Daily Archives: January 6, 2017

रस्त्यावरील विकृती

नववर्षाच्या रात्री बेंगलुरूच्या रस्त्यांवर नशाबाज तरुणांच्या टोळक्यांनी महिलांशी केलेल्या गैरवर्तनाच्या व्हिडिओंचा मारा गेले काही दिवस दूरचित्रवाणी वाहिन्यांनी चालवला आहे. तो उबगवाणा असला तरी प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यानेच काहींवर कारवाई होऊ शकली हेही तितकेच खरे आहे. गैरवर्तनाचे हे प्रकार केवळ आजच घडत आहेत असे नव्हे आणि ते केवळ बेंगलुरूतच घडतात असेही नाही. यापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात नववर्षाचा आनंद ... Read More »

पार्सेकर सरकारचा पाठिंबा मगोने काढला

>> मगो लढविणार २२ जागा : सुदिन ढवळीकर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार   अखेर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने राज्यातील भाजपप्रणित सरकारला दिलेला पाठिंबा काल अधिकृतपणे काढून घेतला. ठरल्याप्रमाणे काल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व सभापती अनंत शेट यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे कळविले. दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकीनंतर सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार ... Read More »

कठोर कारवाई होणार

बॅनर्स, पोस्टर्स लावल्यासगोवा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी आचारसंहिता अधिक कडक केली असून आयोगाच्या आदेशानुसार काल उत्तर गोव्यातील व दक्षिण गोव्यातील मिळून ३३८० बॅनर्स काढून टाकले तर काढून टाकण्यात आलेल्या पोस्टर्सची संख्या २८५० एवढी आहे. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवारांनी बॅनर्स-पोस्टर्स लावण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार्‍या ... Read More »

पंतप्रधानांच्या गोव्यात दोन जाहीर सभा

प्रचाराच्या काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन जाहीर सभा होणार असून गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा चार दिवस राज्याम मुक्काम असेल, अशी माहिती खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा होतील. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ... Read More »

२० जानेवारीपर्यंत नवीन मतदार कार्ड वितरण

गोवा विधानसभा मतदार आकडेवारी * एकूण मतदार- ११ लाख ९८० * पुरुष मतदार- ५ लाख ४५,५३१ * महिला मतदार- ५ लाख ६२,९३० * नवीन मतदार- ४५ हजार * वगळलेली मतदारसंख्या- २२ हजार गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी शेवटची मुदत दि. ८ जानेवारी असून या काळात नाव नोंदणी न केलेल्यांनी तालुका पातळीवरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन ... Read More »

खांडेपारमधील अपघातात हायस्कूल विद्यार्थी ठार

केरये-खांडेपार येथील राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळी ५ वा. सुमारास कॉंक्रिट मिक्सरच्या टायरखाली डोके चिरडल्याने हेरंब सुभाष तिळवे हा युवक ठार झाला. या अपघातात स्कूटर चालक जॉलीस्टन जुझे फर्नांडिस (१५- फोंडा) व विष्णू सधू शिंदे (३१ उसगाव) जखमी झाले. हेरंब हा फोंड्याच्या आल्मेदा हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी होता. प्राप्त माहितीनुसार हेरंब तिळवे व त्याचा मित्र जोलीस्टन फर्नांडिस जीए- ०५- के- ०२०१ क्रमांकाच्या ... Read More »