Daily Archives: February 1, 2017

जेटलींची पोटली!

अर्थमंत्री अरुण जेटली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. नोटबंदीने ढवळून निघालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठी पावले उचलण्याचा एकीकडे असलेला दबाव आणि दुसरीकडे तोंडावर आलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांवर नजर ठेवून लोकप्रियता टिकवण्याचे दडपण यामधून वाट काढून हा संतुलित अर्थसंकल्प मांडण्याची कसरत जेटली यांना आज करावी लागणार आहे. नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती धीमी झाल्याची कबुली कालच्या ... Read More »

डिजिटलायजेशन हे रामबाण औषध नव्हे ः इकॉनॉमिक सर्व्हे

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात (इकॉनॉमिक सर्व्हे) डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत सबुरीने घेण्याचा सल्ला देताना काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासंबंधात डिजिटलायजेशन हे रामबाण औषध ठरू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. रोकड व्यवहार पूर्णपणे वाईटच आहे असे नव्हे. त्यामुळे रोकड व डिजिटल आर्थिक व्यवहार यांचा योग्य समतोल राखण्यावर भर देण्यात यावा अशी सूचना या अहवालात ... Read More »

कॉंग्रेस सत्तेवर आल्यास गोव्याला विशेष राज्य दर्जा

>> कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला गोव्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले तर राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्यात येईल. ‘वुई शाईन’ हे कॉंग्रेस पक्षाचे यावेळचे घोषवाक्य असून पारदर्शक प्रशासन, गोव्याचे सबलीकरण, जबाबदार सरकार याचे आम्ही गोव्यातील जनतेला वचन देतो, असे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे माध्यम प्रमुख रणदीप सिंह सुरजेवाला यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यास २०१२ पूर्वी राज्यात जे ... Read More »

गोव्याला विशेष राज्य दर्जा कशाला हवा?

>> पर्रीकर ः भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल केंद्र सरकारने राज्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे गोव्याला विशेष राज्य दर्जा कशाला हवा असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येत्या निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. येथील जमिनींच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा करणे शक्य आहे. त्याचा नवे सरकार विचार करेल असेही त्यांनी सांगितले. ... Read More »

पर्तगाळी मठाधीशांचा शिष्य स्वीकार सोहळा ९ फेब्रुवारीला 

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधीश श्रीमद् विद्याधीराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचा शिष्य स्वीकार सोहळा ९ फेब्रुवारी रोजी मठात होत असून यानिमित्त ८ व ९ फेब्रुवारी असे दोन दिवस मठात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे श्री संस्थान समिती व शिष्य स्वीकार आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शिष्य स्वीकार सोहळा गुरुवार दि. ... Read More »