Monthly Archives: July 2017

गळती

जहाज बुडू लागले की त्यावरचे उंदीर सुद्धा बाहेर उडी टाकू लागतात तसे सध्या कॉंग्रेस पक्षाचे झाले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपापला विकाऊपणा सूचित करण्याची संधी अनेक कॉंग्रेसजनांनी साधली. त्याला अनुसरून आता गळ टाकले गेले आहेत आणि एकामागून एक राजीनामे देत भाजपच्या वळचणीला जाताना दिसू लागले आहेत. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेलांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला, परंतु त्यामागे वैयक्तिक कारणे होती. गुजरात विधानसभेच्या ... Read More »

…म्हणून कॉंग्रेसचे ४४ आमदार बंगळुरूत आश्रयास

गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामासत्र सुरू केल्याने तेथील ४४ कॉंग्रेस आमदारांनी आपण आपल्या जीवाला भीती असल्यामुळे कर्नाटकमध्ये आश्रय घेतला असल्याचे काल येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात तातडीने विमानाने बंगळुरुत नेण्यात आलेले हे सर्व कॉंग्रेस आमदार या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी येत्या ८ ऑगस्टला मतदान होणार आहे. कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार असल्याने तेथे ... Read More »

जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन

>> मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी देशात जीएसटीची अंमलबजावणी झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात बोलताना केला. या नव्या करपद्धतीच्या कार्यवाहीत देशातील विविध राज्येही भागीदार असल्याने हा निर्णय म्हणजे सहकारी संघराज्याचे एक उत्तम उदाहरण ठरले असल्याचे ते म्हणाले. आपल्या खंडप्राय देशातील कोट्यवधी नागरिकांचा सहभाग असलेल्या या पद्धतीचे स्थित्यंतर सुरळीतपणे झाल्याने ही ... Read More »

पणजीसाठी विरोधकांतर्फे एका डॉक्टरच्या उमेदवारीसाठी जोर

पणजी मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्याविरुध्द कॉंग्रेसच्या उमेदवाराची कालपर्यंत निश्‍चिती झालेली नसतानाच पणजीतील एका प्रसिध्द डॉक्टरने पर्रीकरांविरुध्द उभे रहावे यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अन्य पक्षांचे नेतेही सदर डॉक्टर उमेदवार म्हणून तयार झाल्यास पाठिंबा देण्यास तयार असल्याचे कळते. दरम्यान भारतीय भाषा सुरक्षा मंचलाही अद्याप उमेदवार सापडलेला नसून कॉंग्रेसने अशोक नाईक याना उमेदवारी दिल्यास भारतीय सुरक्षा मंचने ... Read More »

जीवरक्षकांनी वर्षभरात वाचविले ५९२ देशीविदेशी पर्यटकांचे प्राण

जानेवारी २०१६ पासून जानेवारी २०१७ जून म्हणजेच गेल्या दीड वर्षांत गोवाभरातील विविध किनार्‍यांवरून समुद्रात पोहण्यासाठी गेले असता बुडणार्‍या ५९२ पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी वाचवल्याची माहिती दृष्टी लाईफसेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सूत्रांनी काल दिली. २०१६ साली जीवरक्षकांनी एकूण ४१३ पर्यटकांना बुडताना वाचवले. त्यापैकी ३१८ पर्यटक हे देशी होते. तर उर्वरित पर्यटक हे विदेशी होते. २०१७ साली जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात ... Read More »

परूळेकरांच्या याचिकेवर आज सुनावणी

सेरूला कोमुनिदाद जमीन घोटाळा व फसवणूक प्रकरणी आपणावर असलेल्या आरोपांविरुध्द माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी आज ३१ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. वरीलप्रकरणी उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी परुळेकर यांना जारी केलेल्या समन्सच्या विरोधात परूळेकर यांनी उच्च न्यायालयात सदर ... Read More »

धारगळमधील अपघातात स्कूटरस्वार युवक ठार

धारगळ महाखाजन येथे हर्षद सुनील ऐशी हा २१ वर्षीय युवक त्याची स्कूटर मागच्या बाजूने दुसर्‍या वाहनावर धडक ठार झाला. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० रोजी सकाळी सात वाजता धारगळ येथील हर्षद सुनील ऐशी हा युवक आपल्या ऍक्टिवा जी ऐ ११ बी ६४४२ या वाहनाने जात असता पुढील एक अवजड वाहनावर मागच्या बाजूने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला , ... Read More »

उद्यापासून नव्या मच्छिमारी मोसमास प्रारंभ

>> परप्रांतीय कामगार परतले नसल्याने बोट मालक चिंतेत उद्या दि. १ ऑगस्टपासून राज्यात नव्या मच्छिमारी मोसमास प्रारंभ होणार असून त्यासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत. सर्वत्र मच्छिमारी जेटी परीसर गजबजून गेल्या आहेत. १ जून ते ३१ जुलैपर्यंतचा काळ हा मासेमारीसाठी बंदी काळ असून या काळात मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरण्यास मच्छिमार्‍यांना बंदी घालण्यात येत असते. परंतु या काळात पारंपारिक होड्यातून जास्त खोल ... Read More »

‘फ्रिगेट’चे सक्षमीकरण

– अनंत जोशी अशा ङ्ग्रिगेटची बांधणी अशी केली होती की सर्व तोङ्गांचे वजन हे समप्रमाणात जहाजाच्या कण्यावर विभागले जायचे. जोशुआ नावाच्या अभियंत्याने असे ठरविले की फक्त अमेरिकेत वाढणारे व मूबलक प्रमाणात मिळणारे ‘ओक’ या झाडाचे लाकूड जहाज बांधणीसाठी वापरावे. त्याप्रमाणे खरोखरच हे लाकूड वैशिष्टपूर्ण ठरले.   १६५० मध्ये ब्रिटिश नौसेनेने ज्या अनेक युद्धनौका बांधल्या त्या सर्व नौकांना ‘ङ्ग्रिगेट’ असं संबोधलं ... Read More »

सारस्वत समाजातील स्वातंत्र्यसेनानी ऍड. पांडुरंग सिनाई-मुळगावकर

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट त्यांनी गोमंतक व गोमंतकाबाहेरही ‘गोमंतक मुक्तिचळवळी’साठी होणार्‍या सभा-बैठकांना उपस्थित राहून आपल्या वक्तव्यातून स्वातंत्र्यसेनानींच्या मनातील गोवा मुक्तीसंबंधीची ऊर्जा धगधगत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते. खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत ब्राह्मण समाजातील आणखी एक स्वातंत्र्यसेनानी म्हणजे कै. ऍड. पांडुरंग मुळगावकर. स्वा.सै. ऍड. पांडुरंग जगन्नाथ सिनाई-मुळगावकर यांचा जन्म केपे तालुक्यातील ‘मोरकोरे’ या खेडेगावात १० ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. मराठीतून प्राथमिक ... Read More »