Daily Archives: June 6, 2017

येरे माझ्या मागल्या!

पोरस्कडेमधील भयावह अपघातात भाईडवाडा – कोरगावचे पार्सेकर पिता – पुत्र बळी गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. बारावीची परीक्षा नुकत्याच दिलेल्या साटेलीच्या महादेव बावकरचा पाय कापला गेल्याने त्याचे भविष्य अंधःकारमय झाले. या सार्‍याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? लोखंडी सळ्या घेऊन सुसाट चाललेल्या ट्रॉलीचा चालक अपघातानंतर पळून गेला. तो सापडला तरी त्याला शिक्षा होईल याची खात्री नाही आणि जरी त्याला शिक्षा ... Read More »

कूळ दुरुस्ती विधेयक वटहुकूम शक्य

कुळांची प्रकरणे पुन्हा मामलेदारांकडे देण्यासंबंधीच्या विषयाला आपण तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करणे शक्य झाल्यास कुळ दुरूस्ती विधेयकाच्या बाबतीत वटहुकूम जारी केला जाईल. ते शक्य न झाल्यास पुढील विधानसभा अधिवेशनात दुरूस्ती विधेयक मांडणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल स्पष्ट केले. सरकारने मामलेदारांकडे असलेली कुळांची प्रकरणे जलद निकालात काढण्यात यावी यासाठी न्यायालयाकडे दिली होती. त्यासाठी ... Read More »

ऐतिहासिक क्षण ः श्रीहरीकोटा येथील अवकाश संशोधन केंद्रावरून काल संध्याकाळी इस्रोने जीसॅट-१९ दळणवळण उपग्रह असलेले ४३.४३ मीटर उंच व आतापर्यंतचे सर्वात मोठे जीएसएलव्ही मार्क-३ हे क्षेपणास्त्र अवकाशात सोडून इतिहास घडवला. Read More »

संबित पात्रांनी ‘बीफ’वर भाष्य का केले नाही? ः कॉंग्रेस

गोमांसाच्या (बीफ) प्रश्‍नावर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असतानाही मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी गोव्यात आलेले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी वरील प्रश्‍नावर कोणतेही भाष्य का केले नाही, असा प्रश्‍न प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी केला आहे. आपले सरकार स्थापन झाल्यानंतर विदेशातून भारतीयांचा काळा पैसा आणून प्रत्येकाच्या ... Read More »

डिफेन्स एक्स्पो गोव्यात आयोजिण्याबाबत निर्णय नाही

गोव्यात २०१८ साली ‘डिफेन्स एक्स्पो’ भरवावा की नाही त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने केलेल्या कार्याची माहिती भांब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने देशातील उद्योगपतींना संरक्षणासंबंधीच्या शस्त्रांची निर्मिती करण्याचे काम हाती ... Read More »

चार अरब देशांनी कतारशी संबंध तोडल

>> दहशतवादाला पाठिंब्याचा आरोप बहारिन, सौदी अरेबिया, इजिप्त व युएई या देशांनी कतार हा देश दहशतवादाला तसेच दहशतवादी इस्लामी गटांना पाठिंबा देत असल्याच्या कारणावरून त्या देशाबरोबरील सर्व प्रकारचे संबंध तोडले असल्याचे जाहीर केले. मात्र या अरब देशांचा वरील निर्णय हा असमर्थनीय असल्याचा दावा कतारने केला आहे. कतारच्या विदेश व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात वरील निर्णय खोट्या व तथ्यहीन ... Read More »

हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूपच बदलले : साहू

पणजी (बबन भगत यांजकडून) मान्सून आता पूर्वीसारखा राहिला नसून हवामान बदलामुळे पावसाचे एकूण स्वरूपच बदलून गेले आहे, असे पणजी वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की आता जो पाऊस पडतो व पूर्वी जो पाऊस पडायचा यात बराच फरक आहे. ७० व ८० च्या दशकात एकदा पाऊस सुरू झाला की तो तीन-तीन, ... Read More »

‘सी प्लेन’ने गाशा गुंडाळला

गेल्या पर्यटन मोसमात राज्यात ज्या कंपनीने ‘सी प्लेन’ सुरू केले होते त्या कंपनीचे दिवाळे निघाल्याने कंपनीने ‘सी प्लेन’ सेवा रद्द केल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी दिली. मात्र, आता आणखी एखादी कंपनी ही सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे की का ते पाहिले जाईल असे काब्राल म्हणाले. गोवा हे कुटुंबासाठीचे पर्यटन स्थळ (ङ्गॅमिली डेस्टिनेशन) अशी गोव्याची प्रतिमा निर्माण ... Read More »

स्तनाचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) स्तनावर गाठ आल्यास त्याचा संबंध गर्भाशय, फलकोष, गर्भाशयातील अंतःस्त्वचा या सर्वांवर होत असल्याने सर्व जननेंद्रियांच्या ठिकाणी दुष्टी असते हे लक्षात घेऊन स्तनावरील प्रलेप, प्रदेह, परिसेचन, क्वाथ यांबरोबर योनिभागी चिकित्सा केल्यास रुग्णा पूर्ण बरी होते. वाढत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमुळे महिला वर्ग थोडासा सतर्क होताना दिसत आहे. स्तनांमध्ये साधी जरी गाठ हाताला लागली तरी महिला डॉक्टरांकडे ... Read More »

पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज भाग – १

– डॉ. स्वाती अणवेकर फॉलिक्यूलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार होत नाही. आणि म्हणूनच अशा स्त्रियांमध्ये डींबाणू पक्व होऊन त्यापासून पक्व स्त्रीबीज हे ओव्ह्युलेशन मार्फत तयार होऊ शकत नाही. आणि जरी अशा स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर आणि नियमित येत असली तरी गर्भधारणा मात्र होत नाही. संध्याचे लग्न होऊन जवळ जवळ दोन वर्षे झाली होती, तरी देखील तिला गर्भधारणा होत नव्हती. तिची मासिक ... Read More »