Daily Archives: February 3, 2017

सुसाट ट्रम्प

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेतल्यापासून त्यांनी आपली आक्रमकता दाखवायला सुरूवात केली आहे. पहिल्या फटक्यात त्यांनी सात मुस्लीम देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेशबंदी जारी केली. लागोपाठ एच १ बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात साठ हजार डॉलरवरून थेट १,३०,००० डॉलर एवढी दुपटीहून अधिक वाढ करून भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना अप्रत्यक्ष दणका दिला. आजवर अमेरिका ही जगभरातील लोकांसाठी पंढरी बनली होती. सुखवस्तू ... Read More »

प्रचार संपला; उद्या मतदान

>> निवडणुकीची सर्व सज्जता   उद्या शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व सज्जता झाली असून जाहीर प्रचाराची मुदत काल संपुष्टात आली. आज शुक्रवारी दुपारपासून निवडणुकीची सामुग्री घेऊन निवडणूक अधिकार्‍यांना संबंधित मतदानकेंद्रांवर पाठविले जाईल. उद्या शनिवारी सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी ... Read More »

मगोला जवळ घेण्याची गरज भासणार नाही : पर्रीकर

प्रचाराचा अंतिम टप्पा पूर्ण होईपर्यंत आपण ३६ मतदारसंघांचा दौरा केला असून भाजपने गेल्या पाच वर्षांच्या काळात दिलेल्या स्थिर सरकारची पावती म्हणून उद्याच्या निवडणुकीत पक्षाला दोन तृतियांश बहुमत मिळेल. त्यामुळे मगोला जवळ घेण्याची गरजच भासणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक अधिकार्‍यांनी आपल्या एका वक्तव्यावर पाठविलेली नोटीस आपण वकिलाकडे दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाला वरील ... Read More »

नागालँडमध्ये सरकारी कार्यालयांची जाळपोळ

>> महिला आरक्षण आंदोलन चिघळले   नगरपालिका निवडणुकांसाठी महिलांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनाला मोठे हिंसक वळण लागले. आंदोलकांनी राजधानीत मोठ्या प्रमाणात जाळपोळ व लुटालूटही केली. हजारोंच्या संख्येने निदर्शकांनी राज्याच्या येथील सचिवालयावर चाल केली व नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकारी इमारतींना आग लावली. अन्य सरकारी कार्यालयांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर नव्या सचिवालय इमारत संकुलाला निमलष्करी जवानांनी घेरले आहे. ... Read More »

भाभासुमंचे माध्यम आंदोलन निवडणुकीनंतरही चालेल : वेलिंगकर

गोवा सुरक्षा मंचाचा महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही स्वयंसेवक भाजपला मतदान करणार नाही असा दावा गोवा सुरक्षा मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर यानी काल पत्रकार परिषदेत केला. भाभासुमंचे माध्यमविषयक आंदोलन निवडणुकीनंतरही सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माध्यम प्रश्‍नावर भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली व आपल्यासह भाभासुमंच्या सर्व नेत्यांवर वैयक्तिक सूड उगविण्याची संधी सोडली नाही. आता भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची ... Read More »

प्रचंड मताधिक्क्याने मांद्रेत विजयी होणार : पार्सेकर

आपण ६००० हजार मताधिक्याने चौथ्यांदा विजयी होणार अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिली. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी काही वर्तमान पत्रांनी पेडणेचे चित्र भाजपच्या विरोधात चित्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पेडणे मतदारसंघातून राजेंद्र आर्लेकर व मान्द्रेमधून आपण चौथ्यांदा विजयी होणार असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकाकडे कोणताच विकासाचा मुद्दा नाही, केवळ निवडणुका जवळ आल्या कि मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून जर ... Read More »