Daily Archives: January 11, 2017

कृतघ्नता

सीमा सुरक्षा दलाच्या २९ बटालियनमधील एक जवान तेजबहादुर यादव याने बीएसएफच्या जवानांना देण्यात येणारा अपुरा नाश्ता आणि निकृष्ट जेवण यावर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आणि ते व्हायरल होताच संपूर्ण देश त्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असले, तरी सीमा सुरक्षा दलाकडून सदर जवानाचेच चारित्र्यहनन सुरू असून त्याच्या तक्रारीला बेदखल करण्याची धडपड ... Read More »

उमेदवारी अर्ज आजपासून स्वीकारणार

>> विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज >> ४० भरारी पथके कार्यरत येत्या ४ ङ्गेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. निवडणूक अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ आहे. मतदारयादीचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून ४० मतदारसंघांसाठी २९ निर्वाचन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली ... Read More »

गोवा ङ्गॉरवर्ड, युगोपशी युतीला कॉंग्रेस पक्षाची तत्त्वतः मान्यता

काल नवी दिल्लीत रात्री झालेल्या केंद्रीय निवडणूक छाननी समितीच्या बैठकीत कॉंग्रेसने विजय सरदेसाई यांच्या गोवा ङ्गॉरवर्ड व बाबूश मोन्सेर्रात यांच्या युनायटेड गोवन्स पक्षाबरोबर दि. ४ रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत युती करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युतीचा प्रस्ताव ङ्गेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरील प्रादेशिक पक्षांबरोबर युतीला अखिल भारतीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्यता दिली असून अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष ... Read More »

नार्वेत युवकाचा निर्घृण खून

गावकरवाडा, नार्वे – डिचोली येथील मुख्य जंक्शनजवळ असलेल्या साकवाखाली सतीश गुरुदास परवार (१७) या स्थानिक युवकाचा दगडाने ठेवून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह काल आढळून आला. सदर मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. तीस मीटर अंतरावर ठार करून त्याला साकवाखाली लपवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याने सदर प्रकार खुनाचाच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देताना मयत सतीश याच्या ... Read More »

मगो, गोसुमं, शिवसेना युती ३७ मतदारसंघांमध्ये लढणार

>> युतीची अधिकृत घोषणा   येत्या दि. ४ ङ्गेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी काल मगो, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली. किमान समान कार्यक्रमाचे सूत्र घेऊन राज्यातील ३७ मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय युतीचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर, मगो नेते सुदिन ढवळीकर व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केला. युतीचे सरकार स्थापन करण्यासाठीचे ... Read More »

बालगोपाळ सादर करणार आहेत दशावतारी काला लोकोत्सवानिमित्त पणजीत १४ रोजी आयोजन

आपल्या पारंपरिक लोककला लोप पावत असताना आणि त्यांच्या संवर्धनाची गरज व्यक्त होत असताना केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात न ठरता प्रत्यक्षात नव्या पिढीकडे ही लोककला सोपवण्याचा एक प्रयत्न म्हार्दोळच्या ‘कृतार्थ’ संस्थेने केलेला आहे. एकेकाळी गावोगावी लोकप्रिय असलेल्या व अस्तंगत होत चाललेल्या दशावतारी काल्याचा ठेवा जतन करण्यासाठी बालगोपाळांकडून हा ‘काला’ संस्थेने बसवून घेतला असून येत्या मकर संक्रांतीला १४ जानेवारीस कला ... Read More »