Daily Archives: June 16, 2017

पाळेमुळे उखडा

मेरशीत मुंबईच्या पर्यटकांवर स्थानिक गुंडांनी सशस्त्र हल्ला चढविण्याची परवाची घटना सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्याला अशा प्रकारची गुंडगिरी परवडणारी तर नाहीच, शिवाय अशा प्रकारे दिवसाढवळ्या तलवारी आणि चॉपरनी हल्ला करण्याची हिंमत पणजीपासून हाकेच्या अंतरावरील गावात गुंडांना होते ही बाब राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. हा नुसता मारामारीचा प्रकार असता तर त्याकडे अपवादात्मक घटना म्हणून दुर्लक्ष ... Read More »

गुंडगिरी प्रकरणी पोलिसांना जबाबदार धरणार : मुख्यमंत्री

>> मेरशीतील हल्ल्यानंतर सज्जड इशारा बुधवारी मेरशी येथे स्थानिक गुंडांकडून पर्यटकांवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित भागातील पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. मेरशी सारख्या गैर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांचे असते. अन्य भागातील पोलिसांच्या तुलनेत येथील पोलीस तेवढे कडक नसल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारांमुळे राज्याच्या प्रतिमेवर विनाकारण परिणाम होतो. ... Read More »

चॅम्पियन्स चषक स्पर्धेत काल भारताने बांगलादेशचा दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला शतकवीर रोहित शर्मा खणखणीत चौकार ठोकताना. Read More »

विश्‍वजित राणे अपात्रता; सोमवारी निवाडा शक्य

वाळपईचे माजी आमदार विश्‍वजित राणे यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्याच्या मागणीवरील सुनावणी पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश राखून ठेवला आहे. न्यायालय सोमवारी निवाडा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी विरोधात मतदान करण्यासंबंधी कॉंग्रेसने व्हीप जारी केला होता. राणे यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. असे असतानाही ठरावाच्या वेळी राणे सभागृहातून बाहेर गेले होते. राणे ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

विन्सन ग्राङ्गिक्सतर्ङ्गे आयोजित करण्यात येत असलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा १० व्या वर्षात पदार्पण करीत असून आज संध्याकाळी ६.३० वाजता गोवा कला अकादमी संकुलात होणार्‍या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल, अशी माहिती विन्सन ग्राङ्गिक्सचे संजय शेटये व ज्ञानेश मोघे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चित्रपट सृष्टीतील दिग्गज उपस्थित असतील. हा महोत्सव दि. १८ ... Read More »

अर्जुन साळगावकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

खाण घोटाळा प्रकरणातील संशयित खाण उद्योजक अर्जुन अनिल साळगावकर यांना काल पणजी न्यायालयाने सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जावर पुढील सुनावणी होईपर्यंत साळगावकर यांना अटक न करण्याचे निर्देश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाला दिले आहे. बुधवारी साळगावकर यांची पोलीस जबानी घेण्याचे काम सुरू असताना प्रकृती बिघडल्याची त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. सध्या त्यांना मणिपाल इस्पितळात ... Read More »

ट्रकच्या धडकेने फोंड्यात विद्यार्थिनी ठार

शापूर, फोंडा येथील कदंबा बसस्थानकाजवळ काल दुपारी १२.४० वा. सुमारास ट्रक व स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात मुक्ता नवीन पटेल (१५, ढवळी-फोंडा) या युवतीचा मृत्यू झाला. तर युवतीची काकी भावना सुरेश पटेल (३८, ढवळी) ही जखमी झाली. मुक्ता पटेल ही फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलची दहावीची विद्यार्थीनी होती. गुरुवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने काकी समवेत फर्मागुडी येथील खाजगी डॉक्टरकडून परत घरी जात असताना ... Read More »