Daily Archives: June 13, 2017

वार्षिक तमाशा

मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने रखडलेला ‘नीट २०१७’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास अखेर सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला काल फर्मावले आहे. ‘नीट’ किंवा नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देशभरात लागू करण्याचा निर्णय झाल्यापासून दरवर्षी ही परीक्षा वादाचा आणि न्यायालयीन लढायांचा विषय ठरत आलेली आहे. वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी ही परीक्षा आधारभूत मानण्याचे सरकारने जरी ठरवले असले, ... Read More »

१७५ पंचायतींचा आज फैसला

>> २ जुलै रोजी ११ पंचायतींची मतमोजणी ११ जून रोजी गोव्यात झालेल्या पंचायत निवडणुकांसाठीची मतमोजणी आज १३ जून रोजी होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी काल सुरू होती. ११ जून रोजी १८६ पंचायतींसाठी निवडणूक झाली होती. त्यांपैकी ११ पंचायतींमधील १६ प्रभागांची निवडणूक येत्या १ जुलै रोजी होणार असल्याने त्या ११ पंचायतींची मतमोजणी २ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. उर्वरित सर्व पंचायतींच्या ... Read More »

दहावी-बारावी परीक्षेतील क्रीडा गुण वेगळे दाखवा

>> मानव संसाधन मंत्रालयाची शिफारस दहावी व बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत क्रीडापटूंसाठी असलेल्या गुणांचा अन्य विषयांसाठीच्या गुणांमध्ये समावेश न करता ते गुण पत्रिकेवर वेगळे दाखविण्याची शिङ्गारस मानव संसाधन मंत्रालयाने गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाला केली आहे. त्यामुळे यासंबंधी सरकारला निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जुझे रिबेलो यांनी दिली. मंडळाने वरील माहिती शिक्षण खात्यालाही दिली आहे. सरकारने निर्णय ... Read More »

लाचखोर अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना जामीन मंजूर

लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले पणजीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेटये यांना काल पणजी विशेष न्यायालयाने १ लाख रु. च्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला. यापूर्वी पणजी सत्र न्यायालयाने साबाजी शेट्ये यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे त्यांची रवानगी लाचलुचपत विरोधी पोलिसांच्या कोठडीत करण्यात आली होती. तत्पूर्वी, आपल्या छातीत दुखत असल्याचे सांगून शेटये हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, ... Read More »

कार-दुचाकीच्या टक्करीत कुठ्ठाळी येथे युवक ठार

रविवारी रात्री उशिरा कार व दुचाकी यांच्यात झालेल्या टक्करीत दुचाकी चालक वासुदेव सज्जल गुड्डा (रा. धाकतळे, मांगूरहील, वय २२) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात कुठ्ठाळी-वास्को महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री १०.३० च्या दरम्यान कुठ्ठाळी – वास्को महामार्गावरील ङ्गाईव्ह स्टार लॉन्ड्रीजवळ पिवळी काळी वॅगनआर (क्र. जीए ०६ टी २०५३) व एव्हीएटर दुचाकी (क्र. जीए ०६ आर ३०११) या ... Read More »

गोमेकॉच्या निवासी इमारतीचा भाग कोसळला

>> सुदैवाने आतील पाच कुटुंबे सुखरूप मुसळधार पावसामुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या निवासी इमारतीचा जीर्ण कोसळला. ही दुर्घटना काल पहाटेच्या दरम्यान घडली. या इमारतीत गोमेकॉत कामाला असलेल्या कर्मचार्‍यांची पाच कुटुंबे राहत असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले. काल पहाटे बांबोळी येथील गोमेकॉचे कर्मचारी राहत असलेल्या एका जुन्या इमारतीचा दर्शनी भाग कोसळून पडल्याच्या आवाजाने झोपेत असलेल्या लोकांना ... Read More »

गर्भाशयाचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) अनियमित पाळीसाठी आयुर्वेदिक औषधोपचाराचा उपयोग करावा. शक्यतो हॉर्मोन्सची चिकित्सा टाळावी. गर्भाशय निर्हरण केल्यावर हॉर्मोन्समध्ये फरक पडतो व रुग्ण मानसिक तणावातून जाऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम, ध्यान, धारणा यांचा सराव करावा. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. हा कर्करोग बर्‍याचवेळा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात जास्त प्रमाणात आढळतो. बर्‍याच स्त्रिया या काळात १५-१५ दिवसांनी अंगावर जाणे, ... Read More »

बाहेर खाण्यासाठी काही पर्याय …

खरं तर घरातलं खाणं केव्हाही उत्तम. पण हल्ली शिक्षण आणि नोकरीमुळे अनेकांना बाहेर खाण्याशिवाय काही पर्यायच नसतो. तेव्हा बाहेरचं खाण्याची वेळ तुमच्यावर येत असेल तर काही गोष्टी आवर्जून करा. तसं बाहेरं खाणं हानिकारकच पण जर पर्याय नसला तर त्यातल्या त्यात काय खाल्लेले चांगले हे माहित असणे गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपण टाळू शकतो. त्यामुळे बाहेर खाताना या गोष्टीचा ... Read More »

नोकरी करणार्‍या महिलांचं ‘असं’ असावं डाएट

>> उत्तम आरोग्यासाठी काही खास टीप्स महिला नोकरीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण सध्या मोठे आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरांबरोबरच इतर शहर आणि खेड्यांतही महिला नोकरी करताना दिसतात. कुटुंब आणि नोकरी करताना त्यांची तारेवरची कसरतच होते. याचा परिणाम अनेकदा त्यांच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे ही कसरत करत असताना महिलांनी काही गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवायला हव्यात. तर मग घर, जॉब, आणि स्वतःची काळजी हे सर्व एका ... Read More »