Daily Archives: June 10, 2017

श्री साई समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने…

– शशांक मो. गुळगुळे (मुंबई) श्री साईबाबांनी विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली होती त्यामुळे यंदाच्या (२०१७) विजयादशमीपासून ते २०१८ च्या विजयादशमीपर्यंत समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार असला तरी या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बरेच लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा निर्णय साई संस्थानच्या विश्‍वस्तांनी घेतला असून यातील काही उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याविषयी… महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यामुळे, त्यांच्या ... Read More »

युगकार्याच्या वाटेवर …

– प्रा. रमेश सप्रे ‘माणूस व्हा. आपल्या विचारांच्या, कल्पनांच्या छोट्याशा डबक्यातून बाहेर पडा. भारतमातेला किमान एक सहस्त्र माणसांचं बलिदान हवंय. यज्ञातल्या पशूंचं बलिदान नकोय. माणसांचं हवंय. कितीजण तुमच्यापैकी तयार आहेत याला. आधी माणूस बना माणूस!’ प्रवास हा आदर्श शिक्षक असतो. याचा अनुभव नरेंद्रनं म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी भारताची परिक्रमा करताना घेतला होताच. आता मोठ्या प्रवासाला निघायचं होतं. या संदर्भात एक प्रसंग ... Read More »

सक्ती आणि स्वातंत्र्य

येत्या जुलैपासून आयकर विवरणपत्र भरताना आधार कार्डाचा क्रमांक देण्याची सक्ती सरकार करू पाहात असले तरी सर्वोच्च न्यायालयाने कालच्या आपल्या निवाड्यात तूर्त ते ऐच्छिक राहील असा दिलासा आम करदात्यांना दिलेला आहे. आधार कार्डाशी संबंधित माहिती चोरीला गेल्यास नागरिकांच्या वैयक्तिक अधिकारांवर गदा येईल असा आक्षेप घेणार्‍या काही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सध्या प्रलंबित आहेत. त्यामुळेच न्यायालयाने ही तात्पुरती सवलत दिलेली आहे. याचाच ... Read More »

राज्यात पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

>> १८६ पंचायतींसाठी उद्या मतदान : तीन दिवस मद्यविक्री बंदी : मंगळवारी मतमोजणी राज्यातील १८६ पंचायतींसाठी उद्या रविवारी होणार्‍या निवडणुकीचा जाहीर प्रचार काल संपला. असे असले तरी आज संध्याकाळपर्यंत निवडणूक रिंगणातील उमेदवार मतदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र चालूच ठेवतील. दि. १३ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी सामाजिक माध्यमांचा उमेदवार ... Read More »

पॅन-आधार जोडणी सक्तीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पॅन कार्ड मिळवण्यासाठी व प्राप्ती कर भरण्यासाठी आधार कार्डची सक्ती करणार्‍या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाने काल एका निवाड्याद्वारे उचलून धरले. मात्र ज्यांना अजून आधार कार्ड मिळालेले नाही अशांना यातून सूट देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना ते आपल्या पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक ठरणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर या विषयाला न्यायालयाने अंशतः स्थगिती दिली ... Read More »

ब्रिटनमध्ये मे यांचेच सरकार येणार

ब्रिटिश संसदेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल त्रिशंकू स्थितीचा लागला असला तरी विद्यमान पंतप्रधान तेरेसा मे यांनी आपणच यापुढेही पंतप्रधानपदाची धुरा वाहणार असल्याची माहिती काल पत्रकारांना दिली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन परतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. याआधी ठरल्याप्रमाणे आपण युरोपियन युनियनबरोबर दहा दिवसांत ब्रेक्झिट विषयावर चर्चा करणार असल्याचेही मे यांनी यावेळी स्पष्ट केले. हाऊस ऑङ्ग कॉमन्समध्ये सर्वसाधारण बहुमतासाठी आवश्यक ... Read More »

एसीबीने समन्स पाठवूनही वीज अभियंता गैरहजर

>> वीज जोडणीसाठी लाचप्रकरण वीज जोडण्या देण्यासाठी लाच मागण्याच्या प्रकरणी सध्या वादग्रस्त बनलेले वीज खात्याचे कनिष्ठ अभियंते विश्‍वनाथ भट यांना भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी (एसीबी) चौकशीसाठी समन्स पाठविले होते. परंतु काल ते एसीबीसमोर हजर राहिले नाही. संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना विचारले असता भट यांना समन्स न मिळाल्याने ते हजर न राहिल्याचे सांगण्यात आले. एका ग्राहकाकडे वीज जोडणीसाठी लाच मागत असल्यासंबंधीचा व्हिडीओ गेले ... Read More »

पर्रीकरांचा कारभार घटक पक्षांच्या दबावाखाली : मिकी

>> सरकार अल्पजीवी ठरण्याचा दावा मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारला लोकहिताची कामे करण्यास अपयश आल्याने गोव्यातील जनता नाखूश आहे. सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षाच्या दबावाखाली वावरावे लागत असल्याने मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य नाही. हे सरकार केव्हाही कोसळू शकते असे भाकीत माजी मंत्री मिकी पाशेको यांनी काल पत्रकार परिषदेत केले. पंधरा वर्षांआधी मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांचे प्रशासन चांगले व लोकाभिमुख होते. लोक त्यांना ... Read More »

राज्यात भाज्यांचे दर गगनाला

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची झळ गोव्यालाही काही प्रमाणात बसली असून पणजीसह राज्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये काही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. गाजर, कोथंबीर, मिरची, फरसबी, वालपापडी, फ्रेंच बीन या भाज्यांचे दर भडकले असून अन्य प्रकारच्या भाज्यांचे दरही वाढण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पणजी बाजारपेठेत प्रती किलो गाजरची किंमत ६० ते ८० रुपयांवरून १२० रुपये झाली आहे. तसेच दहा रूपयांना उपलब्ध ... Read More »