Monthly Archives: January 2017

वचने आणि आश्‍वासने

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे आतापावेतो प्रसिद्ध झाले आहेत. ते सगळे पाहिले, तर काही ठळक मुद्दे येत्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येईल. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो रोजगाराचा. पाच वर्षांत पंचवीस हजार रोजगार निर्माण करण्याची ग्वाही भाजपा सरकारने दिली होती, परंतु चिंबल आयटी पार्क किंवा तुये इलेक्ट्रॉनिक्स सिटीसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात कार्यवाहीत येऊ शकले नाहीत. ... Read More »

भाजपाने गोव्यात भ्रष्टाचार वाढविला

>> म्हापशातील कॉंग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधी यांचा आरोप   एक व्यक्ती किंवा एक संघटना राज्य चालवू शकत नाही; त्यासाठी युवक, महिला, पुरुषांना विधानसभेत घेऊन गेले पाहिजे. दुसर्‍याचे ऐकून घेण्याची पक्षाच्या नेत्यांमध्ये क्षमता असली पाहिजे. ती कॉंग्रेसमध्ये आहे, पण भारतीय जनता पक्षात नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाचेही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे हा देश वाहत जात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ... Read More »

अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द म्हापशात एफआयआर नोंद

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल गोव्यातील निवडणूक अधिकार्‍यांनी म्हापसा पोलिस स्थानकात मतदारांनी कोणत्याही पक्षाकडू लाच घ्यावी अशा आशयाचे वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआरआय नोंदविले. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी याला दुजोरा दिला. भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधी कायद्याखाली हे एफआयआर नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा अहवाल आपण निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. चालू महिन्यातच याप्रकरणी ... Read More »

पर्रीकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याचीही निवडणूक आयोगाकडून चौकशी

कोणत्याही पक्षाकडून पैसे घ्या व मते कमळालाच द्या, या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यासंबंधी गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता जारी झाल्याच्या दिवसापासून ८३ लाख रुपये किंमतीचे ७२ हजार ६०० लीटर मद्य तर ३२ लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. ... Read More »

मृत्यूच्या जवळ नेणारे… तीन रिपू!

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आहार-विहारातील योग्य बदल, साधे-सरळ राहणीमान, सकारात्मक जीवन आणि योग्य ती काळजी घेतल्यास हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार व पक्षाघात यांसारख्या तीन रिपूंवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. जागतिकीकरण, वाढते औद्योगीकरण या सर्वांमुळे आपली जीवनशैली बदलत चालली आहे, हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. या बदलत्या जीवनशैलीचे, प्रदूषणकारी वातावरणाचे परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत. सध्या हृदयरोग, फुप्फुसाचे रोग, ... Read More »

विटामिन ‘बी-कॉम्प्लेक्स’

विटामिन म्हणजेच जीवनसत्व ही सेंद्रीय संयुगे असतात जी माणसाच्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात आणि त्यातील निरनिराळ्या अवयवांची कार्ये उत्तम रीतीने चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही जीवनसत्वे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी तसेच मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत करतात. त्यामुळे यांच्या कमतरतेमुळे तुम्हाला विविध आरोग्याच्या समस्या आणि आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन-‘बी’ चे अनेक उपप्रकार आहेत ज्यांना एकत्रितपणे ‘‘बी-कॉम्प्लेक्स विटामिन्स’’ असे म्हणतात. ही विटामिन्स तुमच्या ... Read More »

जवळही आणि दूरही!

शैक्षणिक माध्यम प्रश्नावरील आणि कॅसिनोंसारख्या विषयावरील भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनवीत त्याविरोधात रणशिंग फुंकलेल्या आणि भाजपाला धडा शिकवण्यासाठी म्हणून मगो पक्षाशी हातमिळवणी केलेल्या गोवा सुरक्षा मंचाला मगो पक्षाने निवडणुकीपूर्वीच आपले खरे दात दाखवले आहेत. खरे तर गोवा सुरक्षा मंच – शिवसेना आणि मगो यांची निवडणूकपूर्व आघाडी झालेली असल्याने तिघांचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणे योग्य ठरले असते. परंतु ... Read More »

सत्तेचा वापर राज्यहितासाठी करायचा असतो : पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत बसून गोवा सुंदर दिसतो. मग खाण बंदीमुळे गोव्याचे वाटोळे झाले, पर्यटन क्षेत्राला उतरती कळा लागली, अनेक व्यवसाय बंद पडले त्याचा राज्यावर विपरीत परिणाम झाला ते मोदीजींना दिल्लीत बसून दिसले नाही का अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. साखळी येथील प्रचार सभेत पवारांनी सत्तेचा वापर राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो. ... Read More »

केजरीवालांविरुध्द कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना मतदारांनी लाच स्वीकारण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गोव्यात एफआयआर नोंद करून योग्य कायदेशीर कारवाई करावी असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील निवडणूक अधिकार्‍यांना दिला आहे. केजरीवाल यांच्यावर कोणती कारवाई केली त्याची माहिती ३१ जानेवारी रोजी दु. ३ पर्यंत देण्याचा आदेशही आयोगाने दिला आहे. भारतीय ... Read More »

भाजपचे रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य

>> देवेंद्र फडणवीसांहस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातून रोजगाराला सर्वोच्च स्थान दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल भाजपने निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी, भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून गोव्यातील सर्व युवक-युवतींना नोकर्‍या व रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन दिले असल्याचे सांगितले. पक्षाने यावेळी तेच मुख्य उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ... Read More »