मतदानाच्या टक्केवारीत घसरण >> २८ रोजी मतमोजणी पणजी व वाळपई मतदारसंघात काल झालेल्या पोटनिवडणुकीत पणजीत ७० तर वाळपईत ७९.८० टक्के एवढे मतदान झाले. सांतइनेज येथील धक्काबुक्की व उसगाव येथील तणाव वगळता मतदान शांततेत पार पडले. पणजीत ३० मतदान केंद्रांतून १५५३७ मतदारांनी मतदान केले. वाळपईत ४६ मतदान केंद्रांतून २३०३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पणजीत २१ क्रमांकाच्या मतदान ... Read More »

विश्‍वजित – कॉंग्रेस समर्थकांत वाद

वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिस्क – उसगाव येथे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र, निवडणूक अधिकारी व पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण ठेवल्यात यश मिळविले. पार-उसगाव मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बिघडल्याने मतदान सव्वातास उशीरा सुरू झाले. धावशिरे, उसगाव येथील मतदान केंद्राजवळ मोठ्या संख्येने येत असलेल्या मतदारांना आकर्षिक करण्यासाठी भाजपची एक महिला कार्यकर्ती मतदारांना कुपन देत ... Read More »

सांतइनेज, पणजी येथे धक्काबुक्कीचा प्रकार

>> भाजप – कॉंग्रेसच्या परस्परविरोधी तक्रारी सांतइनेज येथील मतदान केंद्र क्रमांक २४ जवळ काल भाजप व कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. याप्रकरणी भाजप व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परस्परांविरुद्ध पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पणजी महापालिका प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका शीतल नाईक सांतइनेज कामत इस्टेटजवळ मतदारयादी घेऊन बसल्या होत्या. त्यावेळी भाजप समर्थक काही मतदार काही माहिती ... Read More »

गणेशोत्सवात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया

>>  कोकणसह महाराष्ट्रात गणेशभक्तांत नाराजी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवल्याबद्दल कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्‍या ङ्गेरीतील उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची छाननी ही गणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच दि. २७ ऑगस्टला मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया अनंत चतुर्दशीनंतर घेण्यात यावी अशी मागणी राज्यासह कोकणातील विद्यार्थी ... Read More »

सुधारणेचे पाऊल

तिहेरी तलाक हा बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तीन विरुद्ध दोन अशा निसटत्या का होईना, बहुमताने काल दिला. हा विषय अल्पसंख्यकांशी संबंधित असल्याने अतिशय संवेदनशील आहे, हा त्यांच्या वैयक्तिक धार्मिक अधिकारांचा प्रश्न आहे, वगैरे भूमिका याबाबत मांडली जात असली, तरी शेवटी हा लाखो मुसलमान स्त्रियांच्या भवितव्याशी, त्यांच्या मूलभूत अधिकारांशी निगडित प्रश्न असल्याने त्याला मानवीय दृष्टिकोनातून निर्भीडपणे भिडण्याची ... Read More »

पणजी व वाळपई मतदारसंघात आज मतदान

>> पोटनिवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज >> पर्रीकर, विश्‍वजीत राणेंचे भवितव्य होणार सीलबंद सगळ्या गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी व वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे भवितव्य आज मतपेटीत सीलबंद होणार आहे. सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षानेही कधी नव्हे एवढी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. पणजीत भाजपचे उमेदवार म्हणून ... Read More »

तिहेरी तलाकवर बंदी

>> सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तोंडी तिहेरी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा ऐतिहासिक निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांनी हा निकाल वाचून दाखविला. एक हजार वर्षांपूर्वीची ही प्रथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ३ विरुद्ध २ अशा बहुमताने रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३९५ ... Read More »

साडेचारशे किलो भेसळ खवा जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाने काल पणजी पालिका मार्केटमधील सनराईज स्विट्‌सच्या बेती येथील मिठाई तयार करण्याच्या ठिकाणावर छापा मारला व कसलीच माहिती देणारी लेबल्स न लावलेल्या खव्याच्या १५ बॅगा ताब्यात घेतल्या. ४५० किलो एवढा हा खवा आहे. भेसळीचे खाद्यतेलही यावेळी सापडले. अत्यंत अस्वच्छ अशा वातावरणात हे पदार्थ ठेवण्यात आल्याचे प्रशासनाला आढळून आले. याशिवाय १२ बॅगांमध्ये भरून ठेवलेले १५० किलो एवढे फरसाणही ... Read More »