Daily Archives: February 11, 2017

मद्यविक्रेत्यांची कड

राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून पाचशे मीटर अंतरावरील सर्व मद्यालये व मद्य विक्री केंद्रे हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १५ डिसेंबरला दिलेल्या निवाड्याच्या अंमलबजावणीची घटिका जसजशी जवळ येत आहे, तशी मद्यविक्रेत्यांची अस्वस्थता वाढीस लागलेली दिसते आहे. काल गोव्यातील मद्यविक्रेत्यांनी पर्वरीत एक बैठक घेऊन संघटित व्हायला प्रारंभ केलेला आहे. दुसरीकडे, सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुकावार अहवाल तयार करण्यासाठी समित्या नियुक्त केल्या आहेत. परवाने ... Read More »

पंचायत निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सुरू केलेल्या प्रभाग ङ्गेररचनेचे काम पंचायत खात्याने स्थगित ठेवले असून पंचायत निवडणुकीची तारीखही नव्या सरकारने ठरवावी, असे ठरविले आहे. त्यामुळे दि. २१ मे रोजी निश्‍चित केलेली पंचायत निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका दि. २१ मे रोजी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे पंचायत खात्याने प्रभाग ङ्गेररचनेची प्रक्रिया सुरू केली होती. गोवा ङ्गॉरवर्डसह ... Read More »

राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करावी ः कॉंग्रेस

घटनात्मक पेचप्रसंग टाळण्यासाठी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गोवा विधानसभा आपल्या अधिकाराचा वापर करून बरखास्त करावी, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. शेवटचे अधिवेशन झाले त्या घटनेला सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी पुढील अधिवेशन बोलावण्यात यावे. अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग टाळण्यासाठी राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करावी व राष्ट्रपती राजवट लागू करावी ... Read More »

शेळवण येथे नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

बेतकाटो, शेळवण येथील हितेश हनुमंत नाईक (१४) या नववीत शिकणार्‍या मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. हितेश हा कुडचडे येथील सर्वोदया हायस्कुलात शिकत होता. गुरुवार दि. ९ रोजी संध्याकाळी ४ वा. ही दुर्घटना घडली. शिकवणी चुकवून १२ ते १५ वयोगटातील काही मुले येथील जुवारीच्या उपनदीवर आंघोळीसाठी गेली होती. सर्व मुले पाण्यात उतरली. पण हितेशने थेट पाण्यात उडी मारली व त्यानंतर ... Read More »

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आज ७३ जागांसाठी मतदान

>> पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी कडेकोट सुरक्षा   उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १५ जिल्ह्यांतील सर्व ७३ जागांसाठी मतदान होत असून निवडणूक आयोगाने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. एकूण १४,५१४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होईल. सुमारे २.५९ कोटी मतदार आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करतील. धार्मिकरित्या संवेदनशील असलेल्या मुज्जफ्फराबाद, ... Read More »

‘सुर जहॉं’ संगीत महोत्सवाची रंगतदार सांगता

कला आणि सांस्कृतिक संचालनालयाने बांगला नाटक डॉट कॉम व कला अकादमीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ‘सुर जहॉं’ विश्‍वशांती संगीत महोत्सवाची काल इल्लीका सोलो रङ्गाईल (स्विडन), ओटावा यो (रशिया) व पंजाब कव्वाली (भारत) या रंगतदार कार्यक्रमांनी सांगता झाली. तिन्ही दिवस या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. इल्लिका, सोलो व रङ्गाईल या स्विडन, सेनिगल व मेक्सिको येथील संगीतकारांचा एकत्रित सांगितिक आविष्कार शुक्रवारी रसिकांना ... Read More »

विद्यार्थी-वाचकांचे आधारस्तंभ ‘डिचोली तालुका ग्रंथालय’

– देवेश कुसुमाकर कडकडे (आतील पेठ-डिचोली) आज सगळीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठीची धडपड किंवा सगळ्याच व्यवस्था, उद्योगाच्या शाखा फोफावत असताना वाचकसुद्धा एक ग्राहक म्हणून सामावून घ्यायला प्रशस्त जागेसाठी इथे कोणीही पुढाकार घेतला नाही… ही शोकांतिका आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी-वाचकांचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण, दर्जेदार, अधिक सक्षम आणि किफायतशीर जागा उपलब्ध करून देणे ही निश्‍चितच जिव्हाळ्याची बाब आहे!!! डिचोली शहराला इतिहासासोबत ... Read More »

‘सुसंस्कृत समाजा’तील समस्या..!

– आरती सुखठणकर (निवृत्त मुख्याध्यापिका) कोणत्याही चित्रकार/कलाकाराला धर्म, जात, लिंग, वर्ण, भाषा-भूषा, वर्ग यांची बंधने रोखू शकत नाहीत. जे सत्य आहे ते शिव आहे नि सुंदरही आहेच… नि तेच परमेश्वराचे रूप आहे. प्रत्येक धर्मग्रंथात हेच तर ठासून भरले आहे, पण आपण माणसांनी या भिंती उभ्या करून आपापसात का बरं दुरावा निर्माण केला आहे? …. मागील अंकात आपण मूल दत्तक घेताना ... Read More »