Daily Archives: January 9, 2017

थोडी प्रतीक्षा!

गोवा विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे मतदारसंघांमधील वातावरण तापू लागल्याचे दिसते आहे. काही मतदारसंघांमध्ये विविध पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एव्हानाच दिसू लागलेला संघर्ष चिंताजनक आहे. येणारी निवडणूक अटीतटीची ठरणार असली, तरी त्याचे अशा प्रकारचे शारीरिक पातळीवरील पडसाद उमटू नयेत याची काळजी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागेल. गोवा राज्य उत्साही आणि शांततापूर्ण मतदानासाठी प्रसिद्ध आहे. काही मतदानकेंद्रे भले संवेदनशील जाहीर केली ... Read More »

मगोप – गोसुमं – शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या

मगो, शिवसेना व गोवा सुरक्षा मंच यांच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या १० जानेवारी रोजी अधिकृतरित्या करण्यात येणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नारायण सावंत व सरचिटणीस तथा पक्षाचे आमदार लवू मामलेदार उपस्थित होते. दरम्यान, सांत आंद्रेचे सरपंच जगदीश भोबे यांच्यासह सत्यविजय नाईक, विजय गावकर व दिलीप सगुण नाईक यांनी काल मगो पक्षात प्रवेश ... Read More »

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‌ळकरीण जत्रेचा समारोप महारथ मिरवणुकीने झाला. काल पहाटे मिरवणुकीवेळी प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. Read More »

कॉंग्रेस उमेदवारांची उद्या घोषणा

>> लुईझिन फालेरो यांची माहिती   कॉंग्रेस पक्ष गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची नावे उद्या १० रोजी जाहीर करणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १० रोजी नवी दिल्ली येथे होत आहे. ती झाल्यानंतर तात्काळ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे फालेरो यांनी काल स्पष्ट केले. केेंद्रीय समितीच्या नवी दिल्ली ... Read More »

आर्लेकर, शेट, तवडकरांच्या उमेदवारीबाबत निर्णय उद्या

>> गणेश गावकर – विनय तेंडुलकर यांच्यात सावर्ड्यात चुरस   सभापती व मयेचे आमदार अनंत शेट, काणकोणचे आमदार व मंत्री रमेश तवडकर, वन व पर्यावरणमंत्री व पेडणेचे आमदार राजेंद्र आर्लेकर व सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय प्रलंबित असून उद्या १० रोजी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. वरील चारही जागांवर भाजपने टांगती तलवार ठेवल्याने सध्या तो ... Read More »

आम आदमी पक्षाचे पाच महिला उमेदवार

गोव्यातील आघाडीचे पक्ष महिलांना उमेदवारी देण्याचे टाळत असतानाच गोव्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पार्टीने मात्र एकूण ५ महिलांना उमेदवारी दिलेली आहे. पक्षाने ताळगाव मतदारसंघातून सेसिल रॉड्रिग्ज, हळदोणे मतदारसंघातून रोझी उर्सुला डिसोझा, म्हापशातून श्रद्धा खलप, बाणावलीतून रॉयला फर्नांडिस व वास्कोतून लॉरेटा डिसोझा यांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही महिला व पुरुष यांच्यात भेदभाव करीत नाहीत. त्यामुळेच आम्ही एवढ्या संख्येने महिलांना ... Read More »

देशभक्तीसाठी मतभेद विसरा : ब्रह्मेशानंदस्वामी

>> तपोभूमीवर ‘वंदे मातरम्’ सोहळ्याला लोटला वीराट जनसमुदाय >> सैनिक निधीसाठी संप्रदायातर्फे ६ लाख भूमाता प्रत्येकावर प्रेम करीत असली तरी देशवासियांच्या मनात अजूनही मातृभूमीविषयी संभ्रम आहे. देश सांभाळताना इतिहास व संस्कृती पुढे नेण्याची नितांत गरज आहे. प्रत्येकाने मनातील देशभक्ती मोठी करून एकमेकांना सहकार्य करताना सर्व मतभेद विसरणे गरजेचे आहे असे उद्गार सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी यांनी तपोभूमी, कुंडई येथे काढले. सद्गुरू ... Read More »