Daily Archives: June 15, 2017

जागृतीची नांदी

मध्य प्रदेशमधील मंदसौरमधील शेतकरी आंदोलन शांत करण्याऐवजी ते चिघळवण्याचा आटापिटा विरोधकांनी चालवल्याचे स्पष्ट दिसते. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना तेथे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे तेथे धावले. गुजरातमधील पटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, योगेंद्र यादव, दिल्लीच्या जेएनयूचा विद्यार्थी नेता या सगळ्यांना मंदसौरला जाण्यापासून रोखण्यात आले. मध्य प्रदेश सरकार दडपशाही करीत असल्याचा या सर्वांचा आरोप ... Read More »

पर्यटकांवर मेरशीत स्थानिक गुंडांचा तलवारींनी हल्ला

>> बसच्या काचा फोडल्या; महिलांवरही वार >> १४ पर्यटक जखमी; तिघा स्थानिकांस अटक गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या वसई – मुंबई येथील पर्यटकांच्या एका बसवर मेरशी येथील गुंडांनी तलवारी आणि चॉपरसह काल चढवलेल्या हल्ल्यात बसचालकासह चौदा प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी तिघांची हाडे मोडली. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी विशाल गोलतेकर (३०), सूरज शेट्ये (४०) व लॉरेन्स डायस (३४) या तिघा स्थानिक ... Read More »

टेंपो अडवून सव्वादोन लाख लुटले

>> सां जुझे आरियल येथील दिवसाढवळ्या घटना कुडाळ येथील कोंबड्या पुरवठा करणार्‍या टेंपोला दोन खुरीस, सांजुझे आरियल येथे एका कारने आलेल्या तरुणाने अडवून टेंपो चालकाकडील २.२० लाख रुपये रोख रक्कम हिसकावली व कार घेऊन फरार झाला. ही घटना काल दुपारी ११.३० वाजता घडली. पोलिसांना वाटमारी करणार्‍या कार चालकाचा पत्ता लागला असून ते त्याच्या शोधात आहेत. कुडाळ येथील विजय भास्कर वालवलकर ... Read More »

पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार

>> खासदार शांताराम नाईक पक्षश्रेष्ठींनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारणार असल्याचे राज्यसभा खासदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शांताराम नाईक यांनी काल सांगितले. आपणाला पदाची लालसा नाही. पण पक्षश्रेष्ठी व अन्य स्थानिक नेत्यांनी आपणावर जर ती जबाबदारी सोपवली तर ती आपण आनंदाने घेणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. काही स्थानिक नेत्यांनी मी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा माझ्याशी ... Read More »

अग्नितांडव…

पश्‍चिम लंडनमधील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला २७ मजली ग्रीनफेल टॉवर. या इमारतीत सुमारे ६०० लोक राहत असून भीषण दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पश्‍चिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट या परिसरात ही इमारत आहे. Read More »

डॉप्लर यंत्रणा कार्यरत करणे लांबणीवर

हवामानाचा वेध घेऊन अचूकपणे संदेश देण्याची आधुनिक यंत्रणा असलेले डॉप्लर कार्यरत करणे काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडले आहे. डॉप्लर कार्यरत करण्यासाठी केंद्रीय हवामान खात्याचे सचिव गोव्यात येणार होते. काही अडचणींमुळे त्यांची गोवा भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाची ही आधुनिक यंत्रणा आल्तिनो येथे उभारण्यात आली आहे. डॉप्लरच्या माध्यमातून त्सुनामी, ... Read More »

यंदा बारा सरकारी शाळा बंद

>> ७५-८० प्राथमिक शिक्षक अतिरिक्त राज्यातील सरकारी शाळांच्या संख्येत घट झाल्याने यावर्षी ७५ ते ८० प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सामावून घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. यावर्षी एकूण १२ शाळांना टाळे ठोकावे लागले असून १४ शाळांना अन्य नजिकच्या शाळांना जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली. काही शिक्षक सीसीएल, प्रसुती रजा, आजारी अशा ... Read More »