Daily Archives: January 3, 2017

म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटकला चपराक

>> लवादाच्या निर्णयाविरोधातील याचिका दाखल करण्यास नकार म्हादई प्रश्‍नी काल गोव्याला महत्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. कर्नाटकाने ७ टीएमसी फीट पाणी वळवण्यास मान्यता द्यावी यासाठी लवादाने फेटाळलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सुनावणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून न घेतल्याने कर्नाटकाला मोठी चपराक बसली आहे. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकाने ७ टीएमसी फीट पाणी वळवण्यास मान्यता द्यावी अशी ... Read More »

फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा जत्रोत्सव आजपासून सुरू होणार आहे. यानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. Read More »

धर्म, भाषेच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर

>> सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा   देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल सर्वोच्च न्यायालयाने जात, धर्म आणि भाषा यांच्या नावे मतांची मागणी करणे बेकायदेशीर असल्याचा ऐतिहासिक निवाडा एका याचिकेच्या सुनावणीवेळी दिला. या निवाड्यामुळे देशातील विविध राजकीय पक्ष बरेच अडचणीत येतील अशी चर्चा आहे. एका हिंदुत्वविषयक प्रकरणाच्या याचिकेवर सात सदस्यीय घटना पीठाने वरील निवाडा ४-३ अशा मताधिक्क्याने दिला. ... Read More »

अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार

>> आमदार सिल्वा यांची माहिती   नावेलीचे आमदार तथा मजूरमंत्री आवैर्तान फुर्तादो यांनी भाजपात प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर वेळ्‌ळीचे अपक्ष आमदार बेंजामीन सिल्वा यांनीही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आपण या निवडणुकीत अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी काल सांगितले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सिल्वा यांनी वेळ्‌ळी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपा सरकारला पाठिंबा दिला व त्यांनीही आपणास सहकार्य केले. ... Read More »

हॉटेलमध्ये सेवाशुल्क ऐच्छिक

>> केंद्र सरकारने केला निर्णय जाहीर   केंद्र सरकारच्या निर्णयानुसार नजीकच्या काळात उपाहारगृहे व हॉटेलांच्या बिलांवर सेवा शुल्क देणे ऐच्छिक असणार आहे. या बाबतचा निर्णय केंद्र सरकारने काल जाहीर केला. या निर्णयानुसार सेवा शुल्क द्यायचे की नाही याविषयीचा निर्णय पूर्णपणे ग्राहकाचा राहणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने या अनुषंगाने राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोणत्याही हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकास सेवा ... Read More »

पार्सेकर, एलिनांची उमेदवारी निश्‍चित

काल प्रदेश भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मांद्रेतून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व कुठ्ठाळी मतदारसंघातून पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. वरील दोन्ही मतदारसंघांसाठी आणखी कुणाचेही नाव चर्चेत नव्हते. अन्य म्हणजे डिचोली, वास्को, सांत आंद्रे, काणकोण या मतदारसंघासाठी एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने या मतदारसंघातील उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ३७ मतदारसंघातील उमेदवार निवडीची प्रक्रिया ... Read More »

कोणाला हटवायचे त्याचा निर्णय तुम्हीच घ्या : मोदी

बसपा आणि सपा आज एका सुरात ‘मोदी हटाओ’चा नारा देत आहेत. मात्र मी ‘काला धन हटाओ, भ्रष्टाचार हटाओ’चा नारा देत आहे. अशावेळी कोणाला हटवायचे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथील विशाल परिवर्तन रॅलीत आपल्या समर्थकांना घातली. देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. वरीलप्रमाणे साद घालताना मोदी ... Read More »

मयेतील ६२ जणांना तात्पुरत्या मालकी सनदी

>> २०२ अर्जांवर प्रक्रिया चालू   पोर्तुगीज राजवट व त्यानंतरचा ५५ वर्षांच्या मुक्तीनंतरचा काळ मिळून तब्बल ५०६ वर्षांनी काल मयेतील ६२ जणांना तात्पुरत्या स्वरुपाचा मालकी हक्क देणार्‍या सनदींचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानेच तात्पुरता मालकी हक्क दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. एकूण २०२ अर्जांवरील प्रक्रिया चालू आहे. एकूण ११२७ अर्ज आहेत. विधानसभेत कायदे ... Read More »

आयुर्वेदात ‘त्रिदोष’ म्हणजे काय?

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) दोष हे सर्व शरीरव्यापी जरी असले तरी वात दोष अस्थिंमध्ये राहतो; पित्त दोष रक्त व स्वेद आणि कफ दोष रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र, मूत्र, यांमध्ये राहतो. अर्थात अति तिखट, उष्ण पदार्थाने पित्त प्रकोप झाला तर रक्तदेखील दुष्ट होते. मानवी शरीर हे पंचभूतात्मक, त्रिदोषयुक्त, सप्तधात्वात्मक, तीन मल, मन व आत्मा युक्त आहे. यातील त्रिदोष ... Read More »

उच्च रक्तदाब

– डॉ. स्वाती अणवेकर आपले ब्लडप्रेशर हे १४०/९० ााकस किंवा त्याहीपेक्षा जास्त काही काळाकरिता सतत मिळत असेल तर आपण असे म्हणायला हरकत नाही की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. पण हे सिद्ध करायला डॉक्टरला वेगवेगळ्या वेळी रुग्णाच्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये प्रेशर तपासूनच हे पहावे लागते. उच्च रक्तदाब अर्थात हाय-ब्लड-प्रेशर किंवा यालाच अर्वाचीन वैद्यक शास्त्राच्या भाषेत आपण हाय-पर-टेन्शन असेदेखील म्हणतो. तर ... Read More »