Daily Archives: June 14, 2017

पाठिंबा हवा

लष्करप्रमुखांना राजकीय वादामध्ये ओढून त्यांना ‘सडक का गुंडा’अशी उपमा देणारे कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांना राहुल गांधी यांनी बेंगलुरूच्या सभेत अखेर फटकारले. ते केले नसते तर कॉंग्रेसचीच देशात छीः थू झाली असती. भारतीय सेनेचे मनोबल उंचावण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पुढे सरसावणार्‍या संदीप दीक्षित यांच्यासारख्या उठवळ नेत्यांनी जरा आपल्या जिभेला लगाम दिल्यास बरे होईल. लष्कराकडे राजकीय दृष्टीने पाहणे गैर आहे, ... Read More »

पंचायतींचे संमिश्र निकाल

>> सरपंचांची निवड १९ रोजी >> भाजपच्या बाजूने कौल ः मुख्यमंत्री राज्यातील १७५ ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले असून उत्तर गोव्यात सत्ताधारी भाजप व सरकारच्या घटक पक्षांनी पाठिंबा दिलेले बहुसंख्य उमेदवार निवडून आले आहेत. तर दक्षिण गोव्यात निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेस समर्थक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीत कोणत्याही पक्षाला वर्चस्व सिद्ध करण्यास अपयश आले आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले ... Read More »

वन-मावळिंगे पंचायत क्षेत्रात लॉटरीद्वारे उमेदवार विजयी

वन – मावळिंगे पंचायत क्षेत्रातील प्रभाग ६ मध्ये विरेश गावकर व सर्वेश गावकर या दोन उमेदवारांना प्रत्येकी १०० मते पडली. सारखीच मते पडल्याने पुन्हा मतमोजणी घेण्यात आली. त्यानंतरही दोघांनाही समान मते पडल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे निर्वाचन अधिकारी मधू नार्वेकर यांनी लॉटरी ड्रॉचा पर्याय ठेवला. लॉटरी काढली असता ती विरेश गावकर यांना लागल्याने ते विजयी ठरले. सासष्टी तालुक्यातील केळशी पंचायतीवर साल्वादोर ... Read More »

दहशतवादी हल्ल्यात ९ जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीमा सुरक्षा दलाच्या तळावर काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे ९ जवान जखमी झाले असून त्यातील ३ जवानांची प्रकृती गंभीर आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीमा सुरक्षा दलाच्या १८० व्या तुकडीचा तळ आहे. त्या तळावर दहशतवाद्यांनी काल ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात नऊ जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात असून ... Read More »

मंत्री स्मृती इराणीवर युवकाने फेकल्या बांगड्या

गुजरातमधील अमरेली शहरात काल एका कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दिशेने एका व्यक्तीने बांगड्या फेकल्याची घटना घडली. त्या व्यक्तीला नंतर अटक करण्यात आली आहे. अमरेली जिल्ह्यातील मोटा भंडारिया गावातील २० वर्षीय केतन कासवाला या युवकाने इराणी यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. वरील ... Read More »

१ जुलैपासूनच जीएसटी लागू होणार ः केंद्र सरकार

जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारने काल स्पष्ट केले. यामुळे वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीवरून तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. मात्र, अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. पश्‍चिम बंगालने जीएसटीची अंमलबजावणी आणखी महिनाभराने पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. Read More »