Daily Archives: January 2, 2017

नवसंकल्प

मावळते वर्ष जगाला अनेक धक्के देणारे ठरले. इंग्लंडने ब्रेक्सिटच्या बाजूने दिलेला कौल, अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा अनपेक्षितपणे झालेला विजय, भारतात नोटबंदीचा अकल्पित निर्णय अशा एकाहून एक विलक्षण धक्क्यांनी सन २०१६ इतिहासात संस्मरणीय केले आहे. या सर्व घटनांची पडछाया अर्थातच या नववर्षावर राहणार आहे. डोनाल्ड ट्रंप लवकरच महासत्ता अमेरिकेची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतील. ब्रेक्सिटचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागतील आणि नोटबंदीने ... Read More »

भाजपच्या १२ मतदारसंघांची उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण

>> युती तोडल्याचे मगोकडून पत्र नाही : तानावडे   आतापर्यंत भाजपच्या १२ मतदारसंघांची उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून १० जानेवारीपर्यंत ३७ मतदारसंघाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल व त्यानंतर प्रदेश निवडणूक समितीची व केंद्रीय निवडणूक समितीची मान्यता मिळविल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रदेश भाजपचे प्रवक्ते सदानंद शेट तानावडे यानी काल पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत पक्षाने हळदोणे, म्हापसा, ... Read More »

तुर्कीतील दहशतवादी हल्ल्यात २ भारतीयांसह ३९ मृत्यूमुखी

तुर्कस्तानमधील इस्तांबूल शहरात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी एका नाईट क्लबमध्ये केलेल्या हल्ल्यात ३९ जण मृत्यूमुखी पडले असून ४० हून अधिक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये २ भारतीयांसह १६ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मृतांमधील भारतीयांपैकी एकाचे नाव अविस रिझवी असे असून तो माजी राज्यसभा खासदाराचा मुलगा आहे. गुजरातमधील खुशी शाह ही अन्य मृत आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ही ... Read More »

जनधन खातेधारकांनी पंधरवड्यात काढले ३,२८५ कोटी रुपये

देशभरात जनधन खातेधारकांनी गेल्या १५ दिवसांत आपल्या खात्यांमधून ३२८५ कोटी रुपये काढले असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरातील जनधन खातेधारकांच्या खात्यांवर ८ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत ७४,६१० कोटी रुपये जमा झाले होते. विशेष म्हणजे जनधन खात्यांचा दुरुपयोग होऊ न देण्यासाठी या खात्यांमधील पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. महिन्याला एका जनधन खातेधारकास दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात ... Read More »

उत्तर प्रदेशमधील सपातील अंतर्गत संघर्ष पोहचला शिगेला

उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोचला असून मुख्यमंत्री अखिलेश यादव व सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांच्या गटा दरम्यानच्या कुरघोडी सुरूच आहेत. सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना निलंबित करून २४ तास उलटण्याआधीच मुलायमसिंह यांनी त्यांची हकालपट्टी केली. अखिलेश गटाने काल घेतलेले राष्ट्रीय अधिवेशन घटनाविरोधी असल्याचे सांगून मुलायम सिंह यांनी रामगोपाल यांची सहा वर्षांसाठी ... Read More »

जीएसआयडीसीतील भ्रष्टाचाराचे पुरावे खलपांनी द्यावेत

>> सिध्दार्थ कुंकळ्येकरांची प्रतिक्रिया   गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) दर्जात्मक कामे केलेली आहेत. जीएसआयडीसीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यांना दर्जेदार कामे म्हणजे काय ते कळत नसावे, असे या महामंडळाचे उपाध्यक्ष व पणजी मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी काल या महामंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले. कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत गोवा साधनसुविधा विकास महामंडळात कोट्यवधी रु.चा ... Read More »

विरोधी युतीसाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा : मोन्सेर्रात

>> युगोडेपा-कॉंग्रेस चर्चा असल्याची माहिती सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन त्यांच्याबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करावी. ती करताना कॉंग्रेस पक्षाने मोठ्या सहकार्‍याची भूमिका बजावावी, असे आपणाला वाटते असे युगोडेपाचे नेते व असंलग्न आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपला पक्ष कॉंग्रेसबरोबर युती करणार असल्याचे सांगून कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड व अन्य समविचारी विरोधी पक्षांबरोबर युती करण्यासाठी ... Read More »

राज्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मावळत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सासष्टी तालुक्यांतील कोलवा, बेताल भाटी, सेर्नाभाटी, बाणावली समुद्र किनार्‍यावर हजारो देशी-विदेशी पर्यटकांनी गर्दी केली होती. विदेशी पर्यटकांबरोबर गोव्या बाहेरील महाराष्ट्र, कर्नाटक. आंध्र प्रदेश राज्यांतून हजारो पर्यटकांनी या किनारपट्टी भागात गर्दी केली होती. कोलवा व बाणावली येथे तीस ते पस्तीस हजार पर्यटकांनी समुद्र किनारा गजबजून गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. उत्तर ... Read More »

उमेदवारांना २० लाख रुपये खर्चाची मर्यादा

निवडणूक नियमावलीत केलेल्या दुरुस्तीनुसार येत्या गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना २० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करता येणार नाही. वरील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास उमेदवाराला निवडणुकीपासून अपात्र ठरविले जाईल. निवडणुकीची घोषणा बुधवारी? गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख उद्या बुधवार दि. ४ रोजी जाहीर होण्याची शक्यता ... Read More »

सुट्टीतला आनंद

– सौ. पौर्णिमा केरकर रेतीत रुतलेले खुबे स्वतः पाण्यात बसून काढण्याचे ते असीम समाधान जसे मी अनुभवलेय, तसाच खुबे काढण्याच्या नादातील भरारक, जीवावर बेतलेला प्रसंगही तेवढाच स्मरणात राहिला. त्या प्रसंगाची प्रखरता आजही आठवली की अंगावर क्षणिक काटा उभा राहतो. वाढणारे वय… बदलणारा काळ… वेगवान स्पर्धात्मक जीवनशैली… आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सगळ्याच सुखसोयी हात जोडून दिमतीला असतानाच्या या कालखंडातही मनात सतत एक ... Read More »