Daily Archives: January 5, 2017

लोकशाहीचा सोहळा

गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली. आता पुढील महिनाभर महिना प्रचाराची रणधुमाळी माजेल. सत्ता हे समाजसेवेचे साधन मानणार्‍यांपासून सत्ता हे संपत्ती कमावण्याचे साधन मानणार्‍यांपर्यंत नाना प्रकारचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरतील. विविध राजकीय पक्षांची मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अहमहमिका लागेल. सर्वत्र प्रचाराची झगमग आणि सभा, मेळावे, कोपरा सभा यांची लगबग दिसेल. आश्वासनांची खैरात होईल, दारी उमेदवारांची वरात येईल. ... Read More »

गोव्यात ४ फेब्रुवारीला मतदान

११ मार्च रोजी मतमोजणी; आचारसंहिता लागू गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी येत्या ४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी ११ मार्च रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी गोव्यासह पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम काल जाहीर केला. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना बुधवार दि. ११ जानेवारीस काढली ... Read More »

मतदानापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यास विरोधकांची हरकत

गोवा आणि पंजाबमध्ये ४ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने त्याच्या केवळ चार दिवस आधी यंदा १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यास विरोधी पक्षांनी हरकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. विधानसभा निवडणूक होणार असलेल्या राज्यांमध्ये ४ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान मतदान होणार आहे. ११ मार्चला सर्व राज्यांची मतमोजणी होईल. यापूर्वी २०१२ साली याच पाच राज्यांत निवडणुका होणार ... Read More »

११ जानेवारीपासून भरता येतील उमेदवारी

>> व्या मतदारयादीचे आज प्रकाशन   गोवा विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केला. ४ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ जानेवारीपासून भरता येतील. राज्यातील अंतिम मतदारयादी आज दि. ५ रोजी पणजी येथे एका कार्यक्रमात प्रकाशित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वीस हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रिया हाताळणार आहेत. गोव्याच्या ... Read More »