Daily Archives: June 19, 2017

क्रांतिदिनाचे संस्मरण

– अनिल पै डॉ. लोहियांनी भाषणाला सुरुवात केली. कॅप्टन मिरांदानी पिस्तुल रोखले व भाषण बंद करण्याचा हुकूम दिला. लोकांना वाटले आता पिस्तुलातून गोळी सुटेल. डॉ. महाशय हा प्रसंग कसा निभावून नेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले. डॉ. लोहियांनी असे अनेक प्रसंग पाहिले होते. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. माशी उडवावी त्या सहजतेने आपले भाषण चालू असताना कॅप्टन मिरांदाचा उगारलेला ... Read More »

सुस्थिर व विकसित नेपाळ ही काळाची गरज

– दत्ता भि. नाईक चीनकडून नेपाळचा भारतविरोधी कारवायांसाठी लॉंचिंग पॅड म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. या बाबतीत नेपाळने अधिक काळजी घेतली पाहिजे. आगामी काळात नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असून चालणार नाही. सुस्थिर व विकसित नेपाळ ही दक्षिण आशियाचीच नव्हे तर संपूर्ण विश्‍वाची गरज आहे. मंगळवार, दि. ६ जून रोजी नेपाळी कॉंग्रेस या नेपाळमधील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा ... Read More »

पुन्हा उठाव

गेले दोन आठवडे दार्जिलिंग धुमसते आहे. स्वतंत्र गोरखालँडची मागणी तेथे पुन्हा दुमदुमली आणि मालमत्तेची जाळपोळ, नासधूसही झाली. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या राजवटीविरोधातील प्रक्षोभ हे त्याचे मूळ कारण आहे. ममता राजवटीशी असहकाराचे धोरण पत्करून ही गोरखा मंडळी आंदोलनात उतरली आणि पुन्हा एकदा स्वतंत्र गोरखालँडची मागणी त्यांनी पुढे केली आहे. विशेषतः गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग यांनी तर आपल्या पक्षाचे ... Read More »

समान किमान कार्यक्रम तयार

> आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता माडाची पुन्हा झाड म्हणून नोंदणी करणे, शैक्षणिक माध्यम धोरण न बदलणे प्रादेशिक आराखडा २०३० तयार करणे, राज्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण न करता नद्यांचा अधिकार राज्य सरकारकडेच ठेवणे, कुळ कायद्यातील दुरुस्ती – जमीन वापर धोरण, धनगर समाजाचा मागास जमातीत समावेश, अशा विविध योजना असलेला किमान समान कार्यक्रम सरकारने तयार केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारच्या ... Read More »

कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही : मुख्यमंत्री

कोणत्याही परिस्थितीत आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जाऊ शकत नाही; परंतु कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पणजीतील क्रांतीदिनाच्या कार्यक्रमावेळी सांगितले. स्वच्छ भारत योजनेच्या बाबतीत सरकार अत्यंत गंभीर आहे. जुलै २०१८ पर्यंत गोवा प्लास्टिकमुक्त करण्यात येणार असून त्याची सुरुवात १ जुलैपासून सुरू होईल असे ते म्हणाले. सरकारतर्फे बसेसमध्येही कचर्‍यापेट्या उपलब्ध केल्या जातील. प्लास्टिकमुळेच स्वच्छता ... Read More »

जलस्रोत खात्यातर्फे आता ‘नितळ गोंय, नितळ बांय’

जीवनात पाण्याला सर्वाधिक महत्व असल्याने पाण्याचे स्रोतांचे संवर्धन करण्याच्या हेतूने जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी काल मांडवी हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत जीवन क्रांतीच्या संकल्पनेवर ‘नितळ गोंय नितळ बांय’ या योजनेचा शुभारंभ केला. वरील योजनेखाली खाजगी मालकीच्या तसेच सार्वजनिक वापरात असलेल्या विहीरींचे जतन करण्यासाठी प्रती विहीरीसाठी ५० हजार रुपयेपर्यंत मदत केली जाईल, असे जलस्रोत मंत्र्यांनी सांगितले. या योजनेचा ... Read More »

कॉंग्रेसचा एकही आमदार भाजपात जाणार नाही : चोडणकर

कॉंग्रेसमधील सर्व सोळाही आमदार एकसंध असून एकही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात नसल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. मनोहर पर्रीकर सरकारला आपल्या आघाडीतील सहकारी असलेले गोवा फॉरवर्डचे नेते डोईजड झालेले असून त्यांना वेसण घालण्यासाठीच पर्रीकर हे कॉंग्रेसचे तीन आमदार पक्ष सोडून भाजप प्रवेश करणार असल्याचा अफवा उठवीत असल्याचे चोडणकर म्हणाले. कॉंग्रेसच्या आमदारांना त्यांनी फोडण्याचे कितीही प्रयत्न ... Read More »

पर्तगाळी हमरस्त्यावर गॅसवाहू टँकर उलटून एक ठार

बेतोडा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस घेऊन जाणारा एमएच ४३ बीजी २४९७ हा गॅस वाहक टँकर मडगाव-कारवार हमरस्त्यावरील पर्तगाळ वळणावर कलंडून टँकरमधील चालक कवलेश यादव (५२) वर्षे टँकरखाली चिरडून जागीच ठार झाल. तर टँकरवरील क्लिनर दिलीपकूमार यादव बचावला आहे. दोन्ही व्यक्ती झारखंड येथील असून काणकोण पोलिस स्थानकावरील हवालदार तुळशिदास गावकर यांनी पंचनामा करून पुढील तपास चालू केला आहे. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या ... Read More »