Daily Archives: February 9, 2017

उतावळे नवरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अद्याप महिनाभर अवकाश असला, तरी विविध राजकीय पक्षांनी सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे पाहावयास मिळते. मुख्यमंत्रिपदाच्या विविध दावेदारांनी तर त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. या निवडणुकीत बहुतेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती झाल्याने मतांच्या कापाकापीमुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे ढोल काही राजकीय निरीक्षक पिटत असल्याने आपल्या आगामी व्यूहरचना करण्यात राजकीय नेते दंग झालेले दिसतात. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वांत ... Read More »

कोकण रेल्वे मार्गाचे १०,४५० कोटी खर्चून दुपदरीकरण

कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून १०,४५० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली. गोव्याचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी सदर विषयावर त्यांना प्रश्‍न केला होता. गोव्याबरोबरच कोकणच्या विकासात मोठे योगदान असलेल्या कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणावर रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी खास लक्ष केंद्रित केले आहे. २०१५-१६ अर्थसंकल्पात कोकण ... Read More »

२० पासून बँक खात्यातून काढता येतील ५० हजार

>> १३ मार्चपासून सर्व निर्बंध मागे घेणार   नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने बँक खात्यातून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असून २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रुपये काढता येतील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल स्पष्ट केले आहे. दरम्यान, १३ मार्चपासून एटीएम व बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा मागे घेण्यात येईल अशी घोषणा आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी काल ... Read More »

आंधळेपणाने कोणालाही पाठिंबा नाही ः गोवा फॉरवर्ड

गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन उमेदवार विजयी होणार असून सरकार स्थापनेसाठी जर कुणी आमच्याकडे पाठिंबा मागितला तर आम्ही आंधळेपणे कुणालाही पाठिंबा देणार नसून जे कोण गोवा, गोमंतकीय व गोमंतकीय संस्कृतीच्या भल्यासाठी काम करण्याचे वचन देतील, त्यांनाच पाठिंबा देणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रमुख प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी काल सांगितले. सत्ता मिळावी यासाठी आम्ही उगाच कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फातोर्डा, ... Read More »

मुख्यमंत्री गोव्यात परतले

विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या कुटुंबासह विश्रांतीसाठी म्हणून दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर काल गोव्यात परतले. आपल्या या दिल्ली भेटीत त्यांनी कुटुंबीयांसमवेत राष्ट्रपती भवनालाही सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्री म्हणून कार्यालयात जावेच लागते. ङ्गायलींचा प्रचंड ढीग टेबलावर पडलेला असून पुढील दोन दिवसांत त्या सर्व ङ्गायली हातावेगळ्या करणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागू आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच ती संपेल. त्यामुळे महत्त्वाचे ... Read More »

मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट्‌स बंदोबस्तात ‘स्ट्रॉंग रुम्स’मध्ये

उत्तर गोव्यातील १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर या सर्व मतदारसंघांतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट्‌स कांपाल येथील बाल भवन इमारतीत ‘स्ट्रॉंग रुम‘मध्ये ठेवण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तेथे त्रिस्तरीय कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नीला मोहनन यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी २४७ तास कडेकोट बंदोबस्त ... Read More »

महामार्गांवरील दारू दुकानांच्या प्रश्‍नावर आज महत्त्वपूर्ण बैठक

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांपासून ५०० मीटरांच्या अंतरावर असलेल्या दारू दुकानांच्या परवान्यांचे येत्या १ एप्रिलनंतर नूतनीकरण करू नये असा जो आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पर्वरी येथील सचिवालयात दु. ३ वा. होणार असल्याचे अबकारी खात्याचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी सांगितले. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर कोणती पावले उचलावीत यावर ... Read More »