Daily Archives: June 7, 2017

कतारची कोंडी

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ईजिप्त आणि बहरीन या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडून इराण आणि त्याच्या समर्थकांना एकाकी पाडण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. कतारकडून मुस्लीम ब्रदरहूड, हमास, अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना छुपे पाठबळ दिले जात असल्याचा ठपका या देशांनी त्यावर ठेवला आहेच, शिवाय इराणचे समर्थन करीत असल्याबद्दलही धारेवर धरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती ... Read More »

अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना लाच घेताना पकडले

>> दीड लाखाच्या लाचेचा पहिला हप्ता घेताना पर्दाफाश उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. साबाजी शेट्ये यांना पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना काल भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका तक्रारीच्या आधारे छापा टाकण्यात आला तेव्हा शेट्ये यांचे प्रताप उघडकीस आले. स्फोटकांचा साठा करण्याचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यासाठी शेट्ये यांनी एका व्यक्तीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली ... Read More »

शेतकरी आंदोलनातील गोळीबारात ५ ठार

>> मध्य प्रदेशात हिंसक निदर्शने महाराष्ट्राबरोबरच आता मध्य प्रदेशमध्येही शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असून काल तेथील आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ शेतकरी मरण पावल्याचे वृत्त आहे. चौघेजण जखमी झाले आहेत. मात्र पोलिसांनी गोळीबाराचे वृत्त फेटाळले आहे. राज्य प्रशासनाने हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर रतलाम, मंदसौर व उज्जैन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. शेत मालाला हमी भाव देण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ... Read More »

राज्यात विविध भागांमध्ये वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय

गेल्या दोन दिवसांपासून पणजीसह राज्याच्या विविध भागांत विजेचा लपंडाव होत असून विजेच्या कमी-जास्त दाबामुळे पंखे, टीव्ही अशी विजेवर चालणारी अनेक उपकरणे निकामी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधीत अधिकार्‍यांना विचारले असता, थेट वाहिन्यांच्या बाबतीत कोणतीही समस्या नसून स्थानिक ट्रान्सफॉर्मर व अन्य यंत्रणेत बिघाड होत असल्यानेच वीजपुरवठा खंडित होत असावा असे सांगण्यात आले. काल संध्याकाळी पणजी व सभोवतालच्या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित ... Read More »

राज्यसभेसाठी सर्वमान्य उमेदवार हवा ः सरदेसाई

>> भाजपकडे आवश्यक संख्याबळ नाही राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार उभा केल्यास तो निवडून येणे कठीण आहे. तेवढे संख्याबळ भाजपाकडे नसल्याने भाजपा, गोवा ङ्गॉरवर्ड व म.गो. पक्ष तसेच अपक्ष आमदारांना विश्‍वासात घेऊन सर्वमान्य उमेदवार ठेवला पाहिजे असे वक्तव्य कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाजवळ १२ आमदारांचे संख्याबळ आहे. ४० सदस्यांच्या विधानसभेत बारा आमदारांच्या बळावर भाजपाचा उमेदवार ... Read More »