Daily Archives: June 1, 2017

प्लास्टिक मुक्तीकडे!

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा गोव्यात आले, तेव्हा गोव्यातील रस्ते प्लास्टिक कचरामुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती. त्यानंतर रस्त्याकडेचा प्लास्टिक कचरा हटवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले, परंतु रस्तोरस्ती कचरा टाकण्याची सवय जडलेल्या गोमंतकीय जनतेकडून सरकारला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अजूनही महामार्गांच्या कडेला प्लास्टिक कचर्‍याचा खच पडलेला दिसतो. हा गोव्यासारख्या पर्यटनाप्रधान राज्याला ... Read More »

मुसळधार पावसाने गोव्याला झोडपल

  >> रस्ते जलमय >> झाडे कोसळली >> जनजीवन विस्कळीत राजधानी पणजीसह आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडला. रस्ते तर पाण्याखाली गेलेच, परंतु अनेक भागांत वादळी वार्‍यामुळे झाडे कोसळली आणि जनजीवन विस्कळीत झाले.दुपारी बाराच्या सुमारास पणजी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. संध्याकाळीही पुन्हा पावसाच्या जोरदार सरी आल्या. साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाणारी वाहने पादचार्‍यांची तारांबळ उडवीत ... Read More »

न्यायालयातून पळालेल्या कैद्याला फिल्मी स्टाईलने पकडले

>> म्हापसा येथील प्रकार; दोन पोलीस कर्मचारी जखमी बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला नाजरेरियन आरोपी कॅनेथ उपवेगा याने काल बुधवारी म्हापसा न्यायालयातून पलायन केले असता पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करूक त्याला लगेच जेरबंद केले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान म्हापसा न्यायालयात त्याला सुनावणीसाठी आणले असता ही घटना घडली. यावेळी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वरील आरोपी बलात्कार प्रकरणी कोठडीत असून काल त्याला ... Read More »

काबूलमध्ये बॉम्बस्फोटात ८० पेक्षा अधिक मृत्युमुखी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ घडवून आणलेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात ८० पेक्षा जास्त मृत्युमुखी पडले असून ३५० लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोट सकाळी ८.२२ च्या सुमारास झाला. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काबूलमधील भारतीय दूतावासातील अधिकारी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ... Read More »