Daily Archives: February 15, 2017

स्वप्न धुळीस

सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निवाड्याने व्ही. के. शशिकला यांची तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची स्वप्ने धुळीला मिळाली. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात दोषी धरले गेल्याने चार वर्षांची उर्वरित सजा तर त्यांना भोगावी लागेलच, पण त्यानंतर आणखी सहा वर्षे त्या निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार असल्याने पुढील दहा वर्षे त्या लोकप्रतिनिधी बनू शकणार नाहीत. मात्र, राजकीय पक्ष चालवण्यापासून त्यांना हा निवाडा रोखू शकत नाही. त्यामुळे अभाअद्रमुकवरील ... Read More »

शशिकला दोषी ः ४ वर्षे तुरुंगवास

>> मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उद्ध्वस्त ः तातडीने शरण येण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश   अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्यासाठी आतूर असलेल्या अभाअद्रमुकच्या महासचिव शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला. १९९० च्या दशकातील कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवित आधीच स्थानिक न्यायालयाने ठोठावलेली चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम केली. त्यासाठी तातडीने बंगळुरुतील न्यायालयाला शरण येण्याचा आदेशही न्यायमूर्ती पी. ... Read More »

अधिवेशन की बरखास्ती ः सरकारने भूमिका स्पष्ट करावी – हायकोर्ट

विधानसभा अधिवेशन बोलावणे किंवा विधानसभा बरखास्त करणे या प्रश्‍नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने येत्या दि. २७ ङ्गेब्रुवारी पर्यंत प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्याचा गोवा सरकारला आदेश दिला व यासंबंधीच्या नोटिसा सरकार व अन्य संबंधितांवर बजावल्या आहेत. त्यामुळे सरकारला या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावीच लागणार आहे. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी वरील प्रकरणी सरकारला योग्य तो आदेश द्यावा, अशी मागणी करणारी ... Read More »

कुडचड्यातील अपघातात २५ जखमी

>> स्कूल बस कलंडल्याने दुर्घटना   शेळवण-कुडचडे येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसला काल दुपारी २ वा. अपघात होऊन त्यात २५ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी १२ जणांना इस्पितळात उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. याबाबत वृत्त असे की, शेळवण-कुडचडे येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस क्रमांक जीए ०१-झेड-६९०६ या क्रमांकाच्या बसचे ब्रेक निकामी होऊन ती कलंडल्याने त्यातील २५ मुले जखमी झाली. काल ... Read More »

मेंदुला विश्रांती आवश्यक ः डॉ. तोळे

‘माणूस आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपेत घालवितो. झोपेमुळे मेंदुला विश्रांती मिळते व तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. एखाद्या प्राण्याला झोपूच दिले नाही, तर तो प्राणी मरू शकतो. झोपेत असताना आपला मेंदु नको असलेले घटक शरीराबाहेर ङ्गेकत असतो व पुन्हा ताजातवाना होत असतो. त्यामुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळणे आवश्यक असते’, असे मत मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑङ्ग ङ्गंडामेंटल रिसर्च ... Read More »

दारू दुकानांप्रकरणी सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यावी ः कॉंग्रेस

राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटरांच्या अंतरावरील मद्यालये हटविण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संबंधितांवर प्रत्यक्षात किती गंभीर परिणाम होईल याचा पार्सेकर सरकारने विचारच केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नावर विचारविनिमय करून कृती कार्यक्रम तयार करता यावा म्हणून सर्वपक्षीय व सर्व संबंधित घटकांची बैठक बोलवावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अविनाश तावारीस यांनी काल पत्रकार परिषदेत केली. ११ मार्च रोजी मतमोजणी ... Read More »