Daily Archives: June 9, 2017

अस्वस्थ बळीराजा

सन २०२२ पर्यंत देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, परंतु उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच, उलट महाराष्ट्रापासून मध्य प्रदेशपर्यंतचा शेतकरी सध्या अस्वस्थ दिसतो आहे. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. तत्पूर्वी तामीळनाडूमधील शेतकर्‍यांनी अगदी दिल्लीपर्यंत धडक दिली होती. या देशाच्या करोडो जनतेचा पोशिंदा असलेला हा बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो आणि त्याच्या प्रश्नाच्या शांततापूर्ण सोडवणुकीऐवजी गोळीबाराने ... Read More »

मंदसौरमध्ये राहुल गांधींना अटक

>> चार तासांनंतर सुटका; पंतप्रधानांवर घणाघाती टीका मध्यप्रदेशमधील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मंदसौरला जाऊ पाहणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काल राजस्थान-मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले. त्यांच्यासह कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह, कमलनाथ तसेच जदयूचे नेते शरद यादव यांनाही अटक करण्यात आली होती. जामीनावर सोडण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या ... Read More »

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे चार प्रयत्न उधळले

>> ७ जणांचा खात्मा; ४८ तासातील कारवाई भारतीय सैनिकांनी गेल्या ४८ तासांत भारतीय हद्दीत पाक पुरस्कृत घुसखोरीचे चार प्रयत्न उधळून लावले. तसेच या दरम्यान सात दहशतवाद्यांना खात्मा केल्याची माहिती काल भारतीय लष्कराकडून देण्यात आली. दरम्यान उत्तर काश्मीरच्या नौगाम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी भारताचा एक जवानही शहीद झाला. गेल्या ४८ तासांतील वरील घटनांविषयी एक निवेदन ... Read More »

शेतकर्‍यांवरील गोळीबाराचा विहिंपकडून निषेध

>> गोळीबार पोलिसांकडून झाल्याची गृहमंत्र्यांची कबुली मध्यप्रदेशमधील शेतकरी आंदोलनावेळी राज्य पोलिसांनी शेतकर्‍यांवरील केलेल्या गोळीबाराचा विश्‍व हिंदू परिषदेने तीव्र निषेध केला आहे. केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना म्हणून शेतकर्‍यांची सर्व कर्जे माङ्ग करावी असे आवाहन विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिङ्गारशींची तातडीने अंमलबजावणीची मागणीही त्यांनी केली. शेतकर्‍यांना कर्जबाजारी ठेवून आणि आत्महत्या करायला लावून देशात रामराज्य निर्माण करण्याचे स्वप्न ... Read More »

कुजिरातील शाळांच्या वेळांत किंचित बदल

>> वाहतूक कोंडीवर उपाय योजना कुजिरा शिक्षण प्रकल्पात शाळा सुरू होण्याच्या व शाळा सुटण्याच्यावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काल शिक्षण संचालक, वाहतूक पोलीस उपअधिक्षक धर्मेश आंगले व वरील प्रकल्पातील विद्यालयांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत तेथील शाळा सुरू करण्याचे व सोडण्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच वेळेतील बदल लागू होणार असून येत्या सोमवारपासून ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील काही चित्रपट यंदा पणजीबाहेर

>> पेडणे, माशेल, कुडचड्यातही प्रदर्शन गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील चित्रपट आजवर रसिकांना पणजीतील सिनेमागृहातून पहावयास मिळत होते. मात्र यंदा या महोत्सवाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजकांनी यंदा महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन गोव्याच्या अंतर्भागात असलेल्या काही सिनेमागृहांतून प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे., पेडणे येथील ‘नंदी’, माशेल येथील ‘सिनेवर्ल्ड’ आणि कुडचडे येथील ‘नायगारा’ या सिनेमागृहांतून महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून हे प्रदर्शन चित्रपट रसिकांसाठी ... Read More »