Daily Archives: June 12, 2017

नवे चेहरे

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. एकूण ५२८८ उमेदवारांमधून नवी पंचमंडळी आता निवडली जातील. महात्मा गांधींनी पाहिलेल्या ग्रामस्वराज्याचा मार्ग ह्या ग्रामपंचायतींमधूनच जातो. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेले प्रामाणिक जनसेवक या सगळ्या पंचायतींवर निवडून यावेत आणि त्यांनी गोव्याच्या खेडोपाडी विकासाचे नवे पर्व सुरू करावे अशी अपेक्षा आहे. पंचायतराज व्यवस्थेविषयी आजवर खूप काही बोलले गेले, परंतु प्रत्यक्षात ही व्यवस्था जेवढी प्रभावी बनायला हवी ... Read More »

१८६ पंचायतींसाठी ८०.३३ टक्के मतदान

>> उद्या मतमोजणी १८६ पंचायतींच्या १४५० प्रभागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत शांततापूर्ण ८०.३३ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ८३.१६ तर दक्षिण गोव्यात ७७.६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागच्या वेळी झालेल्या पंचायत निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले होते, अशी माहिती काल राज्य निवडणूक आयुक्त आर्. के. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतमोजणी उद्या मंगळवार दि. १३ जून रोजी सकाळी ८ वा. पासून ... Read More »

टीम इंडिया दिमाखात उपांत्य फेरीत

चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील काल झालेल्या निर्णायक साखळी सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून धुव्वा उडवीत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताची टक्कर बांगलादेशबरोबर होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध साखळी सामन्यात तब्बल तीनशेहून धावा करून पराभूत व्हावे लागल्याने टीम इंडियासाठी कालच्या सामन्यात ‘जिंकू किंवा मरू’ अशी स्थिती होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या शिलेदारांनी भेदक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि ... Read More »

वाळपईत कॉंग्रेसतर्फे सत्यविजय नाईक?

वाळपई मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे निवडणूक लढवणार असल्याने कॉंग्रेसतर्फे सदर मतदारसंघातून सत्यविजय नाईक यांना उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, सत्यविजय नाईक यांनी भाजपचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास ते शक्य होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सत्यविजय नाईक यांना ही पोटनिवडणूक लढवण्यास रस असल्यास कॉंग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मागच्या ... Read More »

जेटी – हार्बर येथील ३५ घरे खाली करा

>> एमपीटीने घरमालकांना नोटिसा बजावल्याने खळबळ एमपीटीने जेटी, हार्बर येथील ३५ घर मालकांना तीन महिन्यांत घरे खाली करावीत अशी नोटीस बजावल्याने घरमालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. पोर्तुगीजकालीन असलेली घरे खाली करण्यासाठी एमपीटी कोणत्या कायद्याने नोटिसा बजावू शकतात असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. एमपीटीने मुरगाव बंदराच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. खारीवाडा जेटी ते स्मशान भूमीपर्यंत विस्तारीकरण प्रकल्पाचा ध्यास घेतल्यानंतर ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सव… दहा पावलांचा प्रवास

– उदय नरसिंह महांबरे ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करताना तारेवरची कसरत करावी लागते. सुरुवातीच्या काही वर्षांत जरी सरकारने थोडीफार मदत महोत्सवाला केली असली तरी आता या महोत्सवाचा भार प्रायोजकांच्या सहकार्याने स्वतः ‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था स्वतःच्या खांद्यावर पेलते. शासकीय मदतीविना सतत दहा वर्षे सलगपणे हा महोत्सव गोव्यात घडवून आणणारे संजय शेट्ये व त्यांचे बंधू श्रीपाद शेट्ये म्हणूनच अभिनंदनास पात्र ... Read More »

अनुबंध ः डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या लालित्यपूर्ण लेखनाचा आविष्कार

– डॉ. सोमनाथ कोमरपंत डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘अनुबंध’ या ललितनिबंधसंग्रहात पडलेले आहे. त्यांतील काही लेख आत्मपर आहेत. गतकाळातील आणि नजीकच्या काळातील संस्मरणे त्यांत आहेत. साहित्यक्षेत्रातील मान्यवर लेखकांची व्यक्तिचित्रे त्यात आहेत. काही मृत्युलेखही त्यात समाविष्ट केलेले आहेत. मराठीच्या नामवंत प्राध्यापक, प्रथितयश कथालेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी दीर्घकाळपासून सकस साहित्यनिर्मिती करून आपल्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठसा ... Read More »