Daily Archives: February 8, 2017

फटकार

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांवर प्रथमच एवढा थेट, घणाघाती हल्ला चढविल्याचे काल पाहायला मिळाले. कॉंग्रेसमुळे देशातील लोकशाही वाचली या मल्लिकार्जुन खड्‌गेंच्या विधानाचा आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत तर त्यांनी समाचार घेतलाच, शिवाय देशाला स्वातंत्र्य केवळ एकट्या गांधी – नेहरू घराण्याने मिळवून दिलेले नाही याचेही स्मरण करून दिले. गांधी घराण्यातील कुत्र्यांच्याही देशभक्तीला ... Read More »

आकेत ७९.८९% मतदान

आके, मडगाव येथील बूथ क्रमांक ८वर काल घेण्यात आलेल्या फेरमतदानावेळी ७९.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत झाले असून या बूथवरील ७९१ मतदारांपैकी एकूण ६३२ जणांनी मतदान केल्याची माहिती दक्षिण गोवा निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. आके येथील टी. बी. कुन्हा हायस्कूलमध्ये वरील मतदान केंद्राचे फेरमतदान कडक पोलीस बंदोबस्तात पार पाडले. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात करण्यात आली. सकाळपासून मतदान करण्यासाठी ... Read More »

मडगाव मतदारसंघातून विजय निश्‍चित : दिगंबर

मडगाव मतदारसंघातून आपला विजय निश्‍चित असून आपणाला ङ्गेरमतदानाची चिंता नव्हती, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मडगाव शहरात हल्लीच झालेली ‘सेमी ङ्गायनल’ मी मोठ्या ङ्गरकाने जिंकलो होतो. त्यामुळे मतदारसंघातील आके येथील मतदान केंद्र क्रमांक ८ वर जे ङ्गेरमतदान घ्यावे लागले त्या घटनेने निराश होण्याचा अथवा तणावाखाली येण्याचा प्रश्‍नच नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर आपण मडगाव मतदारसंघातून ... Read More »

पर्रीकरांना केंद्रीय निवडणूक आयोगाची नव्याने नोटीस

>> आचारसंहितेचा भंग प्रकरण निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नव्याने नोटीस बजावली असून बुधवारी (दि. ९) संध्याकाळी ३ पर्यंत त्यांना उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे. पहिल्या नोटिसीला उत्तर देताना आपल्या निवडणूक भाषणाचा कोकणीतून केलेला अनुवाद आयोगाने चुकीच्या पद्धतीने केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले होते. आपण पैसे घेऊन मतदान करा असे वक्तव्य केले ... Read More »

वेतन आयोग लागू करताना घरभाडे व प्रवास भत्ता नाही

>> सरकारी कर्मचार्‍यांना प्रतीक्षा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी घरभाडे व प्रवास भत्ता देण्यात आला नसल्याने या भत्त्यांची प्रतीक्षा असल्याचे गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सातव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता हा मूळ पगाराच्या ८ टक्के एवढाच देण्याची शिङ्गारस करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांनी त्याला ... Read More »

नोटाबंदी योग्यवेळीच : मोदी

राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाचे समर्थन करत देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असताना सदर निर्णय योग्यवेळी घेतल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींना चिमटा काढला. सोमवारी आलेल्या भूकंपाचा उल्लेख करून मोदी म्हणाले, याची धमकी पूर्वीच दिली होती. अखेर तो भूकंप काल आलाच. तेव्हा सभागृहात हास्याची एकच लहर उसळली. मोदींनी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे ... Read More »

कोरगाव येथे वासनांध योगा शिक्षकाला अटक

>> अमेरिकन महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार कोरगाव, पेडणे येथे एका ३२ वर्षीय अमेरिकन पर्यटक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी शिवोली येथील प्रतीक कृष्णकुमार (३८) या योगा शिक्षकाला अटक केली असून काल त्याला वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर हजर केले असता ८ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॅलिङ्गोर्निया, अमेरिका येथील ... Read More »