Daily Archives: June 2, 2017

पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून काल भीमबेर व बट्टल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा हल्ला परतवून लावताना भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकचे ५ सैनिक ठार तर ७ जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी, काल सकाळी राजौरी व पूंछ जिल्ह्यातील सीमारेषेवर मोठा शस्त्रसाठा आढळला होता. याआधी बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत एका घरात लपून बसलेल्या २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दरम्यान, ... Read More »

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन गोव्यातील रेल्वे मंत्रालयातर्फे उभारण्यात येणार्‍या विकासकामांवर चर्चा केली. ही बैठक आल्तिनो, पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘महालक्ष्मी’ या शासकीय बंगल्यावर झाली. Read More »

दिगंबरना बजावलेले अजामीनपत्र वॉरंट वकील आल्यानंतर मागे

>> लुईस बर्जर घोटाळा प्रकरण लुईस बर्जर घोटाळा प्रकरणी उत्तर गोवा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी काल मडगावचे आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना ते न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, नंतर ते मागे घेण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी न्यायालयाने ठरवलेली नाही. काल या खटला प्रकरणी सुनावणी होती. या सुनावणीच्या वेळी ... Read More »

माजी मंत्री दिलीप परुळेकरांविरुद्ध खटला चालविण्याचा कोर्टाचा आदेश

>> सेरुला कोमुनिदाद घोटाळा सेरुला कोमुनिदादीची जमीन बळकावल्याप्रकरणी तसेच ङ्गसवणूक केल्याप्रकरणी उत्तर गोव्याचे विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी काल माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालू करण्याचा आदेश दिला. त्यांच्यासह अन्य दोघा आरोपींना येत्या १७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. काल झालेल्या सुनावणीवेळी कोमुनिदादीचे तत्कालीन ऍर्टनी पीटर मार्टिन्स तसेच प्रशासक आयरीन सिक्वेरा ... Read More »

पावसामुळे पुढील ४ महिने खाण उद्योग बंद

राज्यात पाऊस सुरू झाल्याने पुढील चार महिने खाण उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला खाण उद्योग कालपासून पुढील चार महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी सांगितले. १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत राज्यात खनिज उत्खनन तसेच त्याची वाहतूक करता येणार नसल्याचे आचार्य यांनी सांगितले. खाण ... Read More »

काही पोलीस अधिकार्‍यांचे ड्रग्स माफियांशी साटेलोटे

>> पर्यटन मंत्र्यांचा गंभीर आरोप काही पोलीस अधिकार्‍यांचे ड्रग्ज माफियांशी साटेलोटे असून युवा पिढीचे आयुष्य बरबाद करणार्‍या अमली पदार्थांना थारा दिला जाऊ नये यासाठी चाळीसही आमदार एकमताने पुढे येतील असे सांगून गोव्यातील समुद्र किनार्‍यांवर अमली पदार्थांचे व्यवहार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी काल दिला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ... Read More »

मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

>> कॉंग्रेस गोवा प्रभारी अमित देशमुखांचा आरोप गेल्या तीन वर्षांच्या काळात केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव व गोवा प्रभारी अमित देशमुख यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काही पक्षांनी लोकशाही पायदळी तुडवल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री व विद्यमान आमदार असलेल्या अमित देशमुख यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतरची त्यांची ... Read More »