Daily Archives: February 16, 2017

विसंगती

गोव्यातील मतदान गेल्या चार फेब्रुवारीस पार पडले असले, तरी निवडणूक निकालापर्यंत म्हणजे ११ मार्चपर्यंत आचारसंहिता कायम ठेवणे, प्रशासन पूर्णतः ठप्प राहणे आणि निवडणुकीच्या दिवशी कामावर असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना तब्बल सव्वा महिना आपले टपाली मतदान करण्याची मुभा राहणे या तिन्ही गोष्टींबाबत राज्यात तीव्र नापसंती व्यक्त होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबत पुनर्विचार करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणूक सुरळीत व शांततेत पार ... Read More »

इस्रोने घडविला इतिहास

>> एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण   एकाच वेळी ३७ उपग्रह सोडण्याचा रशियाचा विक्रम मोडीत काढीत भारतीय अवकाश संशोधन केंद्र तथा इस्रोने १०४ उपग्रह अवकाशात सोडून काल इतिहास घडवला. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा अवकाश केंद्रावरून इस्रोने ही कामगिरी साकारली. इस्रोच्या या धवल यशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यासाठी शास्त्रज्ञांना भारतीयांचा सलाम असे त्यांनी नमूद केले आहे. याआधी २०१५ ... Read More »

आता मद्य व्यावसायिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

>> पुनर्विचार याचिका दाखल करणार   राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर अंतरापर्यंत असलेली दारूची दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे मद्य विक्रेते संघटनेने काल पत्रकार परिषदेत सांगितले. ११ मार्चनंतर राज्यात सत्तेवर येणार्‍या सरकारचीही हा कायदेशीर लढा लढण्यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत दत्तप्रसाद नाईक, गौरीश धोंड व मायकल कारास्को ... Read More »

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, संगीततज्ज्ञ माधव पंडित यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, हाडाचे शिक्षक, लेखक, समीक्षक, संगीतज्ज्ञ, गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाचे माजी कार्याध्यक्ष श्री. माधव पंडित यांचे काल सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. काल संध्याकाळी मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी हेमलता, पुत्र कृषी खात्याचे विभागीय अधिकारी गुरूदत्त व गौतम, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गोवा मुक्तीलढ्यात भाग घेतल्याबद्दल चार वर्षे कारावास सोसावा लागलेल्या पंडित ... Read More »

शशिकला तुरुंगात दाखल

मंगळवारपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या अभाअद्रमुकच्या ६१ वर्षीय नेत्या शशिकला अखेर काल संध्याकाळी पुन्हा एकदा बंगळूरुमधील ‘त्याच’ तुरुंगात चार वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी चेन्नईहून दाखल झाल्या. त्याआधी त्या बंगळूरुमधील एका न्यायालयात शरण आल्या. कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी २०१४ साली शिक्षा सुनावल्यानंतर जयललिता यांच्यासह याच तुरुंगात शशिकला सहा महिने राहिल्या होत्या. आता त्या कैदी नं. ९४३५ म्हणून तेथे राहतील. ... Read More »

अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सरकारचे वित्त खात्याला परिपत्रक

सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट झाला आहे. त्यामुळे येत्या दि. ५ मार्चनंतर वेतनविषयक वगळता अन्य कोणत्याही स्वरुपाचा खर्च न करण्यासंबंधीचे परिपत्रक सरकारने वित्त खात्याला पाठविले आहे. दरवर्षी सरकारातील वेगवेगळी खाती, आपल्याकडील निधी संपविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत धावपळ सुरू करतात. अशा खर्चाला कात्री लावण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे दि.५ मार्चनंतर सरकारने अनावश्यक खर्च करू नये म्हणून अशा प्रकारचे परिपत्रक पाठविले जाते. यावर्षी ... Read More »

मुलांमधील कुतुहल जागविणे पालक, शिक्षकांचे काम ः डॉ. मित्रा

शिक्षक किंवा पालकांचे काम असते. मुलांना परिक्षांमध्ये बांधून न ठेवता त्यांना इतर मुलांबरोबर निरनिराळ्या विषयांवर चर्चा करून शिकायला लावल्यास व यावेळी त्यांच्या हाती एखादा संगणक दिल्यास मुलं चांगल्या प्रकारे ती गोष्ट आत्मसात करू शकतील असा दावा डॉ. सुगाता मित्रा यांनी केला. डी. डी . कोसंबीविचार महोत्सवात ‘द फ्युचर ऑफ लर्निंग’ या विषयावर डॉ. सुगाता मित्रा आपले मत मांडत होते. डॉ. ... Read More »