Daily Archives: June 17, 2017

अजून प्रतीक्षाच!

मुंबईतील बॉम्बस्फोटमालिका प्रकरणी २४ वर्षांनंतर दुसरा निवाडा जवळ येऊन ठेपला आहे. आरोपींच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना कठोर सजा होणार हे अपेक्षित आहेच, परंतु त्यांना शिक्षा झाली म्हणजे या बारा स्फोटांत बळी गेलेल्या २५७ जणांना आणि जायबंदी झालेल्या ७१३ जणांना न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. या स्फोटमालिकेचे खरे सूत्रधार विदेशांत सुखाने राहत आहेत. दाऊद इब्राहिमचा केसही कोणी वाकडा करू ... Read More »

मराठी, कोकणी चित्रपटांसाठी सिनेमागृहे आरक्षित ठेवणार

>> मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा >> दशकपूर्ती गोवा चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन गोव्यात मराठी व कोकणीमधील चित्रपट दाखविण्यासाठी चित्रपटगृहे आरक्षित ठेवावीत यासाठी चित्रपटगृहांना सक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काल केली. आपले प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात चित्रपटगृहे उपलब्ध नसतात ही मोठी अडचण इथे असल्याची आपल्याला जाणीव आहे असे स्पष्ट करून मराठी चित्रपट गेल्या दशकात दर्जेदार निर्मितीच्या दृष्टीने उच्च ... Read More »

सायबरएज कंत्राटात मोठा घोटाळा

>> कम्प्युटर डिलर्स फोरम ऑफ गोवाचा आरोप गोवा सरकारच्या सायबरएज योजना कंत्राटात मोठा घोटाळा असून सरकार हाताच्या बोटावर मोजता येतील अशा राज्यातील काही ठराविक संगणक वितरकांनाच वरील योजनेखाली संगणक वितरणाचे कंत्राट देत असून हे वितरक गब्बर बनले आहेत. मोठ्या संख्येने असलेल्या अन्य वितरकांवर मात्र उपासमारीची पाळी आली असल्याची माहिती कम्प्युटर डिलर्स फोरम ऑफ गोवाने काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ... Read More »

तेजपाल खटल्याची इन-कॅमेरा सुनावणी

बलात्कार प्रकरणातील आरोपी व तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालविरुद्धच्या खटल्याची इन-कॅमेरा सुनावणी करण्यास काल म्हापसा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत वृत्तांकन करण्यास कायद्याने बंदी असेल. या खटल्याची पुढील सुनावणी आज सकाळी १०.३० वा. पुन्हा सुरू होईल. महिला सहकारी पत्रकारावरील बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या तरुण तेजपालला काल म्हापशातील न्यायालयात हजर करण्यात आले. खटल्याची ... Read More »

टी. बी. कुन्हा यांचे तैलचित्र विधानसभेत लावण्याकडे दुर्लक्ष

>> एदुआर्द फालेरो यांचा सरकारवर आरोप गोवा मुक्ती लढ्यात टी. बी. कुन्हा यांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांचे एक तैलचित्र गोवा विधानसभेत लावण्यात यावे अशी मागणी आपण राजेंद्र आर्लेकर हे सभापती असताना त्यांच्याकडे केली होती. मात्र, सदर मागणी अजून पूर्ण झाली नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. टी. बी. कुन्हा यांनी गोवा मुक्ती लढ्यावर ... Read More »

ट्रक – स्कूटर अपघातात मुळगाव येथे युवक ठार

मुळगाव, डिचोली हमरस्त्यावर गुरुवारी रात्री एका ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने हरगो सहदेव गावकर (वय २७) हा शेळपे, गवाणे – सत्तरी येथील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेली पोलीस कॉन्स्टेबल रंजना गावस (सत्तरी) ही युवती गंभीर जखमी झाली. तिच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. हरगो गावस व रंजना जीएयूजे ९५८६ या ऍक्टिवा दुचाकीवरून जात होते. मुळगाव ... Read More »

नानोडा, डिचोलीत चक्रीवादळाचा तडाखा

> २० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; २॥ लाखांची हानी डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा, भटवाडी, उसप येथे काल सकाळी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने किमान २० पेक्षा अधिक मोठे वृक्ष कोसळले. अनेक ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला तर काही घरावर वृक्ष कोसळल्याने हानी झाली. वरील भागात असलेल्या कुळागरातील सुपारीची तसेच फणसाची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सुमारे ... Read More »

कृषी क्षेत्रातील कौशल्याधारीत अभ्यासक्रम

– श्रीरंग व्यंकटेश जांभळे शेती क्षेत्राच्या विकासासाठी संबंधित मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता लक्षात घेऊन उद्योग जगतातले तज्ज्ञ श्री. मांगिरीश पै रायकर यांनी सावईवेरे येथे रामनाथ कृष्ण पै रायकर कृषी विद्यालयाची स्थापना २०१३ साली केली. या विद्यालयात उच्च माध्यमिक विभागात कृषी (व्यावसायिक) हा अभ्यासक्रम चालतो. आता १०वी व १२वीचे निकाल झाले. भविष्यात सुखी जीवन जगण्यासाठी चांगला रोजगार उपलब्ध व्हावा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ... Read More »

कशासाठी, यशासाठी ?

– प्रा. रामदास केळकर पिकासोने तिला सांगितले, ‘‘हे प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मला आयुष्याची तीस वर्षे खर्च करावी लागली त्याचे काय?’’ नुसता संकल्प सोडून चालत नाही पूर्णत्वासाठी म्हणजेच यशासाठी अखंड सेवा जिद्दीने केली पाहिजे. येणार्‍या अडथळ्याना दूर करत, सामोरे जात ध्येय गाठता आले पाहिजे. तेव्हा वेळ न दवडता आगे बढो!! नवीन शैक्षणिक पर्व ह्या महिन्यापासून सुरु झाले. जो तो विद्यार्थी नव्या ... Read More »