Daily Archives: January 7, 2017

चतुरस्र

ओम पुरी यांच्या निधनाने एक वैविध्यपूर्ण अभिनयाचे पर्व संपले आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि अतिशय गंभीर सामाजिक आशयाच्या चित्रपटांपासून बाष्कळ विनोदपटापर्यंत नानाविध प्रकारच्या भूमिका करून आपल्या अंगभूत कसदार अभिनयगुणांचे दर्शन घडवणारे ओम पुरी हे एक अजब रसायन होते. खरे तर चित्रपटास योग्य नसलेला खडबडीत चेहरा, जाडाभरडा आवाज अशी सगळी व्यंगे असूनही त्या व्यंगांनाच आपली बलस्थाने बनवून त्यांनी अभिनयक्षेत्रात जी भरारी घेतली ... Read More »

भाजपचे २१ उमेदवार जाहीर

>> उर्वरीत उमेदवारांची ९ जानेवारीपर्यंत घोषणा   येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, केपे हे पाच डळमळीत व अन्य १४ मतदारसंघ वगळता काल एकूण २१ मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली. उर्वरीत मतदारसंघातील उमेदवार दि. ९ पर्यंत जाहीर करणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार तथा पक्ष प्रवक्ते नरेंद्र सावईकर यांनी पत्रकारांना सांगितले. जाहीर केलेल्या २१ ... Read More »

कॉंग्रेसच्या उमेदवारांची निवड १२ रोजी जाहीर होणार

येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार दि. १२ रोजीपर्यंत जाहीर होतील. असे अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गोवा फॉरवर्डने आपला युतीचा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना सादर केला आहे. त्यामुळे त्यावर पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असेही चोडणकर म्हणाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्डचे सदस्य नाहीत, असेही त्यांनी सांगितले. येत्या दि. ... Read More »

प्रवासी बस-टँकर अपघातात तांबोसे येथे प्रवासी बचावले

तांबोसे, पेडणे येथे काल प्रवासी बस व पेट्रोलवाहू टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टँकरचालक व कंडक्टर गंभीर जखमी झाले. तर बसमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर अडकून पडलेल्या प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताङ्गीने बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पुणे व्हाया गोवा मार्गावरील एमएच-०४-४९८३ या क्रमांकाची नाईक मुराद स्लिपर ... Read More »

ओम पुरी यांचे निधन

हिंदी सिनेजगतातील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांचे काल सकाळी हृदयविकारच्या झटक्याने वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमधून आपल्या सकस अभिनयाने रसिकांवर छाप पाडलेल्या ओम पुरी यांच्या निधनाबद्दल सिनेसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या विभक्त पत्नी नंदिता पुरी व इशान हे ... Read More »

सरस्वती सांस्कृतिकच्या ‘काळीमा’ला प्रथम पुरस्कार

कला अकादमीने आयोजित केलेल्या ४७ व्या ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून श्री सरस्वती सांस्कृतिक मंडळ, रावण, सत्तरी यांनी सादर केलेल्या ‘काळीमा’ या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदोडा यांच्या ‘आनंदीबाई’ नाट्यप्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्री साईकला मंडळ-सांगोल्डा यांच्या ‘तो मृत्यूंजय एक’ या नाटकाची ... Read More »

कॉंग्रेसच्या धोरणावर चर्चिल आलेमाव नाराज

भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसने समविचारी पक्षांशी समझोता करून ही विधानसभा निवडणूक लढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न झाल्यास गोमंतकीयांना नको असलेला भाजपाच सत्तेवर येईल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले. याची कल्पना असूनही कॉंग्रेसने एकला चलोरे केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस गोव्यात तीस मतदारसंघात उमेदवार उभे करील असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. दोन वर्षांआधीपासून आपण ... Read More »

केजरीवालांच्या आज-उद्या गोव्यात ४ सभा होणार

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या आज ७ व उद्या ८ या दोन दिवस गोव्यात ४ जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा आज संध्याकाळी ५ वा. बाणावली मतदारसंघात होणार आहे. तद्नंतर त्यांची दुसरी सभा वास्को मतदारसंघात होणार असून मुरगाव नगरपालिकेजवळ शहराच्या चौकात ती होईल, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष व पणजीचे आमदार वाल्मिकी नाईक ... Read More »

एक लग्न…दोन दृष्टीकोन

– अंजली विवेक मुतालिक (कुडाळ) एखाद्या गोष्टीबद्दल पुरुष जिथे केवळ वीस शब्द वापरतात तिथे तोच विषय मांडायला बाईला दोन हजार शब्द कमी पडतात … अशा प्रकारे अर्धा किंवा तासभर हजेरी लावून बायका जीवनाच्या अंतिम सत्य, मोक्षापर्यंत जाऊन येतात केवळ संवादातून आणि पुरुष मितभाषी स्वभावामुळे शांत राहून ‘इदं न मम’ म्हणत असावेत… विवाह..! दोन मनांना जोडणारा सेतू! हीच दोन नवीन मनं ... Read More »

पाल्याच्या विकासाआड येऊ नये!

– आरती सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका) ‘भौतिक शास्त्राच्या’ नियमानुसार- कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते… उदा. जबाबदारी!! आज अशाच चालढकलापायी अनेक मुले भावनिक, मानसिक व हो, शारीरिक भुकेनेसुद्धा तळमळत आहेत. याचा आपण विचार करायला नको का? ….. मुलांना ‘करू नको’ म्हणून आज्ञा केली की तेच नेमके करावे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते पण एखाद्या गोष्टीमुळे आपले नुकसान कसे होत आहे हे ... Read More »