Daily Archives: January 4, 2017

शेवटचा तडाखा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची त्या पदांवरून हकालपट्टी करून सर्वोच्च न्यायालयाने या मंडळाच्या स्वच्छतेसाठी निर्णायक तडाखा दिला आहे. न्यायमूर्ती राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत सतत चालढकल करीत आलेल्या बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांना स्वायत्त संस्थेच्या मुखवट्याआड फार काळ दडून बसता येणार नाही हे दिसत होतेच. पण लोढा समितीच्या शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात रुपांतरित केले तरीही त्यांना ... Read More »

निवडणूक तारखेची आज घोषणा?

गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी यांची त्या अनुषंगाने उत्सुकता वाढली आहे. काल संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयातील फाईल्स हातावेगळ्या करण्याचे काम केले. आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही महत्वाची कामे करणे शक्य होणार नसल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या कामाच्या फाईल्सवर मंत्र्यांच्या सह्या व्हाव्या म्हणून अनेकजण प्रयत्नशील होते. मुख्य निवडणूक आयोगाच्या ... Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राज्यपाल नरसिंहन आदी उपस्थित होते. Read More »

भाजप ३७ जागा लढविणार

>> बाणावली, वेळ्‌ळी, नुवेंत अपक्षांना पाठिंबा   सर्व संबंधितांशी चर्चा करून भाजपने आतापर्यंत २२ मतदारसंघाचा आढावा घेतला असून ९ जानेवारीपर्यंत सर्व मतदारसंघ पूर्ण करणार असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत भाजप ३७ मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असून बाणावली, वेळ्‌ळी व नुवें या तीन मतदारसंघात अपक्षांना पाठिंबा देणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या या निर्णयामुळे नावेली ... Read More »

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीस लुईझिन, राणे दिल्लीला

>> उमेदवार निवड, युतीवर शिक्कामोर्तब शक्य   कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आज संध्या. ७ वा. होणार्‍या छाननी समितीच्या बैठकीस हजर राहण्यासाठी काल संध्याकाळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी नेते प्रतापसिंह राणे व त्यांना मदत करण्यासाठी पक्षाचे नेते एम. के. शेख दिल्लीला रवाना झाले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड व संभाव्य युतीबाबत यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. संभाव्य उमेदवारांची यादी ... Read More »

अखिलेश-मुलायम गटांचा सायकल चिन्हावर दावा

>> उभयतांतील प्रदीर्घ चर्चेनंतर तर्कवितर्क   सत्ताधारी समाजवादी पक्ष व पक्षाचे चिन्ह (सायकल) यावर आपलाच अधिकार असल्याचे दावे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी करून झाल्यानंतरही काल या पिता-पुत्रांमध्ये सुमारे दोन तास बोलणी झाली. या बोलण्यांमुळे उभय गटांमध्ये समझोता घडविण्याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले असले तरी अखिलेश यादव गटातील ज्येष्ठ नेत्यांनी समझोत्याची वेळ ... Read More »

‘संजीवनी’च्या ऊस उत्पादकांचे उद्यापासून पणजीत उपोषण

>> दरवाढीस मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे निर्णय   संजीवनी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक संघटनेच्या दरवाढीला मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्यामुळे उद्या गुरुवारपासून पणजीतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा निर्णय ऊस उत्पादक संघटनेने घेतला आहे. पहिल्या दिवशी दिडशेहून अधिक ऊस उत्पादक उपोषणाला बसणार आहेत. ऊस उत्पादकांनी ३६०० रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली होती. सध्या २५०० रुपये प्रति टन दर असून सदर दर परवडत नसल्याने दरवाढ ... Read More »

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदिप बंडोपाध्यायांना अटक

>> ममता बॅनर्जींची मोदींवर टीका   रोज व्हॅल चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार सुदिप बंडोपाध्याय यांना काल सीबीआयकडून अटक झाल्यामुळे संतप्त झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजपा मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. याच प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसचे आणखी एक खासदार तापस पाल हे पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय ... Read More »