Daily Archives: February 14, 2017

भ्रामक युक्तिवाद

महामार्गांकडेच्या मद्यालयांचे स्थलांतर करण्यासंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा विषय अपेक्षेप्रमाणे ऐरणीवर आला आहे. या विषयावरील आमची भूमिका आम्ही सर्वांत प्रथम गेल्या शनिवारच्या अग्रलेखातून मांडली आहेच. मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे देशातील रस्ता अपघातांचे एक प्रमुख कारण आहे ही वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाने हा निवाडा दिलेला आहे. या निवाड्याचे पालन ज्याने करायचे ते सरकार मात्र गोव्यात त्यातून राष्ट्रीय व राज्य महामार्गांना ... Read More »

विधानसभा अधिवेशन पेचास निवडणूक आयोगच जबाबदार

>> मुख्यमंत्री पार्सेकर : दारू दुकानांबाबत तूर्तास न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी क्रमप्राप्त विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्यास आपले सरकार जबाबदार नसून निवडणूक आयोगच जबाबदार आहे. निवडणूक आयोगाने गोवा विधानसभ निवडणुकीचा कार्यक्रम निश्‍चित करताना त्याचा विचार करण्याची गरज होती, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. राज्याच्या ऍडव्होकेट जनरलनीही तसेच सांगितले आहे. असे असले तरी आपण यासंदर्भात त्यांच्याकडे लेखी सल्ला मागितला आहे. येत्या ... Read More »

महामार्गांवरील दारू दुकानदारांना सरकारच्या पाठबळाची मागणी

>> सर्वतोपरी प्रयत्न करावेत : गोवा फॉरवर्ड   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे गोव्यातील महामार्गांच्या बाजूला असलेल्या ज्या दारूच्या दुकानांवर बंदीचे सावट आलेले आहे त्या दारू दुकानदारांच्या पाठीशी गोवा सरकारने खंबीरपणे उभे रहावे व त्यांची दारूची दुकाने वाचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पार्टीने काल पत्रकार परिषदेत केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी घाई गडबडीत काम ... Read More »

शशिकला यांचे राजकीय भवितव्य आज होणार स्पष्ट

>> सर्वोच्च न्यायालयाचा आज निवाडा   तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता व त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्या १९९० च्या दशकातील कोट्यवधींच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज आपला निवाडा देणार असल्याने या क्षणी तामिळनाडूत सरकार स्थापनेचा दावा करणार्‍या अभाअद्रमुकच्या नेत्या शशिकला यांचे राजकीय भवितव्यही आजच स्पष्ट होणार आहे. आज सकाळी १०.३० वा. होणार्‍या या निवाड्यावर देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. शशिकला ... Read More »

पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवरही कृती हवी : कडूर

‘पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर विचार करणे व चर्चा आवश्यक आहेच, पण स्थानिक पातळीवरही प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. संस्कृती आणि निसर्ग या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत संस्कृती आणि निसर्ग या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत. आज पर्यटनाचा अतिरेक होत असल्याने त्याचे नियोजन आवश्यक आहे’ असे प्रतिपादन ‘नॅशनल जॉग्राफिक चॅनल’चे अन्वेषक आणि वन्यजीव छायाचित्रकार संदेश कडूर यांनी काल येथे केले. डी. डी. कोसंबी ... Read More »

आठवणीतली उचकी नव्हे; ‘उचकी’ ः एक रोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) उचकी ही फक्त दुसर्‍यांनी आठवण काढण्यानेच येत नाही तर तो एक स्वतंत्र रोग किंवा इतर रोगांमध्ये लक्षणस्वरूपातही असू शकतो. म्हणूनच उचकी ही नेहमी क्षुद्रा किंवा अन्नजा नसते. म्हणून उचकीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.  ‘उचकी’ लागली म्हणून कोणी डॉक्टरांकडे तपासायला बहुधा येत नाही. बर्‍याच वेळा उचकी आहारसेवनानंतर किंवा काही अचानक केलेल्या हालचालींमुळे ... Read More »

काळजी घ्या दातांची…. दुधाचे दात का महत्त्वाचे?

– डॉ. श्रुती दुकळे (पर्वरी ) रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपी जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात… ‘दुधाचे दात’ ज्यांना आपण ‘बाळ दात’सुद्धा म्हणतो, ते निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. दुधाचे ... Read More »