Monthly Archives: May 2017

क्रिकेट का?

भारत आणि पाकिस्तान दरम्यानची द्विपक्षीय क्रिकेट मालिका बारगळल्यात जमा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जरी तिला अनुकूल असले, तरी भारत सरकारने ‘दहशतवाद आणि क्रिकेट सोबतीने जाऊ शकत नाहीत’ असे ठणकावून क्रिकेटपेक्षा देश मोठा आहे याची यथार्थ जाणीव बीसीसीआयला करून दिली आहे. ही भूमिका सर्वस्वी योग्य आहे. काश्मीर जळत असताना आणि सीमेवर गोळीबाराविना एकही दिवस जात नसताना पाकिस्तानशी गळाभेटी घेण्याचे वा ... Read More »

राज्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा

  >> साखळी व काणकोण येथे कारगाड्यांवर वृक्ष कोसळले >> लाखोंची हानी >> वास्कोत कोळशाच्या भुकटीचे लोळ राज्याला मान्सूनचे वेध लागले असून काल वादळी पावसाने झोडपल्याने अनेक भागात वृक्ष कोसळून लाखोंचे नुकसान झाले. पाळोळे (काणकोण) व कुडणे (डिचोली) येथे कारगाड्यांवर झाडे पडून दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. मुरगाव बंदरातील कोळशाची भुकटी वास्को शहरभर विखुरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात ... Read More »

जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांच्या खरेदी विक्रीवर गोव्यात बंदी

गोवा प्लास्टिकमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांच्या खरेदी – विक्रीवर येत्या जुलैपासून बंदी घालण्याचे ठरवले असून कोणीही अशी खरेदी वा विक्री करताना दिसल्यास पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आर्थिक विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमात जाहीर केले. खरेदीला जाताना कापडी पिशव्या सोबत बाळगण्याची सवय करून घ्यावी असे आवाहनही पर्रीकर ... Read More »

उद्यापासून दोन महिने मासेमारी बंदी

उद्या १ जून ते ३१ जुलै असे एकूण दोन महिने मासेमारी बंदी निश्‍चित करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी उद्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार असल्याचे मच्छीमार खात्याची अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे मच्छिमारी व्यावसायिकांनी समुद्रातून आपले ट्रॉलर व मच्छिमारी साहित्य धक्क्यावर आणले आहे. खारीवाडा, वास्को येथेही मच्छिमारी व्यवसायिक मासेमारी बंदीचे पालन करणार आहेत. ट्रॉलरद्वारे मासेमारी बंदीमुळे सात जेटींवरील सुमारे दीड हजार ट्रॉलर बंद राहतील. ... Read More »

फार्मसी बंदला गोव्यात १०० टक्के प्रतिसाद

देशव्यापी फार्मसी बंदला गोव्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील १०० टक्के औषधालये बंद होती, असे अखिल गोवा फार्मसी मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद तांबा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. २९ रोजीची मध्यरात्र ते ३० रोजी मध्यरात्र असे २४ तास देशभरातील ९ लाख फार्मसी बंद होत्या. या काळात फक्त सरकारी फार्मसी तेवढ्या उघड्या होत्या, असे तांबा यांनी सांगितले. गोव्यात ६०० ... Read More »

पुन्हा विश्वभ्रमण

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. नुकत्याच झालेल्या त्रिवर्षपूर्तीवेळी केल्या गेलेल्या विश्लेषणांतून मोदी सरकार रोजगारनिर्मितीत मागे पडल्याचा निष्कर्ष निघाला असल्याने देशातील थेट विदेशी गुंतवणुकीला चालना देण्याच्या दिशेने या दौर्‍यात व्यापक प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे. खुद्द जर्मनी हा भारताचा युरोपीय महासंघातील सर्वांत मोठा व्यापारी मित्र आहे आणि जवळजवळ सोळाशे जर्मन कंपन्या ... Read More »

पंचायत निवडणूक : ५२८८ उमेदवार रिंगणात

>> ५५ उमेदवारांची बिनविरोध निवड >> १०४५ उमेदवारांची माघार >> १८६ पंचायतींच्या निवडणुका येत्या ११ जून रोजी राज्यात होऊ घातलेल्या १८६ पंचायतींच्या निवडणुकांसाठी १४६६ प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत. ५५ उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली असून १४६६ प्रभागांसाठी एकूण ५२८८ उमेदवार रिंगणात आहेत. काल १०४५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अनुसूचित जमातींसाठी १६४ प्रभाग राखीव आहेत. तर अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात ... Read More »

यंदा मान्सून लांबणीवर

>> पणजी वेधशाळेचा अंदाज मान्सून यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता असून गोव्यात मान्सूनचे आगमन जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता पणजी वेधशाळेने काल व्यक्त केली आहे. दरम्यान, काल संध्याकाळी राजधानी पणजीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला. वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू हे काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की यंदा राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होईल अशी चिन्हे ... Read More »

कारमध्ये मृतदेह सापडल्याने तिळामळ, केपे येथे खळबळ

तिळामळ, केपे येथे काल सकाळी एका बारच्या बाजूला नॅनो गाडीत बोपरमोर्ड्डा येथील रिगन त्रावासो (३१) या युवकाचा मृतदेह सापडला. या प्रकारामुळे या भागात खळबळ माजली आहे. रिगन त्रावासो हा बोपरमोर्ड्डा येथील बारमध्ये रविवारी रात्री दारू पिण्यास गेला होता. मात्र, सकाळी नॅनो गाडीत त्याचा मृतदेह सापडला. यामुळे या भागात हा विषय चर्चेचा बनला आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रावासो याच्या अंगावर ... Read More »

कुठ्ठाळी-चिखली रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध

कुठ्ठाळी ते चिखली पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ६०० झाडे तोडण्याचे काम सुरू असून ते त्वरित बंद करावे अशी मागणी करीत ‘सेव्ह ट्रीज चिपको’ आंदोलनाद्वारे काल पर्यावरण प्रेमींनी निषेध केला. कुठ्ठाळी जंक्शनवर जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी ‘फटयलेरे फटयले, गोंय सरकारान फटयले’, ‘दिवचे ना रे दिवचे ना, झाडा कापूक दिवचेना’ अशा घोषणा देत कुठ्ठाळी ते चिखली रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कापण्यास विरोध दर्शविला. काल ... Read More »