Daily Archives: June 5, 2017

पाकचे दलाल

उशिरा का होईना, राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मिरी फुटिरतावादी आणि त्यांना पाकिस्तानातून येणारा पैसा पुरवणारे हवाला ऑपरेटर यांच्यावर अखेर आपले जाळे टाकले. काश्मीर आणि दिल्लीत मिळून एकवीस ठिकाणी शनिवारी छापे टाकले गेले. सव्वाशे कोटीहून अधिक रोकड जप्त केली गेली. कदाचित काहींच्या मुसक्याही आवळल्या जातील. ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने गेल्या सोळा मे रोजी फुटीरतावादी आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील या साट्यालोट्यावर स्टिंग ऑपरेशन केले ... Read More »

न्हयबाग महामार्गावरील अपघातात पिता-पुत्र ठार

>> रस्त्याच्या बाजूला असलेल्यांना सुसाट ट्रॉलीने चिरडले : अन्य दोन गंभीर पेडणे न्हयबाग-पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग १७ वरील धोकादायक वळणावर काल सकाळी १० वा. सुसाट वेगाने लोखंडाचे खांब घेऊन जाणारी ट्रॉली उलटल्याने भायीडवाडा-कोरगाव येथील मोहन पार्सेकर (५९) व रितेश पार्सेकर हे पिता-पुत्र जागीच चिरडले गेल्याने ठार झाले. तर साटेली सिंधुदुर्ग येथील महादेव बावकर, याचा एक पाय तुटल्याने गंभीर जखमी झाला. ... Read More »

चीनी लढाऊ विमानांकडून भारतीय हद्दीचे उल्लंघन

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी काल भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. गेल्या मार्चपासून आतापर्यंत चीनच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सकडून झालेले हे चोथे उल्लंघन असल्याचे या सूत्रांनी सांगितले. या घटनेची भारतीय हवाई दल चौकशी करीत आहे. याआधी चिनी हवाई दलाची लढाऊ विमाने ४.५ कि. मी. भारतीय हवाई हद्दीत आली होती. Read More »

तटरक्षक दलाने बुडणार्‍या बार्जवरील २७ जणांना वाचविले

दक्षिण कर्नाटकच्या उल्लाल किनार्‍याजवळील समुद्रात बुडणार्‍या एका बार्जवरील सर्व २७ जणांना काल भारतीय तटरक्षक दलाने सुखरूप वाचविले. याबाबत शनिवारी माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने त्या दिवशी चौघांची लाईफ बोटच्या सहाय्याने सुटका केली होती. त्यानंतर उर्वरीत २३ जणांना काल किनार्‍यावर आणले. यासाठी दलाने लाईफ बोटचा वापर केला. समुद्र खवळलेला असल्याने शनिवारी रात्री मदतकार्य थांबवले होते. Read More »

लंडनमधील दहशतवादी हल्ल्यात ७ ठार; ४८ जखमी

आत्मघाती हल्लेखोरांच्या बनावट वेषात असलेल्या सुरेधारी तीन दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री लंडन शहराच्या दोन वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी जमावात घुसून अनेक लोकांना बेभानपणे सुर्‍यांनी भोसकल्याने त्यातील ७ जण ठार झाले. तसेच ४२ जण जखमी झाले. लंडन पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी नंतर तिघाही हल्लेखोरांना ठार केले. मात्र या हल्ल्याची जबाबदारी कोणाही संघटनेने घेतलेली नाही. यावर्षी ब्रिटनमध्ये झालेला हा तिसरा ... Read More »

चॅम्पियन्स चषकातील विजयी सलामी : पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबरील कालच्या पहिल्याच सामन्याला रिमझिम पावसाने व्यत्यय आणला. मात्र प्रथम फलंदाजीत भारतीय खेळाडूंनी धावांची बरसात केली आणि अखेरीस पाकवर शानदार विजय झळकावला. संघसाथींसह आनंद साजरा करताना कर्णधार विराट कोहली. Read More »

म्हापशात चालत्या स्कूटरवर झाड पडून पती-पत्नी जखमी

म्हापसा-करासवाडा येथील मुख्य रस्त्यावर काल दुपारी आपल्या स्कुटरवरून सावंतवाडी येथील शांताराम म्हावळकर हे पत्नीसमवेत जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले भले मोठे झाड त्यांच्या स्कूटवर पडल्याने शांताराम म्हावळकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या. त्यांच्यावर म्हापसा आझीलोमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. शांताराम म्हावळकर हे एमएच ०७ एडी ०५४२ ही स्कुटर घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे झाड त्यांच्या ... Read More »