Daily Archives: February 13, 2017

डोनाल्ड ट्रम्प यांचे रोखठोक निर्णय

– दत्ता भि. नाईक डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्व प्रयोग विलक्षण आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढेल की कमी होईल हे आताच सांगता येणार नाही. त्यांचा आग्रहीपणा त्यांनी विश्‍वात सुख-शांती नांदवण्यासाठी वापरला तर ती एक चांगली गोष्ट ठरेल. सध्या तरी भारत-अमेरिका संबंध सुधारतील अशी आशा बाळगणे एवढेच आपल्या हाती आहे. शुक्रवार, दि. २० जानेवारी २०१७ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्‍वात सर्वात ... Read More »

उगवतीकडे…

 – सौ. प्रतिभा कारंजकर (प्रवासवर्णन) भाग- १ नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या टेकडीवर हे उमानंद महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे जायला सत्तर पायर्‍या चढून जावे लागते. पायर्‍या सुरू होण्यापूर्वी आपलं स्वागत होतं ते एका सुंदर कमानीने. असं सांगितलं जातं की या छोट्याशा पर्वतटेकडीवर स्वतः श्री शंकर तपस्येला बसले होते. देशातला बराच भाग नजरेखालून घातला, पण पूर्वांचल म्हणजे जेथून सूर्य आपल्या देशात प्रवेशकरता ... Read More »

काश्मीरात ४ दहशतवादी ठार ; २ जवानही शहीद

>> चकमकीत एका युवकाचाही मृत्यू : नागरिकांकडून मोठा हिंसाचार   श्रीनगरपासून सुमारे ७० कि.मी. वरील एका खेड्यात काल पहाटे भारतीय सैनिकांनी केलेल्या एका कारवाईत ४ दहशतवाद्यांसह एक नागरीक ठार झाला. तसेच भारताचे दोन सैनिकही शहीद झाले. ठार झालेले दहशतवादी हे लष्करे तैयबा व हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य होते. या कारवाईत स्थानिक युवक ठार झाल्याने तेथील ग्रामस्थांनी मोठा हिंसाचार माजवला. त्यावर नियंत्रण ... Read More »

जप्त दारूच्या प्रकरणांची खात्याकडून सुनावणी सुरू

>> एकूण ६० ते ७० प्रकरण   गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात जी लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली. त्याबाबत अबकारी खात्यात नोंद ६० ते ७० प्रकरणांची सुनावणी चालू झाली असल्याचे अबकारी खात्याचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी काल सांगितले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली होती. मतदारांना देण्यासाठी ही दारू आणल्याच्या संशयावरून ती जप्त करण्यात आली होती. ... Read More »

सत्यार्थींच्या पुरस्कार चोरट्यांना अटक

बाल हक्क कार्यकर्ते तथा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरातून नोबेल स्मृती चिन्हासह मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून नोबेल पुरस्काराची प्रतीकृती व अन्य वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र नोबेल स्मृती चिन्ह अद्याप सापडलेले नाही. गेल्या ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या येथील एका इमारतीतील फ्लॅटमधून वरील वस्तूंची चोरी झाली होती. अटक करण्यात आलेले ... Read More »

शशिकलांनी आमदारांना उपस्थित केले पत्रकारांसमोर

अभाअद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांन काल आपल्या समर्थक आमदारांना पत्रकारांसमोर उपस्थित करून आमदारांना लपवून ठेवण्यात आल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. बंडखोर व विरोधक या अनुषंगाने खोट्या बातम्या पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आपले आमदार मुक्त असून त्यामुळे आपला पक्ष व सरकारही भक्कम असल्याचा दावा यावेळी शशिकला यांनी केला. त्यांच्या गटाचे आमदार राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ... Read More »

लक्ष्य उत्तर प्रदेश!

राजकीयदृष्ट्या देशातील सर्वांत महत्त्वाचे राज्य मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस एकत्र आले आहेत आणि एकजुटीने पुन्हा एकवार सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री अखिलेश पाहात आहेत. दुसरीकडे, गेल्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी तब्बल ७१ जागा जिंकून इतिहास घडवणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या आशाही या निवडणुकीत पल्लवीत झाल्या आहेत. तिसरीकडे, गेल्या निवडणुकीत धूळधाण ... Read More »