Monthly Archives: December 2016

समाजवादी दंगल!

आमीर खानचा ‘दंगल’ देशातील समस्त चित्रपटगृहांमध्ये धडाक्यात चालला असताना उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर समाजवादी पक्षामध्ये नवी दंगल उसळली आहे. गेले अनेक महिने सुरू असलेला समाजवादी पक्षातील हा वाद काल संध्याकाळी शिखराला पोहोचला. मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्रिपदावर असलेले आपले पुत्र अखिलेश यांना पक्षविरोधी कारवायांचे कारण देऊन पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करणारे जे पाऊल उचलले, ती समाजवादी पक्षातील दुफळीची निखळलेली शेवटची कडी ... Read More »

समाजवादी पक्षातून अखिलेश यांची मुलायमसिंगांकडून हकालपट्टी

>> पक्षविरोधी कारवायांचा ठपका   समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्षाने काल कळस गाठला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपले पुत्र व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बंधू रामगोपाल यादव या दोघांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. दोघांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलायम, त्यांचे बंधू शिवपाल यांच्याशी अखिलेश यादव आणि त्याचे काका रामगोपाल यांचा ... Read More »

भीम ऍप ः एक ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आपल्या मोबाईलवरून सुलभ आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी ‘भीम’ या ऍपचे अनावरण केले आहे. ‘भीम’ चे पूर्ण नाव ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे असून डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावाचाही त्याला संदर्भ आहे. इतर युनिफाईड इंटरफेस (यूपीआय) ऍप्सशी आणि बँक खात्यांशी त्याद्वारे समन्वय साधला जाणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ते विकसित केले आहे. > ‘भीम’ ... Read More »

भाजप २५ ते २६ जागा जिंकेल

>> मनोहर पर्रीकर यांचा दावा   येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला २५ ते २६ जागा मिळतील असा दावा केंद्रीय संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केला. काल सकाळी पणजी शहरात भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तद्नंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील ५८ टक्के जनतेला पुन्हा भाजप सत्तेवर आलेली हवी आहे. निवडणुकीत ४५ टक्के मते भाजपला ... Read More »

२८ मतदारसंघांतून लढण्याची मगो पक्षाची तयारी ः सुदिन

विधानसभा निवडणुकीत आम्ही २८ मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे आणि २२ मतदारसंघांत त्यासंबंधीची तयारी पूर्ण झाली आहे, असे मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. २१ जागा मगो जिंकणार असा दावाही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. जर मगो पक्षाची कुठल्याही पक्षाबरोबर युतीसंबंधीची बोलणी ङ्गलदायी होऊ शकली नाही, तर पक्ष ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबिणार असल्याचे ... Read More »

पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल

म्हापसा – पर्वरी महामार्गावर मेगाब्लॉक होण्याचा प्रकार नित्याचाच झाला असून काल शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्याने रुग्णांचे हाल झाले. पणजीला पोहोचण्यासाठी मेगाब्लॉकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकांबरोबरच इतर वाहनचालकांना दोन ते अडीच तास लागत होते. नववर्ष साजरे करण्यासाठी परराज्यांतील पर्यटकांच्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने या कोंडीत काल अधिकच भर पडली होती. वाहनचालकांनी कोंडीला टाळण्यासाठी पर्वरीतील अंतर्गत मार्गांचा ... Read More »

सरत्या २०१६ सालास निरोप देताना…

– रमेश सावईकर सकारात्मक विचार करण्याची सवय लागून तो आपला स्वभाव कसा बनेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे. नवीन वर्षी आपण सशक्त व सकारात्मक विचारसरणी अंगिकारण्याचा संकल्प सोडूया! आपला विचार सकारात्मक असला की आपले भविष्यात कोणीच वाईट चिंतणार नाही असा आत्मविश्‍वास निर्माण होऊन तो वाढत जातो. माणसाच्या आयुष्यात दिवस, महिने, वर्षे कशी झटकन निघून जातात ते कळतच नाही. हातांतून एखादी वस्तू ... Read More »

कार्यशाळा, शिबिरे लाभदायी

– प्रा. रामदास केळकर विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा ह्यातून आपल्याला असे खाद्य मिळत असते त्यातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला गवसतो. पुस्तकांचे वाचन असो, एखादा चित्रपट असो त्यातून प्रेरणा घेत असताना कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या मनाची मरगळ दूर करण्यासाठी असे कार्यक्रम म्हणजे मनाला मिळणारे टॉनिक! मुंबई पुण्याप्रमाणे आता गोव्यातही विविध विषयावरील शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने होत आहेत ही आशादायक गोष्ट ... Read More »

संयम का सुटला?

पांडुरंग मडकईकर यांच्या पक्षप्रवेशाने आपल्या पुत्राच्या राजकीय पदार्पणात निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे अस्वस्थ झालेल्या श्रीपाद यांनी आपली खदखद प्रसारमाध्यमांतून व्यक्त केली आहे. श्रीपाद यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना गोव्याच्या राजकारणापासून सतत बाजूला राहावे लागले. अनेकदा हातातोंडाशी आलेल्या संधी त्यांच्यापासून हिरावल्या गेल्या, परंतु आजवर कधी त्यांनी प्रसारमाध्यमांचा आधार घेतल्याचे दिसले नव्हते. त्यांना केंद्रात लोकसभेचे उपसभापतीपद दिले जाणार होते. त्यांना त्यासाठी दिल्लीलाही बोलावून ... Read More »

यापुढे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळल्यास पाच पट दंड व कैद

चलनातून बाद ठरवल्या गेलेल्या पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा साठवून ठेवलेल्या आढळल्यास तो फौजदारी गुन्हा मानला जाणार असून कैदेची शिक्षा व सापडलेल्या रकमेच्या पाच पट दंडही होऊ शकेल अशी तरतूद असलेल्या अध्यादेशास केंद्रीय मंत्रिमंडळाने काल हिरवा कंदील दर्शविला. मात्र, कमी प्रमाणातील जुन्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत बदलून घेता येतील. हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात ... Read More »