Daily Archives: January 10, 2017

सत्ताकांक्षी मगो

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची गेली पावणे पाच वर्षे सत्तेत साथसोबत करीत आलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच आज भाजप विरोधात सर्वांत आक्रमकपणे येत्या निवडणुकीत उभा ठाकलेला दिसत आहे. हो, नाही करता करता गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेसारख्या समविचारी मंडळींना आपले पाठबळ देत मगोने या निवडणुकीत प्रथमच आपला राजकीय विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मगो पक्षाची गेली अनेक वर्षे ढवळीकर ... Read More »

मगो पक्ष विलीन केल्यास मुख्यमंत्रिपदाचा होता प्रस्ताव

>> सुदिन ढवळीकर यांचा गौप्यस्फोट   मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या अटीवर एकदा कॉंग्रेस पक्षाने, तर एकदा भारतीय जनता पक्षाने आपल्यापुढे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आपण स्वहितापेक्षा पक्षहित नजरेसमोर ठेवून दोन्ही वेळा तो फेटाळल्याचा दावा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काल केला. २००५ साली कॉंग्रेस पक्षाने आपल्याला मगो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या अटीवर मुख्यमंत्रिपद देऊ केले होते, तर भाजपचे ... Read More »

पेडण्यात राजेंद्र आर्लेकरच!

>> पर्रीकरांच्या शिष्टाईनंतर तिढा सुटला   पेडणे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. काल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे श्री. आर्लेकर यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. संरक्षणमंत्र्यांनी शिष्टाई करताना नाराज बनलेल्या काही कार्यकर्त्यांची समजूत काढली. यामुळे पेडण्याचे भाजपचे विद्यमान आमदार आर्लेकर यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा ... Read More »

गोवा सुरक्षा मंचाला ‘फळा’ चिन्ह

गोवा सुरक्षा मंचने केलेल्या अर्जानुसार भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून गोवा सुरक्षा मंचची नोंदणी केली असून पक्षाला फळा (ब्लॅक बोर्ड) हे चिन्ह दिले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पक्षाच्या नोंदणीसाठीचे सोपस्कार आम्ही ३ जानेवारी रोजीच पूर्ण केले होते. त्याशिवाय पक्षाच्या चिन्हाची आम्ही १० चिन्हेही सादर केली होती. त्यात सवार्र्ंत वरचे स्थान फळ्याला ... Read More »

राजू सुकेरकर यांना पणजीत उमेदवारी

गोवा सुरक्षा मंचने पणजी मतदारसंघातून कृष्णराज उर्फ राजू सुकेरकर यांना उमेदवारी दिल्याचे काल पक्षाचे आनंद शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोवा सुरक्षा मंच, मगो, शिवसेना युतीचे उमेदवार आज (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जमीनदार असलेले कृष्णराज सुकेरकर हे एक अजातशत्रू असून समाजकारणातून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे यावेळी बोलताना शिरोडकर यांनी स्पष्ट केले. गोवा सुरक्षा मंंचची ... Read More »

पोर्तुगालच्या प्रधानमंत्र्यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

>> मगो, गोवा सुरक्षा मंच पक्षांची मागणी   गोव्याच्या भेटीवर येणार असलेले पोर्तुगालचे प्रधानमंत्री आंतोनियो कॉस्ता यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीयावर जो धर्मच्छळ करण्यात आला त्यासंबंधी गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी काल मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर व गोवा सुरक्षा मंचचे नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी केले. पोर्तुगीज राजवटीत गोव्यात कित्येक स्वातंत्र्यसैनिकांना कंठस्नान घालण्यात आले. कित्येकांना ... Read More »

कार्यक्रमावर निवडणूक अधिकार्‍यांची करडी नजर

पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉस्ता यांच्या गोवा भेटीवेळी आयोजित कार्यक्रम राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकार्‍यांच्या स्कॅनरखाली असेल. राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने निवडणूक अधिकार्‍यांची या सोहळ्यावर करडी नजर ठेवणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल सांगितले. ‘‘पोर्तुगीज पंतप्रधान उपस्थित राहणार असलेल्या कार्यक्रमाला आमच्या अधिकार्‍यांचे पथक उपस्थित राहतील. यावेळी होणारी वक्त्यांची भाषणे राजकीय हेतू प्रेरित नसतील याची खात्री सदर पथकातील अधिकारी करतील’’ ... Read More »

डोळ्याखालील काळी वर्तुळे ः सौंदर्यात बाधा

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. एखाद्या सुंदर युवतीच्या किंवा रूबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे दिसू लागली तर कसे दिसतील ते सांगा? डागरहित चेहरा कुणाला ... Read More »

पित्तावर घरगुती उपाय…

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्‌स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा. * आरामदायी केळं – केळातून शरीराला ... Read More »